HomeArchiveवैद्कीय क्षेत्रातील क्रिकेटपटूंचा...

वैद्कीय क्षेत्रातील क्रिकेटपटूंचा शिवाजी पार्कात थरार..

Details
वैद्कीय क्षेत्रातील क्रिकेटपटूंचा शिवाजी पार्कात थरार..

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
केईएम, सेव्हन हिल्स, कोकिळाबेन धीरूबाई अंबानी, लीलावती, ग्लोबल, ब्रीच कँडी, जसलोक, नानावटी अशा नामांकित रूग्णालयात काम करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील क्रिकेटपटूंचे सामने शिवाजी पार्क मैदानावर होत आहेत. लोकसेवा फाऊंडेशन, आयडियल स्पोर्ट्स् अकॅडमी, आयडियल क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने व माहीम जुवेलिन स्पोर्ट्स क्लब, राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि फेअर प्ले स्पोर्ट्स यांच्या सहकार्याने माजी नगरपाल व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. जगन्नाथ हेगडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे सामने 7 जूनपर्यंत होत आहेत.

अनेकदा रूग्णांची काळजी घेत असताना वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसून येते. त्यामुळे त्यांच्यात आरोग्याचे महत्त्व वाढावे तसेच इतरांनीही आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. क्रिकेट हा खेळ जनसामान्यांच्या जिव्हाळ्याचा असून त्यातून सामाजिक एकोपादेखील वाढीस लागतो. त्यामुळे हा उपक्रम स्तुत्य असल्याचे विचार डॉ. हेगडे यांनी या स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी व्यक्त केले.

स्पर्धेचे आयोजक लीलाधर चव्हाण यांनी स्पर्धकांना अधिक उत्साहाने व जिद्दीने खेळण्याचे आवाहन करतानाच प्रत्येक निर्णय हा खिलाडू वृत्तीने स्वीकारून स्पर्धेचा लौकिक वाढवावा, असे सांगितले. या स्पर्धेत एकूण 16 पारितोषिके देण्यात येणार आहेत. अंतिम विजेत्या संघाला 10 हजार रूपये व चषक, दुसऱ्या क्रमांकाला 5 हजार रूपये व चषक, उपांत्य फेरीतील दोन्ही संघ, मॅन ऑफ दी टुर्नामेंट, उत्तम फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, मॅन ऑफ दी मॅच अशी पारितोषिकेही दिली जाणार आहेत.

7 जूनला राष्ट्रीय मिल मजदूर संघात होणाऱ्या डॉ. हेगडे यांच्या वाढदिवसाच्या सोहळ्यात समारंभपूर्वक त्यांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पद्मश्री डी. वाय. पाटील, राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री दीपक केसरकर, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार अरविंद सावंत, माजी मंत्री अरूण गुजराथी, दिलीप वळसे-पाटील, हर्षवर्धन पाटील, बाळा नांदगांवकर, कृपाशंकर सिंह, आमदार आशिष शेलार व प्रसाद लाड, लायन्स क्लबचे इंटरनॅशनल प्रेसिडेंट अशोक मेहता, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर कमलेश दलाल, अरूणा ओस्वाल, प्रसाद पानवलकर आदी मान्यवर उपस्थित राहतील. डॉ. हेगडे यांना डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या वतीने डॉक्टरेट प्रदान झाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान याप्रसंगी करण्यात येणार आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content