HomeArchiveरसिकांनी अनुभवली संगीत...

रसिकांनी अनुभवली संगीत नाटकांची अनोखी पर्वणी!

Details
रसिकांनी अनुभवली संगीत नाटकांची अनोखी पर्वणी!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईचे दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र आयोजित व विमल ट्रस्ट यांच्या सहयोगाने संगीतनाट्य महोत्सव नुकताच साजरा झाला. गेली अनेक वर्षे असा महोत्सव केंद्राच्या वतीने आयोजित केला जातो. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, गोवा या ठिकाणच्या नाट्यसंस्थांचे संगीत नाटकांचे प्रयोग महोत्सवात होतात. यंदादेखील अत्यंत उत्साहात रसिकांनी या महोत्सवाचा आनंद घेतला.

मुंबईबाहेरच्या संस्थांना मुंबईत प्रयोग करण्यासाठी रंगमंच मिळावा, या उद्देशाने आणि संगीत नाटकांची समृद्ध परंपरा अखंडित चालू राहवी, अशा विचाराने हा संगीतनाट्य महोत्सव आयोजित करण्यात येत असल्याचे केंद्राचे कार्याध्यक्ष व प्रसिद्ध नाटककार सुरेश खरे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात विशद केले.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सांगलीच्या देवल स्मारक मंदिर या संस्थेचे संगीत मंदारमाला, हे नाटक सादर झाले. पं. विद्याधर गोखले यांनी लिहिलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन व संगीत मार्गदर्शन शरद बापट यांनी केले होते. मंदारमाला हे नाटक प्रचंड लोकप्रियता मिळवलेले संगीतनाटक आहे. अभिषेक काळे, श्रद्धा जोशी, देवदत्त पेशकार यांच्या गाण्याला रसिकांनी भरपूर दाद दिली. नाटकाच्या तिसऱ्या अंकाच्या दरबाराच्या प्रवेशाचे नेपथ्य उल्लेखनीय होते.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ या रत्नागिरीच्या नाट्यसंस्थेने संगीत मानापमान, सादर केले. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित या नाटकाचे मूळ संगीत गोविंदराव टेंबे यांनी दिलेले होते. यातील लोकप्रिय नाट्यगीतांना प्रेक्षकांच्या टाळ्या मिळाल्या. वामनराव जोग यांचे दिग्दर्शन तर त्यांची लक्ष्मीधराची भूमिका, प्रवीण शिलकर यांची धैर्यधर आणि सिद्धी बोंद्रे यांची भामिनी यांचे गद्यसंवाद आणि नाट्यगीते यामुळे नाटक उत्तरोत्तर रंगत गेले. नाटकाच्या यशात निखिल रानडे यांचा तबला आणि विलास हर्षे यांचा ऑर्गन यांचा सहभागही मोठा होता.

तिसऱ्या दिवशी रत्नागिरीच्या खल्वायन या संस्थेचे संगीत संशयकल्लोळ, हे नाटक आयोजित केले होते. गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेले हे नाटक महोत्सवात मनोहर जोशी यांच्या दिग्दर्शनाखाली सादर झाले. नाटकातील गाजलेल्या नाट्यगीतांबरोबरच नाटकाचे गद्यसंवाद यामुळे नाटक खूप रंगले. अश्विनशेठची भूमिका करणारे प्रवीण शिलकर आणि रेवतीची भूमिका करणाऱ्या श्वेता जोगळेकर यांचा अभिनय आणि गायकीला प्रेक्षकांची मनमोकळी दादर मिळत होती. मनोहर जोशी यांचा फाल्गुनशेठ, विजय जोशी यांचा भादव्या आणि शमिका जोशी यांची कृतिका यांच्या अभिनयाने प्रेक्षक रंगून गेले होते. नाटकातील गीतांना निखिल रानडे यांची तबला साथ तर मधुसूदन लेले यांची आर्गन साथ लाभली होती. महोत्सवातील तिन्ही नाटके आधी पाहिलेल्या प्रेक्षकांना पुनःप्रत्ययाचा आनंद देऊन गेली. नव्याने पाहिलेल्या प्रेक्षकांना आपल्या समृद्ध संगीत रंगभूमीची ओळख झाली.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना अजून शासकीय ई-मेलच नाही?

महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार अनेक आघाड्यांवर जोरदार कार्यरत असले तरी राज्य सरकारने त्यांना तसेच या विभागाच्या प्रधान सचिवांना शासकीय ई-मेलच दिला नाही की काय, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी हिंदू मंदिर संवर्धन अभियान, मुंबई सांस्कृतिक...

जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दत्तात्रय उत्तेकर यांचे यश

केप टाऊन, दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या इक्विप्ड व क्लासिक जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या दत्तात्रय अर्जुन उत्तेकर यांनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व मास्टर्स-४ (६६ किलो वजनी गट) मध्ये केले. त्यामध्ये त्यांनी इक्विप्ड गटात चार सुवर्णपदके मिळवली. क्लासिक स्पर्धेत त्यांनी एक...

महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आज पावसाची शक्यता

सध्या अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात असे दोन कमी दाब क्षेत्र सक्रिय झाले आहेत. त्यातील एक कमकुवत होत जाण्याची चिन्हे असून दुसऱ्याची तीव्रता वाढत आहे. त्यांची दिशा पाहता महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. पुढील आठवडाही अवकाळी तडाखा राहू शकतो....
Skip to content