Details
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये उद्यापासून `तबला उत्सव’!
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा रंगस्वर विभाग आणि महाराष्ट्र ललित कला निधी यांच्या संयुक्त विद्यमाने तबला उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव 11 व 12 ऑगस्ट 2019 या दोन दिवशी सायंकाळी साडेसहा वाजता रंगस्वर सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरीमन पॉईंट येथे होईल. पहिल्या दिवशी सत्यजीत तळवलकर आणि अक्रम खान यांच्या तबला वादनाची पर्वणी रसिकांना अनुभवता येईल तर दुसऱ्या दिवशी मिताली खारगोणकर-विंचूरकर आणि फजल कुरेशी यांची तबल्यावरील अनोखी अदाकारी रसिकांसाठी असेल. हा उत्सव सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहून आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
”
“केएचएल न्यूज ब्युरो