HomeArchive‘सखी सह्याद्री’मध्ये आज...

‘सखी सह्याद्री’मध्ये आज डॉ. सई लळीत यांची मुलाखत!

Details
‘सखी सह्याद्री’मध्ये आज डॉ. सई लळीत यांची मुलाखत!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
कवयित्री व हास्यकलाकार डॉ. सई लळीत यांची आज, गुरूवार दि १८ जुलै रोजी ‘मालवणी बोली आणि साहित्य’ या विषयावर सह्याद्री दूरदर्शन वाहिनीवर मुलाखत होत आहे. दुपारी साडेतीन ते साडेचार अशा एक तासाची ही थेट प्रक्षेपित होणारी मुलाखत ‘सखी सह्याद्री’ या कार्यक्रमांतर्गत होणार आहे. या कार्यक्रमात दूरध्वनीवरून थेट प्रश्न विचारण्याची संधी दर्शकांना असणार आहे.

‘सखी सह्याद्री’ हा एक तासाचा थेट प्रक्षेपित होणारा ‘सह्याद्री’ वाहिनीचा कार्यक्रम विशेषत: महिलांमध्ये लोकप्रिय आहे. डॉ. सई लळीत या पेशाने वैद्यकीय व्यावसायिक असून लेखिका, कवयित्री आणि एकपात्री हास्य कलाकार आहेत. त्यांचा ‘वांगड’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला असून ‘मिरग’ ही कादंबरी ‘ग्रंथाली’ने प्रकाशित केली आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘हास्यसम्राट’ कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वात सहभागी झालेल्या त्या एकमेव महिला स्पर्धक होत्या. दूरदर्शनसह अनेक वाहिन्यांवरून त्यांचे कार्यक्रम प्रसारित झाले आहेत. विविध वृत्तपत्रे व नियतकालिकांतून त्या सातत्याने लेखन करीत असतात. अ. भा. मराठी साहित्य संमेलनांसह अनेक साहित्य संमेलनांमध्ये त्या निमंत्रित कवयित्री म्हणून सहभागी झाल्या आहेत. मालवणी बोली व साहित्य संशोधन केंद्र, सिंधुदूर्ग या संस्थेच्या त्या सचिव आहेत. हा कार्यक्रम जास्तीतजास्त रसिकांनी पाहवा, असे आवाहन डॉ. सई लळीत व दूरदर्शनचे निर्माते जयु भाटकर यांनी केले आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content