HomeArchiveराज सुर्वे ठरला...

राज सुर्वे ठरला “जुनिअर भारत श्री”!

Details
राज सुर्वे ठरला “जुनिअर भारत श्री”!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
बोरिवलीच्या आदित्य आर्किटेक्चर महाविद्यालयात शिकणाऱ्या राज सुर्वे, याने जम्मूत नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय जुनिअर शरीरसौष्ठव स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळवत “जुनिअर भारत श्री” हा बहुमानाचा किताब पटकावला.

आपल्या या यशानंतर राज याने मुंबईत परतताच मातोश्री निवासस्थानी जाऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेतले. उद्धव ठाकरे यांनी राज याला भविष्यातल्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि मराठी मातीचा व महाराष्ट्राचा मान राष्ट्रीय क्रीडाक्षेत्रात मोठा केल्याबद्दल राजचे कौतुक केले. बोरिवलीकर नागरिकांनीही आपल्या या पराक्रमी भूमिपुत्रांच्या यशाबद्दल त्याची ढोल-ताशांच्या गजरात मोठी मिरवणूक काढली तर विमानतळावर येताच त्याच्या चाहत्यांनी जोरदार स्वागत केले.

खूप मोठा हो, क्रीडा क्षेत्रातील चमकदार कामगिरीने महाराष्ट्राचे आणि देशाचे नाव उज्ज्वल कर! असे आशीर्वाद शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी “जुनिअर भारत श्री” किताब पटकावणाऱ्या मुंबईचा शरीरसौष्ठवपटू राज सुर्वे याला नुकत्याच मातोश्री निवासस्थानी येथे झालेल्या भेटीत आशिर्वाद दिले. राज हा शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा आहे. यावेळी आमदार प्रकाश सुर्वे, आमदार व विभागप्रमुख विलास पोतनीस उपस्थित होते.

आर्किटेक्चरच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या राज याने मोठ्या परिश्रमाने मुंबई श्री ते जुनिअर भारत श्री, किताबापर्यंत मजल मारली आहे. आपला अभ्यास सांभाळून तो सध्या रोज 8-8 तास व्यायाम करतो आणि योग्य आहाराबाबतचे काटेकोर पालन करतो. मुंबईत झालेल्या स्पर्धेत त्याने ‘मुंबई श्री’ तर पुण्यातील शरीरसौष्ठव स्पर्धेत ‘महाराष्ट्र श्री’ किताब पटकावला होता. जम्मूतील जुनिअर राष्ट्रीय शरीसौष्ठव स्पर्धेत राज याने 21 राज्यांतील 210 स्पर्धकांशी स्पर्धा करत जुनिअर ‘भारत श्री’ किताबाला गवसणी घातली आहे. आपल्या या उज्ज्वल यशाचे श्रेय राज आपले कुटुंबीय, आपल्या कॉलेजच्या प्राचार्या रीटा नाईक, आयबीबीएफचे सचिव संजय मोरे, प्रशिक्षक विशाल सावंत, मेंटॉर मंदार आगवणकर, नरेंद्र कदम आणि आदित्य आर्किटेक्चर कॉलेजच्या एचओडी तृप्ती बिस्वास यांना देतो. या सर्वांच्या सहकार्यामुळेच आपण शरीरसौष्ठव क्षेत्रात एवढे मोठे यश मिळवू शकलो, असे त्याने सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content