HomeArchiveसरकारी नोकरीच्या मागणीत...

सरकारी नोकरीच्या मागणीत वाढ!

Details

 
“नॉनमेट्रो शहरांतून ६६ टक्के तर मेट्रोंमधून ३४ टक्के मागणी
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
कोरोना व्हायरस उद्रेकाचा सर्वाधिक फटका देशातील खाजगी क्षेत्रातील नोकरदारांना बसला असून अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत तर अनेकांना कमी पगारात आपले घर चालवावे लागत आहे. परिस्थितीत अजूनही विशेष सुधारणा न झाल्याने असंख्य कामगारांवर बेरोजगारीची टांगती तलवार कायम आहे. परिणामी नोकरीतील सुरक्षिततेच्या दृष्टीने सरकारी नोकरीच्या मागणीत प्रचंड वाढ झाल्याचे आढळून आले आहे.
 

 
 
अड्डा२४७, या देशातील आघाडीच्या तंत्रज्ञान सक्षम शिक्षण मंचाने ‘महामारीच्या काळात सरकारी नोकऱ्यांची स्थिती’ जाणून घेण्याच्या उद्देशाने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब निदर्शनास आली आहे. सर्वेक्षणात सामील सुमारे ६५०० नोकरीइच्छूक उमेदवारांपैकी ८२.३३ टक्के उमेदवारांनी खाजगी नोकरीपेक्षा सरकारी नोकरी करण्याला आपले प्राधान्य असल्याचे नमूद केले. 
 
सरकारी नोकरीची सर्वाधिक मागणीही नॉन मेट्रो शहरांतून होत आहे. चांगली नोकरी मिळण्याच्या आशेने नॉन मेट्रो शहरातील लोक नेहमीच महानगरांत स्थलांतरण करीत असतात. परंतु बहुतांश नोकरदार कोरोनाच्या प्रभावानंतर आपल्या मूळ गावी परतले आहेत. त्यामुळेच या भागांतून सर्वाधिक म्हणजेच ६६ टक्के मागणी होत आहे तर मेट्रो शहरांतून ३४ टक्के लोकांनी सरकारी नोकरीला प्राधान्य दिले आहे. दिल्लीत सरकारी नोकरीची सर्वाधिक मागणी ११.०४% इतकी नोंदवली गेली तर पाटण्यासारख्या नॉनमेट्रो शहरातूनदेखील ११.०३% इतकी मागणी नोंदवली गेली. सर्वेक्षणात सामील ८२.३३ टक्के लोकांनी सुरक्षितता म्हणून सरकारी नोकरीला प्राधान्य दिले आहे तर ५ टक्के लोकांनी सरकारी नोकरीत मिळणारा पगार तर २.७७ टक्के लोकांनी या नोकरीत मिळणारे इतर लाभ मिळण्याच्या आशेने आपला कल दर्शविला आहे.
 

 
 
अड्डा२४७चे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल नागर म्हणाले की, लॉकडाउननंतर ज्या घटना घडल्या अशा विविध घडामोडींचे मूल्यांकन करणे हा या सर्वसमावेशक संशोधनाचा मुख्य हेतू होता. विविध व्यवसायांची सेवा आणि संचालन बंद झाल्याने कामगार वर्गात कधीही नोकरी जाईल अशी भीती निर्माण झाली आहे आणि म्हणूनच सरकारी नोकरीच्या मागणीतील वाढ दिसून आली आहे. खाजगी क्षेत्रात काम करताना संकटसमयी नोकरी जाण्याची असलेली भीती आणि अशा परिस्थितीही सरकारी नोकरीत मिळणारी सुरक्षितता हेच मूळ कारण आहे, ज्यामुळे आज बहुतांश लोक सरकारी नोकरीकडे पुन्हा वाळू लागले आहेत.
 ”
 

Continue reading

महाराष्ट्राला मिळणार ४८ऐवजी ७२ खासदार?

भारतीय लोकशाहीत एक ऐतिहासिक बदल घडण्याच्या उंबरठ्यावर आहे. केंद्र सरकार "नारी शक्ती वंदन अधिनियम"मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित संशोधन विधेयकाद्वारे लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या ५४३वरून ८१६पर्यंत वाढवण्यात येईल. या ८१६ जागांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल २७३...

इराणसोबतचे युद्ध हा अमेरिकेने खेळलेला जुगार!

आज जागतिक भू-राजकारण अशा वळणावर उभे आहे जिथे लष्करी संघर्षाचा धूर थेट सामान्य माणसाच्या किचन आणि उद्योगांच्या ताळेबंदापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध केवळ लष्करी वर्चस्वाची लढाई राहिलेली नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरत आहे....

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...
Skip to content