HomeArchiveरखडलेल्या पारसी पंचायत...

रखडलेल्या पारसी पंचायत भुयारी मार्गाच्या कामाला लवकरच सुरूवात!

Details
रखडलेल्या पारसी पंचायत भुयारी मार्गाच्या कामाला लवकरच सुरूवात!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

१३ कोटींचा खर्च, १८ महिन्यांत पूर्ण होणार काम
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मागील ७ वर्षांपासून मेट्रो व वाहतूक पोलीस विभागांमुळे रखडलेले मुंबईच्या अंधेरी (पूर्व) येथील पारसी पंचायत भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाच्या मार्गातील सर्व अडथळे आता दूर झाले असून या कामाचा शुभारंभ लवकरच करण्यात येणार आहे. तब्बल १३ कोटी ३० लाख खर्च करुन या भुयारी मार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये अंधेरी (पूर्व) येथील लोकसंख्येत वाढ झाल्याने येथील वाहतुकीच्या कोंडीत मोठया प्रमाणात वाढ झाली होती. येथील रहिवाशांना दिलासा देण्यासाठी जोगेश्‍वरी विधानसभेचे आमदार रविंद्र वायकर यांनी २०१२ मध्ये येथील पारसी पंचायत भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर केला होता. तत्कालिन सरकारनेही या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. मात्र या कामाची निविदा काढण्यासाठी वेळ झाला आणि तोपर्यंत सरकारचा कालावधी संपुष्टात आला. त्यानंतर २०१४ मध्ये युतीचे सरकार आल्यानंतर त्यांनी या कामाचा पुन्हा पाठपुरावा केला. अखेर २१ डिसेंबर २०१५ रोजी या कामाचा शुभारंभ करण्यास मान्यता देण्यात आली. १७ जानेवारी २०१६ रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या कामाच्या रुंदीकरणाचे भूमीपूजन करण्यात आले.

कामाला सुरूवात करताच ५ एप्रिल २०१६ रोजी वाहतूक पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी संयुक्त चर्चा केल्यानंतर चार टप्प्यात काम करण्याच्या प्रस्तावासही असहमती दर्शविली. त्यामुळे हे काम पुन्हा रखडले. यानंतर सहपोलीस आयुक्त, वाहतूक यांनी २४ जानेवारी २०१६ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता व कंत्राटदार यांच्यासमवेत जागेची संयुक्त पाहणी केल्यानंतर वाहतूक सूरळीत ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने काम पूर्ण करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ६ जून २०१६ रोजी तसा प्रस्ताव तयार करुन तो शासनाकडे सादर करण्यात आला. परंतु तोपर्यंत या महामार्गावर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामामुळे पारसी पंचायत भुयारी मार्गाच्या रुंदीकरणास परवानगी देणे शक्य नसल्याचे सहपोलीस आयुक्त, वाहतूक यांच्याकडून कळविण्यात आले. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यावर या कामास परवानगी देणे शक्य हेाईल, असेही वाहतूक विभागाने कळविले.

वाहतूक विभागाची परवानगी मिळत नसल्याने रुंदीकरणाच्या कामास विलंब होत असल्याने, अधीक्षक अभियंता, संकल्पचित्र मंडळ, कोकण भवन यांनीदेखील २ डिसेंबर २०१६ रोजी या जागेची संयुक्त पाहणी करून वाहतूक विभागाची परवानगी देण्यासंदर्भात वाहतूक पोलीस विभाग यांना परवानगी देण्यासंदर्भात फेरविचार करण्याची विनंती केली. परंतु मेट्रोच्या कामाचे कारण पुढे करत वाहतूक पोलीस विभागाने या कामास परवानी देणे नाकारले. या कामाचा करारनामा संपुष्टात आल्याने १३ एप्रिल २०१७ रोजी हा मार्ग मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्यात आला.

हा मार्ग प्रदेश विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्यात आल्यानंतरही गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री वायकर यांनी या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री, शासनाचे मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम मंत्री, एमएमआरडीएचे आयुक्त, वाहतूक आयुक्त यांच्यासमवेत वांरवार बैठका तर घेतल्याच त्याचबरोबर पत्रव्यवहारही केला. एवढेच नव्हे तर या सर्वांबरोबरच त्यांनी प्रत्यक्ष स्थळपाहणी दौरेही केले. ६ डिसेंबर २०१८ रोजी एमएमआरडीएने या कामाचे टेंडर मंजूर केले. टेंडर प्रक्रियेनंतर एन. ए. कनस्ट्रक्शन या कंपनीला सुमारे १३ कोटी ३० लाख ०२ हजार ९०८ इतक्या रक्कमेचे कंत्राट देण्यात आले. शुक्रवारपासून या कामास सुरूवात करण्यात येणार असून १८ महिन्यांत पारसी पंचायत भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
या कामाचे वैशिष्ट्य..
१. २० मीटर लांबी ४० मीटर लांब
२. १३ मीटर रुंदी ३० मीटर रूंद
३. ४.५ मीटर उंची ५.५ मीटर उंच”
 
“१३ कोटींचा खर्च, १८ महिन्यांत पूर्ण होणार काम

Continue reading

मुंबईच्या समुद्रात लवकरच दिसणार कॅन्डेलाची बोट!

स्वीडनमध्ये जलवाहतुकीसाठी वापरण्यात येणारी पी १२ ही बोट लवकरच मुंबईत दाखल होणार असून, त्यामुळे राज्यातील जलवाहतुकीच्या क्षेत्रात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. नितेश राणे नुकतेच स्वीडनच्या दौऱ्यावर...

उपेक्षितांना सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कारीत करा!

जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण ही आजच्या काळातील अत्त्यावश्यक बाब आहे. अनेकांना आर्थिक परिस्थितीसह विविध कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. समाजातल्या अशा सगळ्या घटकांपर्यंत शिक्षणाची ज्योत घेऊन जाणे, त्यांना केवळ सुशिक्षित नाही तर सुसंस्कारीत करणे हेच आपल्या जीवनाचे धेय्य असल्याचे...

दिवाळीत प्रियजनांना भेट द्या वर्षभराच्या ‘फ्री’ फास्टॅगची!

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत...
Skip to content