HomeArchiveसत्ताकारणात काँग्रेस!

सत्ताकारणात काँग्रेस!

Details

 

 
 

“विधानसभेचा कार्यकाल संपुष्टात येण्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे सोपविला. त्यानंतर त्यांनी पुन्हा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखालीच सरकार बनणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. मात्र, तसा दावा त्यांनी राज्यपालांकडे केला नाही आणि काँग्रेसच्या नेते लगेचच सक्रीय झाले. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, माणिकराव ठाकरे, विजय वडेट्टीवार आदींनी लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे सिल्व्हर ओक, हे मुंबईतले निवासस्थान गाठले. शिवसेनेचे नेते संजय राऊतही तेथे उपस्थित होते. तेथे किमान दीड तास चर्चा केल्यानंतर काँग्रेसचे नेते प्रसिद्धीमाध्यमांसमोर व्यक्त झाले. राज्यपाल कोणता निर्णय घेतात याची आम्ही वाट पाहत आहोत. त्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू असे त्यांनी सांगितले.”
 

 
छायाचित्रेः भूषण कोयंडे
 
 

 
 

 
 
 
 
 
 
 
 

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content