HomeArchiveसंकल्पपूर्ती अर्थसंकल्पामुळे ठाणेकरांची...

संकल्पपूर्ती अर्थसंकल्पामुळे ठाणेकरांची अपेक्षापूर्ती!

Details
संकल्पपूर्ती अर्थसंकल्पामुळे ठाणेकरांची अपेक्षापूर्ती!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन. ज्या संकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात त्यास अर्थसंकल्प असे म्हणतात. प्रत्येक आस्थापना म्हणजेच देशापासून राज्यापर्यंत आणि महापालिकांपासून जिल्हा परिषदा, नगर परिषदांपर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून वर्षभराचे आर्थिक नियोजन अपेक्षित असते, अशी ठराविक माहिती नेहमीच आपल्या वाचनात येत असते. पण या वर्षभराच्या नियोजनासाठी अनेक कसरती, करामती नियोजनकारांना पडद्याआड कराव्या लागतात. बजेटच्या पेटाऱ्यातून काय बाहेर पडणार आणि आपल्या खिशाला किती फटका बसणार याचे सर्वसामान्यांना कुतूहल असते आणि धास्तीही असते.

ठाणे महापालिकेसारख्या विकासाचा मंत्र जपणाऱ्या यंत्रणेच्या बजेटकडेही याचसाठी ठाणेकरांचे लक्ष लागलेले असते. ठाण्याच्या विकासाचा ध्यास घेतलेले आयुक्त संजीव जयस्वाल हे नो नॉन्सेन्स अधिकारी आहेत याचा अनुभव प्रशासनापासून राजकीय पक्षांपर्यंत सर्वांनीच आजवर घेतला आहे. जयस्वाल यांनी ठाण्याचा कायापालट करण्याचा जणू विडाच उचलला आहे. त्यांच्या द्रष्टेपणामुळे ठाण्यात आजघडीला एकाचवेळी क्लस्टरसह अनेक मोठे विकासाभिमुख प्रकल्प सुरू आहेत. मोठमोठे गृहनिर्माण प्रकल्प आणि नागरी वस्तीपुरताच विकासाचा झपाटा न दाखवता जयस्वाल यांनी विकास आणि नियोजनाचा काटेकोरपणा ठाणे, मुंब्रा, दिवा येथील मध्यमवर्गीय वसाहती, झोपडपट्टी, पुनर्वसन योजना, वंचित मुले आणि तळागाळातील घटक यांच्यासाठी हितावह उपक्रम प्रत्यक्षात आणतानाही दाखवला आहे. किंबहुना त्यांच्या याच द्रष्टेपणामुळे त्यांना ठाणे महापालिका आयुक्तपदी कुणालाही मिळत नाही अशी दोन वर्षांची मुदतवाढ नुकतीच मिळाली होती. यामुळेच जयस्वाल ठाण्यातील विविध विकासात्मक उपक्रम, प्रकल्प, त्यासाठी लागणारा निधी आणि जिल्ह्यातील सर्वात मोठ्या महापालिकेचे आर्थिक नियोजन यांची कशी सांगड घालतात याची उत्सुकता ठाणेकरांनाही होती.

निवडणुका समोर आल्या असताना सत्ताधारी पक्षाकडून करवाढ ठाणेकरांवर लादली जाणार नाही अशी जी अटकळ होती ती जयस्वाल यांनी खरी ठरवली आहे. ठाणेकरांवर कोणतीही नवी करवाढ न लादणारा 3861.88 कोटींचा अर्थसंकल्प त्यांनी स्थायी समितीला सादर केला. मात्र त्याचवेळी आहे त्या निधीत मुंब्रा, दिवा, नवीन ठाण्याच्या विकासावर भर देण्याचा संकल्पही त्यांनी बोलून दाखवला. निवडणुकीच्या वर्षात करवाढ करायला सत्ताधारी पक्षाची आडकाठी येणारच हे जयस्वाल यांच्यासारख्या धोरणी अधिकाऱ्याने आधीच गृहित धरले असणार. यामुळेच त्यांनी गेले दोन-तीन महिने सर्व खातेप्रमुखांना उत्पन्न वाढवण्यासाठी, थकबाकी वसुलीसाठी कामाला लावले होते. थकबाकी वसुली, करवसुली आणि विकासात्मक उपक्रमांमध्ये ठाण्यातील बड्या बांधकाम व्यावसायिकांचे व उद्योजकांचे सहकार्य घेऊन जयस्वाल यांनी त्यांचा विकासात्मक दृष्टीकोन या अर्थसंकल्पातील तरतुदींमध्येही कायम ठेवला आहे.

गेल्या वर्षी मालमत्ता करामध्ये 10 टक्के करवाढ सुचवण्यात आली होती. यंदा अशी करवाढ प्रस्तावित नाही. शिवाय ५०० चौ. फूटांपर्यंतची घरे करमुक्त करण्याचे आश्वासन प्रत्यक्षात आणल्यास महापालिकेला मोठा फटका बसणार आहे. तरीही अंतर्गत, मेट्रो, कोस्टल रोड आणि पीआरटीएस या महत्वाकांक्षी योजनांसाठी 500 कोटींचे कर्ज घेण्याचा महापालिकेचा प्रयत्न असेल. जयस्वाल यांनी २018-19 चा 3265.68 कोटींचा सुधारित आणि 2019-20 चा 3861.88 कोटींचा मूळ अर्थसंकल्प बुधवारी मांडला. त्यात मागील चार वर्षांत हाती घेण्यात आलेले प्रकल्प, पूर्ण झालेले प्रकल्प आदींचा उल्लेख करतानाच, मुंब्रा, दिवा आणि नवीन ठाण्याच्या विकासासाठी विशेष भर देण्यात आला आहे.

हाती घेतलेले सर्व प्रकल्प पूर्ण करणारच हा जयस्वाल यांचा ध्यास ठाणेकरांना परिचित आहे. यामुळेच बहुदा आयुक्तांनी त्यांच्या कारकीर्दीतील या पाचव्या अर्थसंकल्पाला संकल्पपूर्ती अध्याय म्हटले असावे. यंदाच्या अर्थसंकल्पात पूर्वीचे सर्व प्रकल्प पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला आहे. अर्थसंकल्पाबरोबर फलनिष्पती अहवाल देणारे ते पहिलेच आयुक्त आहेत. त्यांच्या कार्यकाळात महापालिकेचे उत्पन्न त्यांनी दुपटीने वाढवले आहे. मालमत्ता कर, विकास आणि तत्सम शुल्क, सेवाकर अनुदान, मुद्रांक शुल्क अनुदान, थकीत इतर कर यांपासून उत्पन्नवाढ महापालिकेने अपेक्षित धरली आहे. स्मार्ट मिटरिंग पध्दतीने पाणीपुरवठा करण्याची योजना प्रत्यक्षात आल्यास पाणीपुरवठा आकारापोटी 175 कोटी रूपयांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. अर्थात अपेक्षित उत्पन्न आणि ठाणे महापालिकेच्या अनेक उपक्रमांवरील खर्च यातील तफावत जयस्वाल यांना धोरणी नियोजनाने भरून काढावी लागणार आहे.

मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती असलेले जयस्वाल ठाण्याच्या विकासाचे शिवसेनेचे व्हिजन अमलात आणण्याच्या प्रयत्नांमुळे शिवसेना नेतृत्त्वालाही प्रिय आहेत. सत्ताधारी पक्षांचा असा विश्वास संपादन करणे ही तारेवरची कसरत असते. ती जयस्वाल यांनी जमवून दाखवली आहे. आणि ही कसरत करतानाच ठाण्याच्या विकासाचे त्यांचे व्हिजनही त्यांनी मार्गावर ठेवले आहे. राज्यातील अनेक महापालिका, नगरपरिषदा आर्थिक चणचणीचा सामना करत असताना या प्रशासनकुशल अधिकाऱ्याने ठाणे महापालिकेला निधीचा तुटवडा भासू दिलेला नाही. ठाण्यातील एका रस्त्याला त्यांचे नाव देण्याचा प्रस्ताव त्यांनीच नुकताच नाकारला. मात्र ठाणेकरांचे जीवन सुसह्य आणि आनंदी करणाऱ्या या अधिकाऱ्याने केलेल्या अपेक्षापूर्तीमुळे ठाणेकरांनी त्यांना आधीच हृदयात अढळपद दिले आहे.”
 
“शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान

Continue reading

धनत्रयोदशीच्या दिवशी ‘अशुभ’ दक्षिणेलाच का लावतात दिवा?

आपल्या भारतीय संस्कृतीत दिवाळीची सुरुवात दिवे प्रज्वलित करूनच केली जाते. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-परदेशात जिथे-जिथे दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो, तिथे-तिथे दीप पेटवूनच त्याची सुरुवात केली जाते. एरव्ही दक्षिण दिशेला दिवा पेटवणे अशुभ मानले जाते, परंतु धनत्रयोदशीला तो...

मुंबई महापालिकेकडून ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर

मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी हा निर्णय घोषित केला. या सानुग्रह अनुदानाचा तपशील पुढीलप्रमाणेः १. महापालिका अधिकारी / कर्मचारीः रुपये ३१,०००/- २. अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळा...

काँग्रेस सेवादल सुरू करणार प्रत्येक गावात केंद्र

काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार आहे. मंगळवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिरात हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या हस्ते ध्वजारोहण...
Skip to content