Details
`राजा’ आणि `दादा’!
01-Jul-2019
”
नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन भाग्यवान पुतणे कोण असतील तर ते म्हणजे राज ठाकरे आणि अजितदादा पवार होय. यापैकी राज हे अत्यंत कमी वयात राजकारणात आले. भारतीय विद्यार्थी सेनेचे त्यांनी यशस्वी नेतृत्त्व केले. 1995 साली महाराष्ट्रात युतीचे शासन आले त्यावेळी राज ऐन भरात होते. निवडणुकीआधी त्यांनी महाराष्ट्राचा झंझावती दौरा केला होता. तरूणांना संघटित केले होते. शिवसेनेची ताकद वाढविली होती. सारांश, युतीच्या विजयात त्यांचादेखील महत्त्वाचा वाटा होता. पण शिवसेना सत्तेवर येऊनही त्या सत्तेचा आनंद राज यांना दीर्घकाळ लुटता आला नाही. शिवसेनेतून बाहेर पडलेले आणि शिवसेनेचे हाडवैरी बनलेले छगन भुजबळ हे त्यांच्यामागे हात धुवून लागले. त्यांनी किणी प्रकरण उकरून काढले. राज ठाकरे यांच्यावर रमेश किणी यांच्या अपहरणाचा आणि हत्त्येचा गंभीर आरोप ठेवण्यात आला. राज्यात युतीची सत्ता असतानाही राज यांच्यामागे कायद्याचा ससेमिरा लागला. `सामना’च्या कार्यालयात जाऊन पोलीस राज यांची चौकशी करीत असल्याचे विचित्र चित्र पाहावयास मिळाले. राज यांच्या सुदैवाने ते या प्रकरणातून निर्दोष सुटले. पण दरम्यानच्या काळात त्यांना बराच मनस्ताप सहन करावा लागला.
राजकारण किती गलिच्छ असते हे पाहता आले. त्यानंतर युतीची सत्ता गेली. पण राज ठाकरे यांची डोकेदुखी काही कमी झाली नाही. त्यांचा शिवसेनेतील प्रभाव हळूहळू कमी होऊ लागला. त्यांचे चुलतबंधू उद्धव ठाकरे यांचा राजकीय क्षितिजावर उदय झाला. साहजिकच राज यांचे महत्त्व कमी झाले. त्यांना जड अंत:करणाने शिवसेना सोडावी लागली. नवा पक्ष स्थापन करावा लागला. `जो नाही झाला काकांचा, तो काय होणार लोकांचा?’ अशा टीकात्मक घोषवाक्याला तोंड द्यावे लागले. पण पक्ष स्थापन केल्यानंतर 2009 साली झालेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत त्यांनी तब्बल 13 आमदार निवडून आणले. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा दबदबा निर्माण झाला. तथापि, 2014 च्या निवडणुकीत मात्र त्यांचा फक्त एक आमदार विधानसभेवर निवडून गेला. साहजिकच राज ठाकरे यांचे महत्त्व पुन्हा कमी होऊ लागले. पण गेल्या काही दिवसांत राजकारणातील एका मोठ्या काकांनी राज यांना जवळ केले आणि राज यांचे महत्त्व पुन्हा वाढले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आणि राज ठाकरे यांची जवळीक आता महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय बनली आहे. या पार्श्वभूमीवर पवारांचे पुतणे अजितदादा यांनी राज ठाकरे यांना घातलेली साद महत्त्वाची ठरत आहे. मतांचे विभाजन टाळण्यासाठी राज ठाकरे यांनी आपल्यासोबत यावे, असे आवाहन अजितदादांनी त्यांना केले आहे. या आवाहनाला राज यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, हे उघड आहे. पण आघाडीतील प्रमुख पक्ष असलेला काँग्रेस राज यांना सोबत घेईल का, हा खरा प्रश्न आहे. राज यांच्याशी जवळीक करून उत्तर भारतीय मते गमाविण्याची काँग्रेसची इच्छा नसणार. त्यातच प्रियांका गांधी यांच्या राजकारण प्रवेशामुळे उत्तर प्रदेशात काँग्रेसला सुगीचे दिवस येतील, असे भाकीत केले जाऊ लागले आहे. काँग्रेसने राज यांच्या मनसेशी चुंबाचुंबी केल्यास उत्तर भारतीय मते काँग्रेसला गमवावी लागतील, अशीदेखील भीती काँग्रेसचे नेते व्यक्त करीत आहेत. मग अजितदादा यांनी कोणाच्या भरवशावर राज यांना आपल्यासोबत येण्याचे आवाहन केले? राज आणि अजितदादा यांच्यातील महत्त्वाचे साम्य म्हणजे दोघेही बड्या काकांचे पुतणे आहेत. दोघेही तोंडाने फाटके आहेत. आत एक आणि बाहेर एक असे त्यांना जमत नाही. राजकारणात हे चालत नाही. पण दोघांचेही त्यावाचून काही अडत नाही. किंबहुना, त्यांचा फटकळपणा हेच त्यांचे बलस्थान आहे. भविष्यात हे दोन पुतणे एकत्र आल्यास महाराष्ट्रातील राजकारणाला नवे वळण लागू शकेल. पण काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असताना राज हे सदैव अस्पृश्य ठरणार हे उघड आहे.
गेल्या निवडणुकीत त्यांना भारतीय जनता पक्षाने युतीत ओढण्याचा प्रयत्न केला होता. पण उद्धव ठाकरे यांनी तो हाणून पाडला. भविष्यातदेखील काही वेगळे चित्र दिसेल असे नाही. तेव्हा `दादा’ने बोलाविले म्हणून `राजा’ने हुरळून जाण्याचे कारण नाही. त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना परिश्रमपूर्वक वाढवावी लागणार आहे. पायाला भोवरा लावून फिरावे लागणार आहे. तळागाळातील कार्यकर्ते जोडावे लागणार आहेत. केवळ एका बाळा नांदगावकर यांच्यावर अवलंबून न राहता आपल्या सोबतीला अनेक नेते नेमावे लागणार आहेत. हे सारे केल्याशिवाय राज ठाकरे यांच्यापुढे पर्याय नाही. राजकारणात जितकी तुमची शक्ती मोठी तितके तुमचे वलय मोठे, हे राज यांनी वेळीच लक्षात घ्यायला हवे.”
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर