HomeArchiveविश्वचषक मिळवण्यासाठी भारतीय...

विश्वचषक मिळवण्यासाठी भारतीय दिव्यांग क्रिकेट संघ रवाना

Details
विश्वचषक मिळवण्यासाठी भारतीय दिव्यांग क्रिकेट संघ रवाना

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेनंतर 3 ऑगस्टपासून इंग्लंडमध्येच आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट संघाचे टी – 20 चे सामने होत असून भारताचा संघ यासाठी जोरदार तयारी करत आहे. ही विश्वचषक स्पर्धा सहा देशांमध्ये होत असून 14 ऑगस्टला अंतिम सामना होईल. यासाठी भारतीय संघ 26 जुलैला इंग्लंडकडे रवाना झाला आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारतीय संघाला वाडेकर वॉरियर्स असे नाव देण्यात आले आहे. ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर फिजिकली चैलेंज्ड (AICAPC) संस्थेने यासाठी 16 खेळाडूंची संघात निवड केली आहे.

संघाचा कर्णधार विक्रांत केणी यांनी सांगितले की, आमचा संघ निश्चितपणे हा वर्ल्डकप मिळवून आपला लौकिक संपूर्ण जगभर करेल. आमची त्यानुसारच संपूर्ण तयारी झालेली आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी असून ते प्रत्येकाचा कसून सराव करून घेत आहेत. सुलक्षण मुंबई क्रिकेट टीमचे विकेटकिपरदेखील होते.

असोसिएशनचे उपाध्यक्ष विनोद देशपांडे हे संघाचे संचालक असतील. त्याचबरोबर वैद्यकीय मदतीसाठी निरंजन पंडित संघाच्या खेळाडूंची काळजी घेतील. यापूर्वी त्यांनी आईपीएल सीरीजमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी काम पाहिले होते. या संघातील खेळाडूंनी आतापर्यंत उत्तम कामगिरी केली असल्यामुळे त्यांच्याकडे समस्त भारतीयांचे लक्ष लागले आहे. मीनल पोतनीस मनाच्या एकाग्रतेसाठी फेस योगा, डॉ. फाटक आणि डॉ. सूरज हे ऑस्टिओपथीसाठी आणि अँटीडोपिंग सूचना या पातळ्यांवरदेखील खेळाडूंना प्रशिक्षण दिले जात आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content