HomeArchiveशाळा अद्ययावत करण्यासाठी...

शाळा अद्ययावत करण्यासाठी सहकार्य! – लायनेस मधुरा वझे

Details
शाळा अद्ययावत करण्यासाठी सहकार्य! – लायनेस मधुरा वझे

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दि एज्युकेशन सोसायटी, अंबरनाथ संचलित महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात दिलीपकुमार नीळकंठ वझे दृकश्राव्य अध्ययन कक्षाचे उद्घाटन लायनेस मधुरा वझे यांच्या हस्ते नुकतेच झाले.

बदलणाऱ्या शैक्षणिक गरजांनुसार विद्यार्थ्यांना चलचित्र आणि श्रवण या दोन्ही गोष्टींचा एकत्र उपयोग करून शिकवल्यास अवघड विषय समजण्यास सोपे होतील. आपल्या मराठी माध्यमाच्या शाळा कोणत्याही बाबतीत कमी पडू नयेत, असा विचार करून आपले दिवंगत पती अंबरनाथभूषण दिलीपकुमार वझे यांची दैदीप्यमान शैक्षणिक कारकीर्द घडलेल्या शाळेत त्यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना प्रोजेक्टर, संगणक, शैक्षणिक सॉफ्टवेअर, 80 खुर्च्या, विद्युत व्यवस्थेसह तीन वातानुकूलित यंत्रे, ध्वनी व्यवस्था, कार्पेट, पडदे, तसेच आकर्षक रंग सजावट करून सुसज्ज असे अद्ययावत दालन शाळेला अर्पण केल्याचे वझे यांनी सांगितले.

सदर दृकश्राव्य कक्ष निर्मितीसाठी लायनेस मधुरा वझे यांनी सहा लक्ष रूपये देणगीदाखल दिले. या कार्यक्रमाच्या आरंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पाटगावकर यांनी त्यांचे स्वागत व प्रास्ताविक केले. त्यानंतर शाळेचे माजी विद्यार्थी दिलीपकुमार वझे यांच्या उत्तुंग शैक्षणिक कारकिर्दीवर एक ध्वनीचित्रफीत दाखविण्यात आली. दिलीपकुमार यांच्या भगिनी रश्मी पटवर्धन, पत्नी मधुरा, चुलत बंधू डॉ. दीपक यांनी आपापली मनोगते व्यक्त केली. शेवटी शाळेचे मुख्याध्यापक धनंजय जठार यांनी आभार व्यक्त केले. स्वरदा गोखले यांनी गीत, सूत्रसंचलन स्वाती शेटे यांनी केले.

या कार्यक्रमात दिलीपकुमार वझे यांच्या भगिनी रश्मी पटवर्धन, सतीश पटवर्धन, बंधू डॉ. दीपक वझे, काकू सुनीता वझे, भगिनी जान्हवी वैद्य, लायनेस क्लब ऑफ खारच्या माजी अध्यक्षा डॉ. मंगला चव्हाण व सेक्रेटरी मंजू वर्मा, माजी विद्यार्थी सुहास पोहोनेरकर, डॉ. विवेकानंद वडके, विनायक पटवर्धन, अवधूत तेली, संस्थेचे माजी पदाधिकारी अरविंद कारखानीस, अशोक कुलकर्णी, संतोष भणगे, संस्थेचे कार्यवाह संतोष आदक, दिलीप कणसे, गोपाळ दामले, सुधींद्र शुरपाली, प्रमुख विश्वस्त नरेंद्र कुळकर्णी, विश्वस्त प्रा. भगवान चक्रदेव व केशव देशपांडे, लायन अतुल पाटील, विद्या कोप्पल आदी मान्यवर उपस्थित होते.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content