HomeArchiveराजकारणातील आरोपनाट्य!

राजकारणातील आरोपनाट्य!

Details
राजकारणातील आरोपनाट्य!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

संजय मलमे – संपादक, पुण्यनगरी, मुंबई
[email protected]
राजकारणात आरोप-प्रत्यारोप होतच असतात. त्याचे स्वरूप गंभीर असले तरीही त्याला जनतेच्या लेखी फारसे महत्त्व प्राप्त होत नाही. एखाद्या आरोपाविषयी पुरावे असतील तर कायदेशीर तक्रार करण्याची मुभा राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला दिली आहे. हा कायदेशीर मार्ग न चोखाळता आरोप करण्यात येत असतील तर त्याला राजकीय चष्म्यातून पाहिले जाते. अशा आरोपांचे महत्त्व जाहीर सभांमधून केवळ टाळ्या घेण्यापुरतेच उरते. शरद पवार यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप असो वा भूखंडाचे ‘श्रीखंड’ खाल्ल्याचा आरोप. यातून काहीच निष्पन्न होऊ शकले नाही. इतकेच नव्हे इंदिरा गांधी, बाळासाहेब ठाकरे, अगदी राज ठाकरे यांसारख्या नेत्यांवरही वेळोवेळी आरोप झाले. पण कुठलाही आधार नव्हता. अगदी अशाच प्रकारचा आरोप नारायण राणे यांचे पुत्र, माजी खासदार नीलेश राणे यांनी नुकताच बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केला आहे.

भारतीय राजकारणाला कटकारस्थान आणि कुरघोडीचा अभिशाप आहे. येथे नैतिकता कधीच पाहायला मिळाली नाही. प्रतिस्पर्ध्याचे कच्चे दुवे हेरून त्याला नामोहरम करण्याची एकही संधी सोडली जात नाही. राजकारणाच्या नावाखाली ते शिष्टसंमतच झाले आहे. रामायण-महाभारतापर्यंतचा इतिहास पाहिल्यास कटकारस्थानाची अनेक प्रकरणे आपल्याला वाचायला मिळतील. त्याला रक्ताची नातीही अपवाद नाहीत. अलीकडच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात संभाजी महाराजही अशाच कटकारस्थानाचे बळी ठरले होते. पेशव्यांच्या राजवटीतही याची काही उदाहरणे वाचायला मिळतात. ही परंपरा म्हणा किंवा हा अनुचित प्रघात आजतागायत सुरू आहे. आजच्या आधुनिक राजकारणातही अधूनमधून याचा प्रत्यय देणाऱ्या घटना घडत असतात. आपल्याकडे एक म्हण आहे ‘युद्धात आणि प्रेमात सर्व काही क्षम्य असते.’ त्याला आता प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या राजकारणाचीही जोड मिळाली आहे. कटकारस्थाने करणारे किंवा राजकीयदृष्ट्या अडचणीत ठरणाऱ्या लोकांचा येनकेन प्रकारे काटा काढण्याचे प्रकार सातत्याने घडत आले आहेत. त्याला खूप मोठा इतिहास आहे. हे सर्व अत्यंत योजनाबद्धरीत्या होत असल्याने त्याचे कर्तेकरविते नेहमीच नामानिराळे राहतात. लोकही त्याकडे ‘राजकारण’ म्हणून पाहत सोयीस्करपणे दुर्लक्ष करताना दिसतात. अशा कटांचा कर्ताकरविता माहीत असूनही त्याच्याविषयी कुठलाही पुरावा नसतो. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत अशी प्रकरणे बसत नाहीत. म्हणूनच राजकारण सभ्य माणसांचे क्षेत्र नसल्याचे म्हटले जाते. राजकारणाच्या रिंगणात सर्वदूर चिखलाने माखलेले लोकच पाहायला मिळतील. कोणत्याही आरोपांना गेंड्याची कातडी पांघरून सामोरे जाण्याची तयारी ठेवणारे लोकच राजकारणात टिकून राहतात. या क्षेत्रात कोणी कोणावर कितीही आरोप केले तरी त्याचा त्यांच्या राजकीय प्रतिष्ठेवर फारसा परिणाम होताना दिसत नाही. उलट अशा आरोपांमुळे त्यांची राजकारणातील उंची वाढते, हाच आजपर्यंतचा इतिहास आहे.

भारतीय राजकारणातील विविध राज्यांतील सर्वच घराण्यांवर गंभीर आरोप आहेत. मात्र, ही घराणी त्याच ताकदीने आजही राजकारणात टिकून आहेत. दिवसागणिक त्यांचे महत्त्व वाढत आहे. राजकारणाची ही महिमा सांगण्याचे औचित्य काय, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. दोन दिवसांपूर्वीच नीलेश राणे यांनी ठाकरे कुटुंबीयांवर केलेले आरोप हे त्याचे निमित्त आहे.

लोकसभा निवडणुकीची घोषणा होणे बाकी असली तरी प्रचाराचे रंग भरू लागले आहेत. इच्छुक तयारीलाही लागले आहेत. सिंधुदूर्ग-रत्नागिरी मतदारसंघात मागील एक-दोन आठवड्यांपासून त्याची झलक पाहायला मिळत आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन खासदार नीलेश राणे यांचा पराभव करून शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी कोकणातील राणे कुटुंबाच्या अस्तित्वाला धक्का दिला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राऊत यांना अस्मान दाखवत मागील निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढण्यासाठी नीलेश राणे उतावीळ आहेत. येथे दोघांच्याही सभांनी वातावरण तापू लागले आहे. निवडणूक लोकसभेची असल्यामुळे प्रचारात देशपातळीवरील विषय येणे अपेक्षित असले तरी दोघांनीही निवडणूक व्यक्तिगत पातळीवर घेतली असल्याचे प्रचारातील भाषणांवरून दिसून येत आहे. एकमेकांची उणीदुणी काढतानाच शारीरिक रचना, रंग आणि बोली याचाही या सभांमधून उद्धार होताना दिसून येत आहे. भाषणाची ही पातळी घसरत एकमेकांनी केलेल्या कृष्णकृत्यांपर्यंत पोहोचली आहे. विनायक राऊत यांनी कोकणात मागील दहा वर्षांत किती खून झाल्याचा उलगडा करताच नीलेश राणे यांच्या भावना प्रक्षुब्ध झाल्या. त्यांनी विनायक राऊत यांच्यावर कुरघोडी करण्यासाठी थेट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सोमवारी गंभीर स्वरूपाचे आरोप केले. शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या मृत्यू प्रकरणाशी त्यांचे नाव जोडत ठाकरे कुटुंबीयांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. याशिवाय सोनू निगम तसेच कर्जतच्या फार्म हाऊसचा उल्लेख करत मला तोंड उघडायला लावू नका, असा इशारा दिला.

हे आरोप गंभीर असले तरी महाराष्टाच्या राजकारणात त्याला फारसे गांभीर्याने घेतले गेले नाही आणि त्याला माध्यमांनीही तितकीशी प्रसिद्धी दिली नाही. नारायण राणे हे शिवसेनेच्या स्थित्यंतराचे केवळ साक्षीदारच नव्हे, तर चांगल्या-वाईट घटनांचे भागीदारही आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याने ठाकरे कुटुंबियांवर केलेले आरोप गंभीर मानायला हवे होते. तरीही त्याला तितकेसे महत्त्व दिले गेले नाही. राजकारणात काही उघड गुपिते असतात. ती चवीने चर्चिलीही जातात. मात्र, त्याला कुठलाही पुरावा किंवा आधार नसतो. त्यामुळे अशा आरोपांना कधीही फारसे महत्त्व दिले जात नाही. याचाच या प्रकरणात नव्याने प्रत्यय आला. उदाहरण द्यायचे झाल्यास भारताच्या राजकारणातील एक बडे प्रस्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवार यांच्यावरही अनेकदा असे गंभीर स्वरूपाचे आरोप झाले. १९८८ ला शरद पवार यांच्यावर जनता दलाच्या तेव्हाच्या आमदार मृणाल गोरे यांनी मुंबईतील २८७ भूखंड हडपल्याचा आरोप केला होता. त्यावेळी भूखंडाचे हे ‘श्रीखंड’ प्रकरण बरेच गाजले होते. विरोधकांनी त्यावेळी ‘श्रीखंड’ प्रकरणावरून जाहीर सभांमधून पवारांचा खरपूस समाचार घेतला.

मात्र, त्यातून काहीच निष्पन्न होऊ शकले नाही. त्यानंतर गो. रा. खैरनार आणि गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवारांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. आपल्याकडे ट्रकभर पुरावे असल्याचा दावाही खैरनार यांनी त्यावेळी केला होता. मात्र, प्रत्यक्षात ते काहीच सिद्ध करू शकले नाहीत. त्यामुळे त्याकडे आजतागायत एक राजकीय आरोप म्हणूनच पाहिले गेले. बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी अभिनेता संजय दत्त याला मदत करण्यावरून बाळासाहेब ठाकरे यांना विरोधकांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. पत्रकारांवरील हल्ले, दंगलीचाही त्यांच्यावर आरोप झाला होता. त्यांच्याविरुद्ध जाहीर टीकाटिपण्णी केली गेली. टोल आंदोलनातही विरोधक राज ठाकरे यांना लक्ष्य करत आले आहेत. अशी अनेक नेत्यांची उदाहरणे देता येतील. राजकारणात पत्रकार परिषदा किंवा जाहीर सभांमधून होणाऱ्या आरोपांना कधीही फारसे महत्त्व दिले गेले नाही. अशा आरोपांची लोक एक-दोन दिवस चवीने चर्चा करतात आणि हा विषय सोडून देतात. माध्यमांच्या दृष्टीने ती एका दिवसाची बातमी ठरते, असाच आतापर्यंतचा अनुभव आहे. अशा आरोपांकडे लोक राजकीय कुरघोडी म्हणून पाहतात.

नीलेश राणे यांनी नुकत्याच केलेल्या बाळासाहेबांवरील आरोपांनादेखील विनायक राऊत यांच्याशी सुरू असलेल्या राजकीय संघर्षाची किनार आहे. त्यामुळे त्याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे, असेच म्हणावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील उद्योगपती अदानी, अंबानी यांच्यासाठी काम करत आहेत, असा विरोधी पक्षांकडून त्यांच्याविरूद्ध जाहीर सभांमधून सातत्याने आरोप होत आला आहे. इतकेच नव्हे तर सरकारी बँकांना हजारो कोटींचा चुना लावून फरार झालेल्या विजय मल्ल्याला पळून जाण्यास मदत केली, असाही मोदींवर आरोप होत आहे. नोटाबंदीत मोठा घोटाळा झाला, असाही आरोप आहे. अशा आरोपांना कुठलाही कायदेशीर आधार नसतो, त्यामुळे असे आरोप जनता गांभीर्याने घेताना दिसत नाही. विशेष म्हणजे ज्यांच्यावर आरोप होतो, तेही तितक्याच खुमासदार पद्धतीने त्याला जाहीर सभांमधून प्रत्युत्तर देताना दिसतात. काहीजण सोयीचे मौन बाळगणे पसंत करतात. नीलेश राणे यांच्या आरोपाला ठाकरे कुटुंबियांनी वा शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याने जराही किंमत न देता त्यावर भाष्य करणे टाळले आहे. हा त्याचाच भाग आहे. मुळात राजकारण एक नीतिशास्त्र आहे. एकमेकांना पराकोटीचा विरोध करत असतानाही काही तत्त्वे पाळली जातात. संयम हा राजकारणात श्वास समजला जातो. राजकारणाच्या रणांगणात कधीच कोण कोणावर उघड वार करत नाही. एखाद्याला संपवण्यासाठी काट्याने काटा काढण्याची इथली रीत आहे. हे ज्याला उमगले तोच या रणांगणावर वर्षानुवर्षे तग धरून उभा आहे. उघड संघर्ष करणारे लोकांची सहानुभूती गमावून बसतात अन् या मैदानातून कधी बाहेर फेकले जातात, हे कळतदेखील नाही.”
 
“संजय मलमे – संपादक, पुण्यनगरी, मुंबई

Continue reading

जेन झेडच्या सहभागातून तयार होणार राज्याचे युवा धोरण

१३ ते ३५ वयोगटातील युवकांना (जेन झेड) जागतिकीकरणाच्या गतीशी संतुलितपणे जोडण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन, वैविध्यतेचे ज्ञान, नागरिक कर्तव्ये व जबाबदाऱ्या याकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी राज्य सरकार सुधारित युवा धोरण तयार करत आहे. युवा धोरण अधिक प्रभावी करण्यासाठी युवकांना आपले...

आता रुग्णालयातल्या वस्त्रांची धुलाई होणार यांत्रिक पद्धतीने

राज्यातल्या ५९३ शासकीय रुग्णालयांमध्ये स्वच्छता, सुरक्षितता आणि निर्जंतुक सेवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने तेथील वस्त्रे यांत्रिक पद्धतीने धुण्याच्या प्रक्रियेला आता सुरूवात झाली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या वस्त्रधुलाई सेवेचा आज शुभारंभ झाला. मुंबईतल्या...

दिवाळीत आपत्कालीन स्थितीत संपर्क साधा १०१ व १९१६ क्रमांकांवर

दिवाळीत दीपोत्सव साजरा करताना मुंबईकरांनी पर्यावरणाचाही विचार करावा. फटाके उडविताना/फोडताना लहान मुलांची काळजी घ्यावी. फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायूप्रदूषण होणार नाही, याबाबत दक्ष राहवे, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिका आणि मुंबई अग्निशमन दलाने केले आहे. दुर्दैवाने आग किंवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास...
Skip to content