Details
व्हीलचेअर तलवारबाजीच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी झुंजतोय संदीप गुरव
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
एखाद्या खेळाडूची जागतिक स्पर्धेसाठी निवड झाली, तर त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. परंतु रायगड जिल्ह्यातील संदीप गुरव याला मात्र या स्पर्धेला जाण्यासाठी आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत असले तरी, या स्पर्धेत भाग घेऊन नागोठणेसह रायगड, महाराष्ट्र तसेच देशाचे नाव जगभरात उंचावणारच, असा दृढ विश्वास संदीप गुरव यांनी व्यक्त केला.
दि. १५ ते २३ सप्टेंबरदरम्यान दक्षिण कोरियात होणाऱ्या व्हीलचेअर तलवारबाजी वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय संघामध्ये देशभरातील सहा खेळाडूंची निवड झाली असून त्यात महाराष्ट्रातील नागोठण्याचे संदीप गुरव आणि औरंगाबादच्या विनय साबळे या दोनच खेळाडूंचा समावेश आहे. संदीप गुरव, या पोलिओग्रस्त खेळाडूची झालेल्या निवडीने रायगडाची मान निश्चितच उंचावली गेली आहे. मात्र या स्पर्धेत भाग घेण्यासाठी गुरव यांना पहिली लढाई निधी संकलनाशी करावी लागत आहे. महाराष्ट्र राज्याच्या २०१२ च्या क्रीडा धोरणानुसार अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंना प्रशिक्षण व इतर बाबींसाठी आर्थिक सहकार्य करण्याची तरतूद असताना शासनाकडून आदेश जाहीर करताना काही जागतिक स्पर्धांना ‘पॅरा’ हा शब्द जोडण्याचे कर्तव्य न केल्याने मी भाग घेत असलेली स्पर्धा वर्ल्ड कप असूनही पॅरा हा शब्द न जोडल्याने शासनाच्या या मदतीपासून वंचित राहिलो आहे. माझ्यासारख्या महाराष्ट्रातीलच अनेक दिव्यांग खेळाडूंना अशा स्पर्धांपासून मुकावे लागत आहे, अशी खंत गुरव यांनी यावेळी व्यक्त केली.
संदीप गुरव यांनी आतापर्यंत जिद्दीच्या जोरावर तलवारबाजी खेळामध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना नुकताच महाराष्ट्र राज्यशासनाचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा शिवछत्रपती राज्य क्रीडा एकलव्य पुरस्कार मिळाला आहे. व्हीलचेअर तलवारबाजीमध्ये हा पुरस्कार मिळवणारा महाराष्ट्राचा व रायगड जिल्ह्याचा पहिला खेळाडू असल्याने रायगडच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आतापर्यंत जिल्हा, राज्य व राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय स्तरावर त्यांनी तलवारबाजी व विविध खेळांमध्ये अनेक पदके संपादित केली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवा सेवा संचालनालयाकडून २०१२ सालातील “गुणवंत खेळाडू” म्हणून, तर रायगड जिल्हा परिषदेकडून मानाचा असा रायगड भूषण पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे स्वामी सविदानंद सरस्वती राज्यस्तरीय युवा पुरस्कार, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेकडून क्रीडा रत्न तसेच जय चिंगा बुंगा अवार्ड अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. १३ ते १७ डिसेंबर २०१५ साली दुबई येथे झालेल्या जागतिक व्हीलचेअर तलवारबाजी स्पर्धेत व एशियन बिच गेममध्ये भारतीय ऑलम्पिक संघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले होते.
व्हीलचेअर तलवारबाजी हा खेळ खूप खर्चिक असून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश फी व नोंदणी फी, यासाठी १०३५००/- रूपये, व्हिसा, विमान भाडे यासाठी ६७,५०० /- असे एकूण १,७१,०००/- रूपये तसेच स्पर्धेसाठी प्रमाणित केलेली फोल्डिंग व्हीलचेअर व इलेक्ट्रॉनिक तलवारबाजीचे साहित्य यासाठी १,८०,०००/- रूपये असे एकूण ३,५१,००० /- रूपये खर्च अपेक्षित आहे. संदिप गुरव यांना कोणतेही आर्थिक पाठबळ नाही व ते आर्थिकदृष्ट्या सक्षमही नाहीत. नागोठणे विभागात अनेक महाकाय असे अनेक कारखाने आहेत. आपल्या विभागातील एखादा खेळाडू जागतिक स्पर्धेत सहभागी होत असल्याने या कंपन्यांकडून तुम्हाला काही आर्थिक मदत मिळते का, असे गुरव यांना विचारले असता, प्रत्येक आंतरराष्ट्रीय स्पर्धेपूर्वी नागोठण्यातील अनेक कंपन्यांकडे मी आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी पत्र देत आलो आहे. मात्र, एक रूपया न देता, माझी पत्रे त्यांनी कचऱ्यातच टाकली आहेत याचीच मला खंत वाटते व चीडही येते. दिव्यांग खेळाडूंना कोणीही वाली नाही, याचीच आम्हाला लाज वाटते. दिव्यांग खेळाडूंसाठी ग्रामपंचायतीने पाच टक्के निधी खर्च करावा, असे शासनाचे धोरण आहे. मी रहिवासी असलेल्या नागोठणे ग्रामपंचायतीकडेसुद्धा येणाऱ्या स्पर्धांसाठी वेळोवेळी दिव्यांगांसाठी असलेल्या तरतुदीनुसार आर्थिक सहाय्य मागितले होते.
मात्र, शासनाच्या योजनांबाबतचा क्रीडा स्पर्धा व दिव्यांगांसाठी असणारा शासनाचा निर्णय ग्रामपंचायत दप्तरी उपलब्ध नसल्याचे कारण देत माझ्या मागणीपत्राला वाटाण्याच्या अक्षताच लावण्याचे काम, रोल मॉडेल म्हणून गाजावाजा करीत असलेल्या नागोठणे ग्रामपंचायतीकडून केले जाते याची कायम खंत वाटते, असे संदीप गुरव सांगत. काहीही झाले तरी, वृद्ध आईवडिलांच्या सहकार्यातून दागदागिने गहाण टाकून या स्पर्धेला जाणारच, असा दृढ निर्धार गुरव यांनी यावेळी व्यक्त केला. अर्थसहाय्यासाठी [email protected] या इमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन केएचएलचे संपादक किरण हेगडे यांनी केले आहे.
”
“केएचएल न्यूज ब्युरो