HomeArchiveयंदाही शिर्डीचे श्री...

यंदाही शिर्डीचे श्री साई समाधी मंदिर ३१ डिसेंबरला रात्रभर खुले! विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू

Details

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल ब्युरो

शिर्डीच्या श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍थेच्या वतीने नाताळची सुट्टी तसेच चालू वर्षाला निरोप देताना व नवीन वर्षाच्या स्‍वागतानिमित्‍त शिर्डी महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले असून श्री साईबाबांच्‍या दर्शनासाठी शिर्डीत होणारी संभाव्‍य गर्दी लक्षात घेऊन समाधी मंदिर सोमवारी, ३१ डिसेंबर २०१८ रोजी दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्‍यात येणार असल्‍याची माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांनी दिली.

दरवर्षी नाताळची सुट्टी, चालू वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाच्या स्‍वागतानिमित्‍त श्रींच्‍या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. येणाऱ्या सर्व भाविकांना श्रींच्‍या समाधीच्‍या दर्शनाचा लाभ मिळावा व होणाऱ्या गर्दीचे नियोजन योग्‍य रितीने व्‍हावे या उद्देशाने सोमवारी, ३१ डिसेंबर २०१८ रोजी श्रींचे समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे ३१ डिसेंबरची शेजारती व ०१ जानेवारीला पहाटेची काकड आरती होणार नाही, असे त्यांनी सांगितले.

यानिमित्‍ताने २२ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०१८ याकालावधीत विविध सां‍स्‍कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे. यामध्‍ये २२ डिसेंबर रोजी सायं. ७.३० ते ९.०० यावेळेत व्‍दारका मंडळी, बेंगलुरू, २३ डिसेंबर रोजी सायं. ७.०० ते ८.३० यावेळेत मनीषा धिंग्रा, दिल्‍ली व रात्रौ ८.३० ते ९.४५ यावेळेत रमेश ओबेरॉय, मुंबई, २४ डिसेंबर रोजी सायं. ७.०० ते ९.४५ यावेळेत सुबरत, ओडिसा, २५ डिसेंबर रोजी सायं. ७.०० ते ९.४५ या वेळेत विनया कुलकर्णी, नाशिक, २६ डिसेंबर रोजी सायं. ७.०० ते ९.४५ या वेळेत अनिलकुमार मिस्किन, कर्नाटक, २७ डिसेंबर रोजी सायं. ७.०० ते ९.४५ रोजी सुधांशू लोकेगावकर, शिर्डी, २८ डिसेंबर रोजी सायं. ७.०० ते ९.४५ यावेळेत श्रृती कंकण, येवला, २९ डिसेंबर रोजी सायं. ७.०० ते ९.४५ यावेळेत रविंद्र पिंगळे, शिर्डी, ३० डिसेंबर रोजी सायं. ७.०० ते ९.४५ यावेळेत नारायण मुंदडा व सार्थक (आप्‍पा) गायकवाड, मुंबई आणि ३१ डिसेंबर रोजी सायं. ७.०० ते ९.३० या वेळेत जगदीश मारूती पाटील, मुंबई व रात्रौ ९.३० ते ११.४५ या वेळेत साई स्‍वरांजली संगीत संच, नागपूर, आदी कलाकारांचे साईभजन संध्‍या कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आलेले आहे, असे त्या म्हणाल्या.

नाताळ व नवर्षाच्‍या सुट्टीच्‍या गर्दीमुळे मंगळवार, २५ डिसेंबर, सोमवार, ३१ डिसेंबर व मं‍गळवार, ०१ जानेवारी २०१९ रोजी श्री साईसत्‍यव्रत पूजा, अभिषेक पूजा बंद राहील. याबरोबरच सोमवार, ३१ डिसेंबर व मंगळवार, ०१ जानेवारी २०१९ रोजी वाहन पूजा बंद राहतील. हा महोत्‍सव यशस्‍वीरित्‍या पार पाडण्‍यासाठी संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ. सुरेश हावरे, उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्‍य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल व सर्व विश्‍वस्‍त यांच्‍या मार्गदर्शनाखाली संस्‍थानचे उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे पाटील, उपकार्यकारी अधिकारी बाबासाहेब घोरपडे, सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभागांचे विभाग प्रमुख व सर्व कर्मचारी प्रयत्‍नशील आहे, असेही अग्रवाल यांनी सांगितले.”
 
“केएचएल ब्युरो

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content