HomeArchiveवक्फ मंडळाला पूर्णवेळ...

वक्फ मंडळाला पूर्णवेळ सीईओ द्या, हाजी अरफात शेख यांची मागणी

Details
“वक्फ मंडळाला पूर्णवेळ सीईओ द्या, हाजी अरफात शेख यांची मागणी”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

राज्याच्या वक्फ मंडळात मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार सुरू असून याला चाप लावण्यासाठी वक्फ मंडळासाठी पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) नेमावा, अशी मागणी अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी बुधवारी वक्फ खात्याचे मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली.

मागील आठवड्यात पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करून आल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे तयार केलेला अहवाल आणि तेथील समस्या अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी या विभागाचे मंत्री विनोद तावडे यांच्यासमोर मांडल्या. त्यानंतर त्यांनी अल्पसंख्याक विभागाच्या विविध समस्या आणि वक्फ मंडळाबद्दल मुस्लिम समाजाच्या असलेल्या तक्रारी याचा पाढाच वाचला. यानंतर अल्फसंख्याक विभागाचे सह सचिव तसेच मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ संदेश तडवी यांना मंत्रीमहोदयांनी चांगलेच फैलावर घेतले. यापुढे वक्फ मंडळावर होणाऱ्या नेमणुका नियमित स्वरूपाच्या व्हाव्यात त्याचप्रमाणे जबाबदार लोकांनाच मंडळावर नियुक्त करावी जेणेकरून वक्फ जमिनींचा घोटाळा बाहेर निघू शकेल, असे ते म्हणाले.

सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान समजलेल्या उर्दू घराच्या विषयावरदेखील चर्चा झाली. या चर्चेनंतर विनोद तावडे यांनी उर्दू घराचे काम लवकरात लवकर कसे होईल या संदर्भातील निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.”
 
“राज्याच्या वक्फ मंडळात मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार सुरू असून याला चाप लावण्यासाठी वक्फ मंडळासाठी पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) नेमावा, अशी मागणी अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी बुधवारी वक्फ खात्याचे मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली.

मागील आठवड्यात पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करून आल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे तयार केलेला अहवाल आणि तेथील समस्या अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी या विभागाचे मंत्री विनोद तावडे यांच्यासमोर मांडल्या. त्यानंतर त्यांनी अल्पसंख्याक विभागाच्या विविध समस्या आणि वक्फ मंडळाबद्दल मुस्लिम समाजाच्या असलेल्या तक्रारी याचा पाढाच वाचला. यानंतर अल्फसंख्याक विभागाचे सह सचिव तसेच मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ संदेश तडवी यांना मंत्रीमहोदयांनी चांगलेच फैलावर घेतले. यापुढे वक्फ मंडळावर होणाऱ्या नेमणुका नियमित स्वरूपाच्या व्हाव्यात त्याचप्रमाणे जबाबदार लोकांनाच मंडळावर नियुक्त करावी जेणेकरून वक्फ जमिनींचा घोटाळा बाहेर निघू शकेल, असे ते म्हणाले.

सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान समजलेल्या उर्दू घराच्या विषयावरदेखील चर्चा झाली. या चर्चेनंतर विनोद तावडे यांनी उर्दू घराचे काम लवकरात लवकर कसे होईल या संदर्भातील निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.”

Continue reading

दिल्ली विधानसभा परिसरात मुखवटाधारी व्यक्तीकडून सुरक्षेची ऐसीतैशी

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या विधानसभा संकुलात सोमवारी दुपारी सुरक्षेचा मोठा भंग झाल्याची खळबळजनक घटना घडली. एका मुखवटाधारी व्यक्तीने पांढऱ्या रंगाच्या 'टाटा सफारी' कारने विधानसभेचे लोखंडी गेट तोडून आत प्रवेश केला. विशेष म्हणजे, या व्यक्तीने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाबाहेर पुष्पगुच्छ ठेवला...

माझा एकच बाप – बाळासाहेब ठाकरे!

माझा एकच बाप - बाळासाहेब ठाकरे! आम्ही "मार्मिक"मुळे घडलो. आमची राजकीय जडणघडण "मार्मिक"मुळे आकाराला आली. जुना स्टँड, जळगाव जाऊन आम्ही मार्मिक घ्यायचो, तेव्हा सामनासुद्धा दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी यायचा. मार्मिक आम्ही 100% वाचून काढायचो. अशी माध्यमे हवीत, समाज घडवणारी अन् माणसे...

महाराष्ट्र भाजपाने फुंकला 2029च्या निवडणुकीचा शंख!

देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या विचारधारेविषयी विश्वासाचे, सकारात्मक वातावरण आहे. या वातावरणाचा योग्य वापर करून घेण्यासाठी कालबद्ध रीतीने कार्यक्रम आखून 2029चा संपूर्ण यशाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी काम करावे, आणि देशभक्ती, राष्ट्रीयत्व आणि...
Skip to content