HomeArchiveशंका, कुशंका आणि...

शंका, कुशंका आणि शंख!

Details
“शंका, कुशंका आणि शंख!”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
एक होता राजा. त्याची आवडती राणी नेहमीच नाराज असायची. त्यामुळे राजाला दिवस-रात्र तिच्या नाराजीवरच विचार करावा लागत असे. राज्यकारभाराकडे हळूहळू त्याचे दुर्लक्ष होत गेले. राज्याचा खजिनाही रिकामा होऊ लागला. एका ‘परदेशी’ नामक सरदाराने राजाला एक चांगला सल्ला दिला की, राणीला समुद्राजवळ असलेला बंगला द्यावा म्हणजे राणी त्या बंगल्यात अधूनमधून राहयला गेल्या की त्यांच्या चिडचिड्या स्वभावात बदल होईल. राजाला परदेशीचा सल्ला पचनी पडला. राजाने एका ज्येष्ठ सरदाराचा समुद्राजवळील बंगला ताब्यात घेण्यासाठी त्या बंगल्यात राहणाऱ्या सरदाराला दरबारात बोलाविले. राज्याचे भवितव्य आपल्या हातात आहे. त्यासाठी राणीला तो बंगला देण्याचे आदेश राजाने त्याला दिले. त्या सरदाराने दुसऱ्या दिवशी बंगला रिकामा केला. राजाने त्या बंगल्याची डागडुजी करून घेतली आणि राणीला तो बंगला दिला.

‘प्रिय राणी, आता तुझं समाधान झालं ना?’ राणीने स्मितहास्य केले. राजा खुश झाला.. राणी उद्या अशीच खुश असेल ना ही शंकेची पाल मनात ठेवून राजाने राज्यकारभाराकडे लक्ष देण्याचा विचार केला.

‘चौकीदार चोर है’.. असे विधान करूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला शिवाजी पार्क येथील महापौरांचा बंगला दिला. त्यानंतर मोठ्या दिलाने उद्धवजींनी फक्त देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करून स्मारकाच्या जागेत गणेश पूजनाने कामाचा प्रारंभ केला. स्मारकाच्या जागेची कागदपत्रे उद्धवजींच्या हातात दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांना त्यांनी लवून नमस्कार करून सरकारचे आभार मानले. वाघाच्या तोंडात हात घालून त्याचे दात मोजणाऱ्यांची आम्ही अवलाद आहोत असे सांगणाऱ्या देवेंद्रजीने दात मोजण्याची हातघाई न करता हस्तांदोलन करण्यावर समाधान मानले. उद्धवजींनीही फारच वाकून मुख्यमंत्र्यांना नमस्कार केल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपा युती होणार असे संकेत मिळत असल्याचे दिसून आले. मात्र, युतीसाठी आम्ही मुंडावळ्या बांधून बसलो नाहीत, असे वक्तव्य करून खासदार संजय राऊत यांनी भाजपाला सवयीप्रमाणे ‘बाळकडू’ पाजले आणि युती सहज होईल असे कोणी समजू नये, असे संकेत दिले.

या कार्यक्रमात फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच होते. चंद्रकांतदादा नव्हते, मुख्यमंत्र्यांचे मर्जीतले गिरीश महाजन नव्हते. फडणवीसांच्या आजूबाजूला गिरक्या मारणारे लाडके प्रसाद लाड मात्र उपस्थित होते. स्मारकासाठी सरकारने शंभर कोटी मंजूर करून कामाला सुरूवात करा असा हिरवा कंदील दाखविला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक होणार म्हणून सेना आता भाजपासोबत राहील, अशी आशा भाजपा करत असले तरी संजय राऊत दबावतंत्राचा वापर करत आहेत आणि उद्धव ठाकरे यांचा त्यांना पाठींबा असल्याचे संकेत आहेत, असे वातावरण निर्माण करण्यात सेना यशस्वी ठरली आहे. रबर किती ताणायचा हे सर्वस्वी शिवसेनेवर अवलंबून आहे. नाहीतर भाजपासाठी राष्ट्रवादी तयार आहे हे काय लपून राहिले नाही. राजकारणात तत्त्व व सत्त्व यापेक्षा सत्ता महत्त्वाची असते. भाजपातील लालकृष्ण अडवाणी यांची जी अवस्था झाली ती सेनेची होऊ शकते.

‘बाळकडू’ आणि ‘ठाकरे’ चित्रपटात रमलेले राऊत काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. ते सेनेत असले तरी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे ते पीआरओ आहेत, ही त्यांची छबी अजून तरी सेनेमध्ये पिंगा घालत आहे. भविष्यात सेनेच्या विरोधात वातावरण तयार झाले तर ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना दसऱ्याच्या मेळाव्यात व्यासपीठावरून खाली उतरावे लागले, याची आठवण संजय राऊत यांना करून दिली पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी सध्यातरी वाघाच्या तोंडात हात घालून दात मोजण्याचे टाळले. मात्र भविष्यात राऊतसारखे नेते मांजरासारखे आडवे आले तर फडणवीस वाघाचे नाही तर राऊतांचे दात घशात घालू शकतात. अति तिथे माती झाल्यावरच हे घडेल. शेवटी सत्ता आणि तिचा मक्ता हे महत्त्वाचे आहे. राऊतजी, हा उतावळेपणा बारा नाही!

‘ठाकरे’.. चित्रपट
मनसे नेते आणि ‘ठाकरे’ चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित पानसे यांना चित्रपटाच्या विशेष खेळादरम्यान आसन न मिळाल्यामुळे मानापमानाचा अतिविशेष खेळ मुंबईत रंगला. अशावेळी असे प्रसंग घडतच असतात. प्रसिद्धीसाठी सोकावलेल्या मनसे नेत्यांना आयती संधी मिळाली आणि त्यांनी एका “रात्रीस खेळ चाले” प्रमाणे मनसे दिग्दर्शक अभिजित पानसे ‘ठाकरे’ चित्रपटास उपरोधिक शुभेच्छाचे बॅनर्स लावले आणि संकुचित वृत्तीचे दर्शन घडविले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भोवती बडवे असल्याने बाळासाहेबांची अडचण होते अशी तक्रार करत राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली. आज काय परिस्थिती आहे? राज यांचे बडवेच त्यांना अडचणीत आणत आहेत. पानसे यांनी दिग्दर्शन केलेला ‘ठाकरे’ चित्रपट मनसेमुळे होत आहे, अशा तोऱ्यात मनसे पदाधिकारी राजकारण करत असल्याने मुंबईकर नाराज झाले असून काही मनसे पदाधिकारी तर राज अमितच्या लग्नकार्यात व्यस्त असताना ‘ठाकरे’ चित्रपटावर हीन पातळीवर टीकेचा उत्सव साजरा करत असल्याबद्दल राग व्यक्त करत आहेत.

माजी मुख्यमंत्र्यांवर जबाबदारी
प्रियांका गांधी यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड झाल्यानंतर काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. इंदिरा गांधीसारख्या दिसणाऱ्या प्रियांका काँग्रेस पक्षाला उर्जावस्थेत आणतील असे काँग्रेस नेत्यांना वाटते. शेवटी काय तर नेहरू, गांधी कुटुंबाचा सदस्य असल्याशिवाय काँग्रेसमध्ये जिवंतपणा येत नाही हे राहुल गांधीनंतर प्रियांका यांच्या राजकारण प्रवेशामुळे सिद्द झाले. महाराष्ट्रात लोकसभा निवडुकीत राज्याचे तीन माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. केवळ पक्षांतर्गत असलेल्या वादावर फुंकर घालण्यासाठी तरुण नेतृत्त्वाला बाजूला ठेवून ज्येष्ठ नेत्यांची वर्णी लावण्यात आल्याबद्दल काही काँग्रेस नेते नाराज आहेत. त्यात सुशीलकुमार शिंदे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले तर अशोक चव्हाण एकटेच लोकसभेत निवडणूक जिंकले आणि काँग्रेसची इभ्रत राखली. पृथ्वीराजबाबा राज्यात अडगळीत होते. त्यांना निवडणूक प्रक्रियेत आणून त्यांच्याभोवती अस्तित्त्वाचे वलय निर्माण केले आहे. राज्यातली काँग्रेसची ही परिस्थिती भाजपाला पोषक आहे.

शरद पवारांचे वजन घटले
राजकारणात अस्तित्त्वासाठी पायाला भिंगरी लावल्यासारखे देशभर फिरणारे शरद पवार एक व्हिजन असलेले नेते आहेत. पंतप्रधानपदाचे दावेदार असलेले आणि देवेगौडासारखी संधी मिळण्याची शक्यता लक्षात घेता ते आपले व्हिजन कायम ठेवून स्वतःचं वजन कमी करत आहेत. शरद पवार मटण, मासे खाण्यात एक्स्पर्ट आहेत. दिल्लीत त्यांच्या घरी गेलात तर ते नॉनव्हेज खाण्यासाठी आग्रह करणारच… आता त्यांनी नॉनव्हेज खाणे बंद करून एका चपातीवर ते सध्या फिटनेससाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांनी १४ किलो वजन कमी केले. बघूया लोकसभा निवडणूक झाल्यानंतर मोठा पक्ष कुठला आणि छोटा पक्ष कोण या वादाला ते १४वे रत्न दाखविण्याचे कसब कसे करतील ते!”
 
“जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

महाराष्ट्राला मिळणार ४८ऐवजी ७२ खासदार?

भारतीय लोकशाहीत एक ऐतिहासिक बदल घडण्याच्या उंबरठ्यावर आहे. केंद्र सरकार "नारी शक्ती वंदन अधिनियम"मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित संशोधन विधेयकाद्वारे लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या ५४३वरून ८१६पर्यंत वाढवण्यात येईल. या ८१६ जागांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल २७३...

इराणसोबतचे युद्ध हा अमेरिकेने खेळलेला जुगार!

आज जागतिक भू-राजकारण अशा वळणावर उभे आहे जिथे लष्करी संघर्षाचा धूर थेट सामान्य माणसाच्या किचन आणि उद्योगांच्या ताळेबंदापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध केवळ लष्करी वर्चस्वाची लढाई राहिलेली नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरत आहे....

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...
Skip to content