HomeArchiveरमझान मुबारक!

रमझान मुबारक!

Details

मुस्लीम धर्मीयांचा पवित्र समजला जाणारा रमझानचा महिना आजपासून सुरू झाला. या महिन्याचा शेवट रमझान ईदमध्ये होतो. या महिन्यानिमित्त मुस्लीम समाजाचे लोक पहाटे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास करतात. त्याला रोजा म्हणतात. या काळात ते पाणीही पित नाहीत. इतकेच नव्हे तर स्वतःची थुंकीही गिळत नाहीत. सूर्यास्तानंतर ते आपापल्या कुटुंबियांसमवेत उपवास (रोजा) सोडतात. याच काळात ते दिवसातून अनेकदा मशिदीत जाऊन नमाज पडतात.
 
“रोजा सोडल्यानंतर रात्री उशिरापर्यंत या समाजाचे लोक विविध वस्तूंची खरेदी करतात. त्यामुळे मुस्लीम मोहल्ल्यातील बाजारपेठा रमझानच्या काळात संध्याकाळनंतर पहाटेपर्यंत गर्दीने फुललेल्या असतात. दक्षिण मुंबईतल्या भेंडीबाजार, पायधुनी, डोंगरी, मिनारा मस्जीद परिसरात तर चालणे कठिण असते. परंतु कोरोनाच्या साथीमुळे सध्या या परिसराचे चित्र असे दिसत आहे. रमझानमध्ये सर्व प्रार्थना लोकांनी घरीच कराव्यात. सरकारच्या सूचनांचे पालन करावे, असे जाहीर आवाहन मुस्लीम समाजाच्या अनेक मौलवींनी केले आहे. या आवाहनाचे पालन करताना रमझानच्या महिन्यात या परिसरात गर्दी होणार नाही, अशी अपेक्षा मुंबई महापालिका प्रशासन करत आहे.”
 
 
 

 
 

 
 

 

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content