HomeArchiveशिक्षणाधिकारी पालकर हटाव......

शिक्षणाधिकारी पालकर हटाव… महिला संस्था बचाव! न्याय मिळवून देण्याचे आमदार प्रवीण दरेकर यांचे आश्वासन

Details

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
पोषण आहाराची बिले रखडवून महिला संस्थांचा छळवाद मांडणाऱ्या शिक्षणाधिकारी महेश पालकर यांच्याविरूद्ध, तक्रारींचा पाढा मुंबईतील महिला संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या एका बैठकीत वाचला. अंगावरचे दागिने गहाण ठेवून महिला संस्था, बचत गटाच्या महिला पोषण आहाराचे काम अखंडितपणे करीत आहेत. पण अधिकारी वर्षनुवर्षे बिले राखडवीत आहेत. मग काम करूनही पैसे मिळत नाहीत. परस्पर बिले रद्द करतात. त्यामुळे “शिक्षणाधीकारी पालकर हटाव… महिला संस्था बचाव” असा  तीव्र आंदोलनाचा एल्गार महिलांनी केला. संस्थांच्या या तीव्र भावनेला पाठबळ देत, मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर या आंदोलनाचे नेतृत्त्व करून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी दिले.

पोषण आहाराची बिले शाळांच्या नावे न काढता संबंधित महिला संस्थांच्या नावे काढण्याचे आदेश शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी गेल्याच आठवड्यात दिले होते. पण महिला संस्थांनी आपली बिले शाळांमध्येच जमा करण्याच्या सूचना महेश पालकर यांच्याकडून दिल्या गेल्या आहेत, अशा तक्रारी अनेक महिलांनी केल्या. मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात पोषण आहार पुरविणाऱ्या मुंबईतील सर्व महिला संस्थांची एक विशेष बैठक झाली. तेव्हा आहार पुरविणाऱ्या बचत गटांच्या महिलांनी आपल्या व्यथा मांडल्या. पालकरसारख्या अधिकाऱ्यामुळेच पोषण आहाराची बिले दहा-दहा वर्षे रखडली आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढल्याशिवाय पर्याय नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केल्या.

प्रवीण दरेकर यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. हे सरकार आपले आहे. आपण शिक्षणमंत्री तसेच मुख्यमंत्री यांच्याकडे गाऱ्हाणे मांडू शकतो. सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी शासन काम करत आहे, तेव्हा आपले म्हणणे ऐकून सरकार दरबारी तातडीने निर्णय घेतले जातील. आपण आणि मुंबई बँक आपल्या पाठीशी ठामपणे उभी आहे. आपल्या सर्व मागण्यांना न्याय मिळवून देऊ. तसेच कष्ट करणाऱ्या महिलांना त्रास देणाऱ्या मग्रूर अधिकाऱ्यांची हक्कलपट्टी करायला लावू, असे आश्वासन यावेळी आमदार प्रवीण दरेकर यांनी दिले. पोषण आहाराचे प्रलंबित प्रश्न शिक्षणमंत्र्यांपर्यंत पोहोचवून त्यावर तातडीने आदेश मिळविल्याबद्दल महिला संस्थांच्या वतीने आमदार प्रवीण दरेकर तसेच मुंबई बँकेच्या संचालिका जयश्री पांचाळ यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी बँकेचे संचालक आनंदराव गोळे, नितीन बनकर, शिल्पा सरपोतदार, विठ्ठल भोसले उपस्थित होते.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content