Details
राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या उपस्थितीत फुल-झाडे व आयुर्वेदीक वनौषधी लागवड! गुलाबी थंडीत उपस्थितांनी घेतला हुरडाचा आस्वाद
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्यरो
जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात नवनवीन कल्पना राबवून सतत जोगेश्वरीच्या सौंदर्यात अधिकाधिक भर घालण्यासाठी विधानसभेचे आमदार व राज्यमंत्री रविंद्र वायकर सतत प्रयत्न करत असतात. याचाच एक भाग म्हणtन वायकर यांनी १३ जानेवारीला माँसाहेब मीनाताई ठाकरे शिल्पग्राम उद्यानात सकाळी ८ वाजता फुलझाडे व वनऔषधी वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला. त्यात जोगेश्वरीतील जनता मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. काही महिन्यांपूर्वीच मुंबईतल्या जोगेश्वरी पूर्व येथील पूनमनगर येथे माँसाहेब मीनाताई ठाकरे शिल्पग्राम उद्यान जनतेसाठी खुले करण्यात आले आहे. दरदिवशी तसेच सुट्टीच्या दिवशी हजारो पर्यटक या उद्यानाला भेट देत असतात. या उद्यानात फुलपाखरांना आकर्षित करणारी सुमारे साडेतीनशे फुलझाडे व आयुर्वेदिक वनौषधीची लागवड करण्यात आली. त्याचबरोबर फळझाडेही लावण्यात आली. यामुळे शिल्पग्राम उद्यानाच्या सौंदर्यात अधिक भर पडली आहे.
या वृक्षारोपणाच्या मोहिमेत जोगेश्वरीतील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या सुमारे दोनशे निसर्गप्रेमींनी सकाळच्या गुलाबी थंडीत रविंद्र वायकर यांनी खास गुजरातवरून मागविलेला हुरडा व चहाच्या मेजवानीचा आस्वाद घेतला. एवढेच नव्हे तर हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबई महानगरपालिकेतर्फे संपूर्ण मुंबईत ‘माझी मुंबई’ या विषयावर आयोजित चित्रकला स्पर्धेत शहीद विजय साळस्कर उद्यानात उपस्थित महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची राज्यमंत्री वायकर यांनी भेट घेतली व विद्यार्थ्यांना काढलेल्या चित्रांची पाहणीही केली.
राज्यमंत्री वायकर यांच्या १८ जानेवारीला असलेल्या ६० व्या वाढदिवसाचे औचित्य साधत जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात आयोजित करण्यात आलेल्या ‘ बुद्धिबळ’ स्पर्धेचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेतही शेकडो विद्यार्थी सहभागी झाले. याप्रसंगी विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, रचना सावंत, नगरसेवक अनंत नर, प्रवीण शिंदे, सदानंद परब, रेखा रामवंशी, डॉ. राहुल महाले, डॉ. पोतनीस, डॉ. अमेय पोतनीस उपस्थित होते.”
“केएचएल न्यूज ब्यरो