HomeArchiveराहुळ शेवाळेंचे काम...

राहुळ शेवाळेंचे काम येऱ्यागबाळ्याचे नव्हे – उद्धव ठाकरे

Details
राहुळ शेवाळेंचे काम येऱ्यागबाळ्याचे नव्हे – उद्धव ठाकरे

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये राहुल शेवाळे यांनी जे काम केलं, ते येरागाबाळ्याचं काम नाही. आणि या कामासाठी राहुल, तुला धारावीच्या अनेक पिढ्या आशीर्वाद देतील, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धारावीतल्या सभेत उत्तर-मधय मुंबई लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांची पाठ थोपटली.

रविवारी शेवाळे यांच्या प्रचारासाठी धारावीच्या 90 फिट रोडवर घेण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. या सभेला रश्मी ठाकरे, शिवसेना ज्येष्ठ नेते लीलाधर डाके, आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, मंगेश सातमकर, आमदार तमिळ सेलवन, तुकाराम काते, प्रकाश फातर्फेकर, सदा सरवणकर, आरपीआयचे नेते अविनाश महातेकर, सिद्धार्थ कासारे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अनिल ठाकूर, राजेश शिरवाडकर, महिला सचिव दिव्या ढोले, कामिनी शेवाळे आदी उपस्थित होते.

धारावीच्या सभेत ठाकरे यांनी शेवाळे यांच्या पाच वर्षांतील कामाची स्तुती केली. राहुलचा जन्म धारावीत झाल्याने त्याला धारावीच्या प्रश्नांची जाण आहे. त्यामुळेच खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये धारावीच्या विकासाआड येणारे फनेल झोन आणि इतर समस्या राहुलने सोडवल्या. एसपीव्ही, स्मार्ट सिटी अशा अनेक माध्यमातून धारावीचा पुनर्विकास करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या कामगिरीमुळे धारावीचा पुनर्विकास लवकरच होईल आणि मी इथे उद्घाटनासाठी येईन, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.

आम्ही विजयाचे झेंडे फडकवले, कारण आमच्यासोबत आहेत रामदास आठवले. हा उत्साह आणि मजबुती मला 29 तारखेला दिसली पाहिजे. धारावीतून मला विजयाचे फटाके फुटताना पाहयचे आहे. धारावीतील शिवसैनिक निष्ठेने भगवा हातात पकडून आहेत. नगरसेवकाची कारकीर्द उत्तमरित्या पार पडल्याने राहुल शेवाळे यांना लोकसभेची संधी दिली आहे. धारावी शेवाळे यांची जन्मभूमी असल्याने धारावीकरांचा त्यांना पाठिंबा आहे, असे ते म्हणाले.

इतरांनी धारावीतून निवडून येऊन फक्त थापा मारल्या. मुंबईची निगा राखणारे लोक धारावीत राहतात. यांची निगा आपल्याला राखायची आहे. शिवसेनेचा शब्द आहे. योजना फक्त कागदावर राहणार नाहीत. त्या अंमलात आणल्या जातील. या मतदारसंघातल्या प्रकल्पांच्या भूमिपूजनाला मी स्वतः हजर राहीन. राहुल शेवाळे यांनी धारावीला ब्रँड दिला आहे- मेड इन धारावी. धारावीतील वस्ती सुधारावी ही शिवसेनेची इच्छा आहे, से ते म्हणाले.

आम्ही जे वचन देतो ते पूर्ण करतो म्हणून गेली २५ वर्ष शिवसेनेची सत्ता मुंबई महानगरपालिकेवर आहे. केंद्रात करामध्ये 40 टक्के भार मुंबई आणि महाराष्ट्र उचलते. मुंबईत रस्ते विकासासाठी लागणाऱ्या परवानग्यांसाठी, जलद विकास करण्यासाठी राहुल मला खासदार म्हणून लोकसभेमध्ये पाहिजेत. पन्नास-साठ वर्षांत काँग्रेसने देशावर दरोडा घातला. देशातील जनता काँग्रेसवाल्यांचा भ्रष्टाचार कधी विसरू शकत नाही. काँग्रेसवाल्यांनी अतिरेक्यांना पुन्हा पाकिस्तानात सोडून दिले. युती सरकारने पाकिस्तानात घुसून मात्र त्यांचा पाडाव केला. देश कोणाच्या हातात द्यायचा याचा विचार करा, असेही ठाकरे यांनी बजावले.

युतीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आहेत. तसे तुमचे उमेदवार कोण? महाआघाडीला सत्ता द्यायला त्यांच्याकडे काही ध्येयधोरणे आहेत का? चांगला उमेदवार आहे का? युतीचा जाहीरनामा पाहा आणि आघाडीचा पाहा. देशद्रोहावरचे कलम काँग्रेसवाले काढून टाकणार आहेत आणि आम्ही देशद्रोह्यांना गाडून टाकणार आहोत. शिवरायांनी कधीही गद्दारांना माफ केले नाही, असेही त्यांनी सांगितले.

विजयाची कुस्ती मारावी

राहुल शेवाळे यांनी विजयाची कुस्ती मारावी. कारण त्यांच्या पाठी आहे धारावी. एकनाथ गायकवाड आणि ही कुस्ती हवी. कारण त्यांच्या पाठीशी नाही धारावी. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडवणीस यांनी आपले वाद कायमचे मिटवले. कारण त्यांच्या पाठी होते रामदास आठवले. शिवशक्ती आणि भीमशक्तीला बाळासाहेबांनी नटवले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला आम्ही हटवले. काँग्रेस-राष्ट्रवादीवाले तुम्ही करू नका नखरे. राहुल शेवाळे तुम्हाला लोकसभेत पाठवणार आहेत उद्धव ठाकरे, अशा चारोळ्या करत रामदास आठवले यांनी उपस्थितांना शेवाळे यांना मत देण्याचे आवाहन केले.

शिवसेना नेते लीलाधर डाके म्हणाले की, राहुल शेवाळे आपली बऱ्याच वर्षांपासून समाजसेवा करत आहेत. शरद ऋतुतले मेघ फक्त गर्जना करतात. पाऊस नाही पडत. तसेच विरोधक फक्त गर्जना करतात. शेवाळे यांना स्वतःच्या कृतीवर विश्वास आहे. प्रचंड मतांनी त्यांना विजयी करा.

महायुतीचे उमेदवार शेवाळे यांनी या सभेत, धारावी पुनर्विकासासाठी केलेल्या कामांची माहीत देत काँग्रेसच्या उमेदवारांवर सडकून टीका केली. मी तेरा वर्षांचा असताना गायकवाड आमदार झाले. 30-40 वर्षं गायकवाड कुटुंबियांनी स्वतःचा विकास केला, मात्र धारावीचा विकास केला नाही. ‘क्या हुआ तेरा वादा?’ हा प्रश्न विचारायला गायकवाड यांना लाज वाटायला हवी. शिवसेना वादा नाही, तर वचन देते आणि ते वचन शिवसेना पाळते. येत्या 29 तारखेला जनताच गायकवाड यांना त्यांच्या वाद्याची आठवण करून देईल, अशा शब्दांत त्यांनी गायकवाड यांना आव्हान दिले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

महाराष्ट्राला मिळणार ४८ऐवजी ७२ खासदार?

भारतीय लोकशाहीत एक ऐतिहासिक बदल घडण्याच्या उंबरठ्यावर आहे. केंद्र सरकार "नारी शक्ती वंदन अधिनियम"मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित संशोधन विधेयकाद्वारे लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या ५४३वरून ८१६पर्यंत वाढवण्यात येईल. या ८१६ जागांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल २७३...

इराणसोबतचे युद्ध हा अमेरिकेने खेळलेला जुगार!

आज जागतिक भू-राजकारण अशा वळणावर उभे आहे जिथे लष्करी संघर्षाचा धूर थेट सामान्य माणसाच्या किचन आणि उद्योगांच्या ताळेबंदापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध केवळ लष्करी वर्चस्वाची लढाई राहिलेली नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरत आहे....

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...
Skip to content