Details
राष्ट्रीय व्हायरल हिपेटायटीस कार्यक्रमाचा राज्यस्तरीय शुभारंभ!
01-Jul-2019
”
वैभव मोहन पाटील
[email protected]
कर्करोग, एचआयव्ही, टीबी यासारखे आजार अत्यंत गंभीर स्वरूपाचे मानले जातात. या आजाराची लागण झालेल्या रूग्णास विशेष उपचारांची गरज भासते. याच आजारांमध्ये काहीसा दुर्लक्षित मात्र सायलेंट किलर असा आणखी एक आजार आहे आणि तो म्हणजे हिपेटायटीस. भारतात सुमारे चार कोटी हिपेटायटिस बी तर जवळपास ६० लाख ते १.२ कोटी हिपेटायटिस सीचे रूग्ण असल्याचा अंदाज आहे. या रूग्णांना यकृत संबंधित आजार व कर्करोग होण्याचा मोठा धोका आहे. जगभरात दरवर्षी सुमारे साडेतेरा लाख लोक सर्व प्रकारच्या विषाणूजन्य काविळीमुळे म्हणजेच व्हायरल हिपाटायटिसने मृत्यूमुखी पडतात. विषाणूजन्य काविळीमुळे होणाऱ्या मृत्यूचे हे प्रमाण जवळपास टीबीएवढे आहे, तर ते एड्सपेक्षाही जास्त आहे. कावीळ हा मुख्यत्वे यकृताचा आजार आहे. यकृतामध्ये बिघाड झाला की, लघवी पिवळी होणे, डोळे पिवळे होणे अशी लक्षणे दिसू लागतात. म्हणजेच त्याला कावीळ झाली असे म्हटले जाते. मुख्यत्वे लिव्हरला होणाऱ्या विषाणू संसर्गामुळे कावीळ होते. लिव्हरला संसर्ग करणारे पाच प्रकारचे विषाणू म्हणजे हिपेटायटिस ए, बी, सी, डी आणि ई. दूषित अन्नपाण्यामुळे होणाऱ्या काविळीने (ए आणि ई) होणारे मृत्यू केवळ 4 टक्के आहेत, तर जवळपास 96 टक्के मृत्यू हे बी आणि सी प्रकारच्या काविळीमुळे होतात. बी आणि सी विषाणूमुळे यकृताला दीर्घकाळ बाधा होऊन रूग्णाच्या जीवाला धोका उत्पन्न होतो.
जगात साधारणतः 32 कोटी म्हणजे अमेरिकेच्या लोकसंख्येएवढे लोक बी आणि सी विषाणूबाधित आहेत आणि वाईट म्हणजे यातील 29 कोटी रूग्ण आपल्याला झालेल्या ह्या आजाराबाबत अनभिज्ञ आहेत. भारतात जवळपास 6 कोटी लोकांना बी आणि सी विषाणूंनी घेरले आहे. हे दोन्ही विषाणू लिव्हर कॅन्सरसाठी मुख्यत्वे कारणीभूत आहेत. महाराष्ट्रातही हिपाटायटिस बीचे प्रमाण लोकसंख्येच्या 2-3 टक्के तर हिपाटायटिस सीचे प्रमाण 0.5 ते 1 टक्का एवढे आहे. या आजारांच्या उपचाराबाबत लोकांमध्ये जागृती नाही तसेच महागड्या उपचारपद्धतीमुळे या आजारांवर नियंत्रण मिळविण्यात अडचणी येत आहेत. केंद्र सरकारने मागील वर्षी राष्ट्रीय कावीळ नियंत्रण कार्यक्रम सुरू केला असून हिपेटायटिस सी या आजाराचे 2030 पर्यंत निर्मूलन करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रात विविध ठिकाणी उपचार केंद्रेदेखील सुरू करण्यात आली आहेत. २८ जुलै या “जागतिक हिपेटायटिस दिनाचे” औचित्य साधून हिपेटायटिस नियंत्रणासाठी राज्यात आठ विभागीय उपचार केंद्र सुरू करण्यात आली असून सर्व जिल्हा रूग्णालयात हिपेटायटिस तपासणी व उपचार सेवा देण्यात येणार आहेत. या दिनाच्या निमित्ताने 28 जुलै 2019 रोजी राष्ट्रीय व्हायरल हिपेटायटिस कार्यक्रमाचा राज्यस्तरीय शुभारंभ राज्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांच्या हस्ते मुंबईतील सायन रूग्णालयात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत उपचार पद्धती व इतर माहितीसाठी टोल फ्री क्रमांक १८००-११-६६६६ चा शुभारंभदेखील प्रात्यक्षिकासह केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते झाला.
सायन रूग्णालयातील लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय सभागृहात सम्पन्न झालेल्या या कार्यक्रमादरम्यान हिपेटायटीसबद्दल अधिकृत माहिती व रूग्णांना मदत उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. राज्यात हिपेटायटिसच्या उपचारासाठी पुरेसा साठा उपलब्ध असून सायनमधील लोकमान्य टिळक मनपा रूग्णालय संदर्भित सेवा देण्यासाठी केंद्र बिंदू असणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. आरोग्य विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे व जनतेच्या सहकार्यामुळे आपण देशातून पोलिओचे उच्चाटन करण्यास यशस्वी झालो आहोत. त्याचप्रमाणे राज्याचा आरोग्य विभाग, केंद्र शासन, महानगरपालिका यांच्या एकत्रित प्रयत्नांनी व जनतेच्या सहकार्याने आपण हिपेटायटिसवर नियंत्रण मिळविण्यासदेखील नक्की यशस्वी होऊ हा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला. भारतात महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यांमध्ये मोफत निदान, उपचार व औषधे असा हिपेटायटिस नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत असून उर्वरित सर्व राज्यांमध्येदेखील लवकर याचा शुभारंभ करण्यात येणार आहे. २०३० पर्यंतचे हिपेटायटिस निर्मूलनाचे ध्येय आहे. हे लक्ष्य २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचा मानस केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी व्यक्त केला.
आपल्या भाषणात त्यांनी स्वच्छतेचे महत्त्व उदाहरणांसह विषद करून आरोग्यासह विविध क्षेत्रांत मोदी सरकार करत असलेल्या विकासाची प्रशंसा केली. देश हिपेटायटिसमुक्त करण्यासाठी केंद्र शासन प्रयत्नशील असून महाराष्ट्र शासनाने यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकस्पद असल्याचे मत व्यक्त करून त्यांनी राज्याबद्दल गौरवोद्गार काढले. या कार्यक्रमात, हिपेटायटीस नियंत्रण चित्र प्रदर्शनाचे व हिपेटायटिस ट्रेनिंग मॉडल सेंटरचे उदघाटन करण्यात आले. तसेच हिपेटायटीस नियंत्रण कार्यक्रमांतर्गत प्रोग्रॅम मॅनेजमेंट सिस्टम माहिती पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. ह्या कार्यक्रमास स्थानिक आमदार तमिल सेल्व्हन, राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण सहसचिव विकास शिल, आरोग्यसेवा आयुक्त डॉ. अनुप कुमार यादव, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक तात्याराव लहाने, लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी हेंक बेकेडाम यांच्यासह केंद्र शासन व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच डॉक्टर्स, एएनएम व कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
आता आपण राष्ट्रीय कावीळ नियंत्रण कार्यक्रमाबाबत थोडी अधिक माहिती पाहू. हिपाटायटिस बी या आजाराकरिता उपलब्ध असणारी लस बाळाला जन्मल्याबरोबर देण्यात येते. त्यासोबतच साडेतीन महिन्यांच्या आत पुढील डोस देण्यात येतात. ही लस बी प्रकारची कावीळ रोखण्यास उपयुक्त ठरते. स्वछता, पिण्याचे स्वच्छ पाणी या उपाययोजनांमुळे दूषित अन्नपाण्यावाटे पसरणाऱ्या काविळीचा प्रतिबंध करता येतो. रक्तपेढ्यांत संकलित होणारे रक्त हिपाटायटिस बी किंवा सी बाधित असू नये याकरिता रक्ताची चाचणी करण्यात येते. ऐच्छिक रक्तदात्यांमार्फत अधिकाधिक रक्तदान केले जावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. बऱ्याच रूग्णांना आपल्याला हिपेटायटिस म्हणजे विषाणूजन्य कावीळ झाली आहे याची कल्पनाच नसते. यामुळेच फाइंड मिसिंग मिलियन हे या दिवसाचे घोषवाक्य ठेवण्यात आले आहे. राज्य कावीळमुक्त करण्याचा आरोग्य विभागाचा मानस असून हिपेटायटिससारख्या लहान विषाणूवर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केंद्र व राज्य सरकारच्या वतीने करण्यात येत आहेत. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी हे नक्कीच शक्य होणार आहे.”
“वैभव मोहन पाटील