HomeArchiveरीअर ॲडमिरल अतुल...

रीअर ॲडमिरल अतुल आनंद एनडीएचे प्रमुख प्रशिक्षक!

Details

 
hegdekiran17@gmail.com
 
“रिअर ॲडमिरल, अतुल आनंद यांची 1988 साली भारतीय नौसेनेच्या एक्झिक्युटिव्ह शाखेत नेमणूक झाली. नेव्हीगेशन आणि दिशादर्शन क्षेत्रातील विशेषज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे.”
 
“रिअर ॲडमिरल आनंद हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (71 बॅचचे) माजी विद्यार्थी असून डिफेन्स सर्व्हीसेस कमांड आणि स्टाफ कॉलेज, बांगला देश आणि नवी दिल्लीतील राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय येथेही त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. युएसएमधल्या हवाई येथील प्रतिष्ठित आशिया पॅसिफीक सेंटर फॉर सिक्युरीटी स्टडीज येथून त्यांनी प्रगत संरक्षण सहकार्य प्रशिक्षणही घेतले आहे. त्यांनी टॉरपेडो रिकव्हरी व्हेसल A72, क्षेपणास्त्र नौका आयएनएस चातक, कॉरव्हेट आयएनएस खुक्री आणि डिस्ट्रॉयर आयएनएस मुंबई यांचे यशस्वी नेतृत्त्वही केले आहे.”
 
“आयएनएस चातकला युनिटचे प्रशस्तीपत्र तर आयएनएस मुंबई हे पश्चिम विभागाच्या ताफ्यातील सर्वोत्तम जहाज म्हणून निवडले गेले होते. त्यांनी सी हॅरिअर स्क्वॅड्रन आयएनएस 300साठी दिशादर्शक अधिकारी तर डिस्ट्रॉयर आयएनएस दिल्लीसाठी कार्य प्रबंधक म्हणूनदेखील सेवा बजावली आहे. त्यांनी सहाय्यक संचालक कार्यालयीन निवड, संरक्षण सेवा स्टाफ कॉलेज निदेशक वेलिंग्टन, नेव्हल इंटेलिजन्स ऑपरेशन्स संचालक, प्रमुख संचालक नेव्हल ऑपरेशन्स, आदी महत्त्वपूर्ण कार्यालयीन पदेही भूषविली आहेत. याआधी ते संरक्षण मंत्रालयाच्या (नौदल) नवी दिल्लीतील एकात्मिक मुख्यालयाचे (विदेश सहकार्य आणि इंटेलीजन्स) सहाय्यक प्रमुख म्हणून कार्यरत होते. सध्या रीअर ॲडमिरल अतुल आनंद (विशिष्ट सेवा मेडल) यांनी पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए)चे डेप्युटी कमांडंट आणि प्रमुख प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारला आहे.”

Continue reading

इराणच्या गुप्तचर प्रमुखाचा मृत्यू! तात्पुरत्या युद्धविरामाला नकार!!

इराणच्या सुरक्षायंत्रणेला सोमवारी मोठा हादरा बसला आहे. रिव्होल्युशनरी गार्ड्सचे (आयआरजीसी) गुप्तचर प्रमुख मजीद खादेमी यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले असून, यामुळे इराणच्या लष्करी नेतृत्त्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. खादेमी यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात असले तरी,...

सुनेत्रा पवारांनी केला प्रचाराचा शंखनाद

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या राजकीय रणधुमाळीत सोमवारी एक महत्त्वाचा टप्पा पार पडला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे सुपूर्द केला. या अर्जाद्वारे त्यांनी बारामतीच्या राजकीय रिंगणात आपली दावेदारी निश्चित केली असून, यावेळी समर्थकांमध्ये मोठा उत्साह...

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूला ‘खराती’ वळण?

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीला आता एक वेगळे वळण मिळाले असून तपासात काही धक्कादायक दुवे समोर आले आहेत. २८ जानेवारी रोजी झालेल्या या दुर्दैवी दुर्घटनेच्या संदर्भात नवीन माहिती उजेडात आल्याने, या प्रकरणातील गूढ अधिक वाढले...
Skip to content