Details
म्हाडाने मुंबईत मराठी टक्का वाढवावा!
01-Jul-2019
”
जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
लोकसभा निवडणुकीचे बिगुल रविवारी वाजले. त्याअगोदर सरकारच्या योजनांचा वेग बुलेट ट्रेनपेक्षा वेगाने धावला. उद्घाटनांचा उत्सव साजरा झाला. या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळात ३८ निर्णय घेण्यात आले. सगळ्यांना खुश करून सत्तेत येण्याचा प्रयत्न भाजपा-शिवसेना या सरकारने केला आहे. यापूर्वी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी २००९च्या विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आले. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मोफत वीज मिळाली नाही तर उलट निवडणुकीत असे आश्वासन द्यावे लागते असे बेजबाबदारपणे सांगत त्यांनी नेहमीच्या स्टाईलमध्ये हसतहसत उत्तर दिले. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण होतातच असे नाही. मात्र लोक आपल्या बुद्धीला ताण न देता मते देत असतात.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सत्तेत येण्यासाठी जनतेला वाटेल ती आश्वासने द्यावी लागतात असा गंमतीदार किस्सा सांगितला होता. परंतु नितीन गडकरी यांच्या कामाचा उरक आणि कार्यपद्धती लक्षात घेता ‘बोलतो तसे करून दाखवितो’ अशी काम करण्याची त्यांची पद्धत असल्याने आम जनता त्यांच्यामागे पर्यायाने भाजपाच्या मागे उभी राहील आणि ते स्वाभाविक आहे. म्हाडा मुंबई मंडळाचे सभापती मधु चव्हाण यांनी मुंबईत गोरेगाव पहाडी येथे पंतप्रधान आवास योजने अंतर्गत १ हजार घरे बांधण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आणि ही घरे दोन वर्षांत पूर्ण करण्याची त्यांनी ग्वाही दिली. सभापती मधु चव्हाण यांनी सभापतीपदाचा स्वीकार केल्यानंतर रोज सकाळी कार्यालयात येणे, मुंबई शहरातील एस. एम. जोशी मार्ग, नायगाव, वडाळा, बीडीडी चाळीच्या पुनर्वसनासाठी राहिवाशांबरोबर बैठका घेतल्या. त्या विभागातील भाजपा, शिवसेना, काँग्रेस आमदारांबरोबर चर्चा करून त्यांच्या मागण्याचाही रहिवाशांबरोबर चर्चा केली. याचा अर्थ राजकारण बाजूला ठेवून चव्हाण यांनी सर्वांना बरोबर घेऊन बीडीडी चाळीतील बरेच वर्षे रखडलेल्या लोकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
या आठवड्यात पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी, गोरेगाव येथील मोतीलाल नगर येथे सुमारे ३ हजारांच्या वर राहिवाशांना घरे देणार असल्याचे सांगून तेथे अतिरिक्त मिळणाऱ्या जागेवर बांधण्यात येणाऱ्या इमारतींतून २० कोटी रूपये म्हाडाला मिळणार आहे, असे नमूद केले. हे सांगण्याचा उद्द्येश हा की, मधु चव्हाण यांनी रहिवाशांच्या संपर्कात राहून निर्णय घेतले. त्यामुळे त्यांनी मुंबईतील राहिवाशांना देण्यात येणारी घरे हे निवडणुकीच्या तोंडावर आश्वासन नाही असे म्हणता येईल. त्यांनी गेली पाच महिने अविरत घेतलेली मेहनत राहिवाशांनी पाहिली आहे. त्यांच्यात विश्वास निर्माण केला आहे. वैशिष्ट्य हे की मधु चव्हाण यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार वर्षांपूर्वी म्हाडा मुंबई मंडळाचे सभापती म्हणून नियुक्ती केली असती तर या वर्षात अनेक रहिवासी स्वतःच्या घरात राहयला गेले असते. चव्हाण यांनी निर्माण केलेला विश्वास भाजपा-शिवसेनेला या निवडणुकीत फायदेशीर असेल, याबाबत शंका नाही.
म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी म्हाडा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आणि म्हाडाची घरे देण्याचा निर्णय घेतला. पत्रकारांनाही घरे देण्यासाठी त्यांनी आता पुढाकार घेतला आहे. म्हाडाच्या घरांसाठी अर्ज केलेल्या अर्जदारास लॉटरी लागली नाही तर त्यांनी अर्ज करताना भरलेली अनामत रक्कम २४ तासात अर्जदारास परत करण्याचा निर्णय जाहीर करून ही रक्कम बँकेमार्फत देणार असल्याचे जाहीर केल्याने अर्जदारास मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे म्हाडाच्या नवीन निर्णयामुळे सोडतीसाठी अनामत रक्कम कमी केली आहे. अत्यल्प उत्पन्न गटासाठी आता १० हजार रू., अल्प उत्पन्न गटासाठी १० हजार रू., मध्यम गटासाठी ३० हजार रू., उच्च उत्पन्न गटासाठी ४० हजार रूपये यापुढे भरावी लागणार आहे.
म्हाडातर्फे लोकांना देण्यात येणारी घरे विशेष करून मराठी माणसासाठी देण्यात यावीत. लॉटरी पद्धत असली तरी ८० टक्के मराठी माणसांची अर्ज स्वीकृत करावेत आणि २० टक्के अभाषिक मराठी अर्जदारांचे अर्ज स्वीकारावे. म्हणजे मराठी माणसाचा मुंबईत घसणारा टक्का वाढेल. यासाठी घटनेचा आधार घेण्यात काही अर्थ नाही. मुंबई व महाराष्ट्रात परप्रांतीय म्हाडाची घरे कोटी व लाखोंच्या घरात फेरविक्रीत विकली जातात, ते म्हाडाचे अर्ज भरत आहेत. मराठी माणूस आपल्या राज्यातच परका व पोरका होऊ नये म्हणून म्हाडात अर्ज करत आहे. या प्रवृत्तीला नियमाचा आधार देऊ नये. महाराष्ट्रावर परप्रांतीयांचे आक्रमण समजून मराठी माणसाला न्याय दिला पाहिजे. भारतीय घटनेत कोठेही राहण्यास अधिकार दिला असला तरी यामुळे महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या संस्कृतीचा आणि अस्मितेचा जटील प्रश्न उभा राहिला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या अस्मितेसाठी शिवसेना स्थापन केली. निदान तो विचार करून म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत आणि म्हाडा मुंबई मंडळाचे सभापती मधु चव्हाण यांनी याबाबत दक्षता घ्यावी. मधु चव्हाण हे जरी भाजपाचे निष्ठावंत नेते असले तरी बाळासाहेब ठाकरे त्यांचा नेहमी ‘कमळातला वाघ’ असा आवर्जून चारचौघात उल्लेख करायचे. त्यांनीही म्हाडाच्या गृहसंकुलात मराठी माणसाला प्राधान्य देण्याचा जरूर करावा. मुंबई व महाराष्ट्रात हिंदी भाषिकांची संख्या थांबविण्याची हीच संधी आहे. संधीचं सुवर्णसंधीत रूपांतर करणे हे सर्वस्वी उदय सामंत आणि मधु चव्हाण यांच्या हाती आहे.”
“जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार