HomeArchiveमोदीजी, पाकला धडा...

मोदीजी, पाकला धडा शिकवाच!

Details
“मोदीजी, पाकला धडा शिकवाच!”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
[email protected]
काश्मीरममध्ये पुन्हा एकदा रक्तपात झाला आहे. तरूण भारतीय जवानांच्या रक्ताने पुन्हा एकदा ती भूमी न्हायली आहे. श्रीनगरवरून निघून आपल्या नियोजित ठाण्याकडे निघालेल्या केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या जवानांच्या काफिल्यावर भ्याड, भीषण हल्ला झाला आणि सारा देश संतापाने, शोकाने स्तब्ध झाला आहे. प्रमुख विरोधी पक्षांसह सारा देश याक्षणी लष्कर व सरकारबरोबर उभा आहे. चहूबाजूंनी आक्रोश सुरू झाला आहे, बदला घ्या, या भीषण भ्याड दहशतवीदी कृत्याचा बदला घ्या! देशाच्या मानसन्मानावरचा हा हल्ला आहे, हा भारतमातेचा अपमान आहे! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांच्या या साऱ्या भावनांना शब्द दिले. शुक्रवारी सकाळी एका पूर्वनियोजित कार्यक्रमात ते सहभागी झाले. पण भाषणाच्या सुरूवातीला त्यांनी याच विषयावर भाष्य केले. एतिरेकी व त्यांच्या समर्थकांना उद्देश्यून ते म्हणाले की, तुम्ही ही घटना घडवून फार गंभीर चूक केली आहे, त्याची योग्य सजा तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही सर्व सुरक्षायंत्रणांना पूर्ण मोकळीक दिलेली आहे. या कृत्याचा योग्य जबाब दिलाच जाईल असे त्यंनी बजावले.

त्यांनी थेट पाकला जबाब दिला जाईल असे जरी म्हटले नसले तरी त्यांचा रोख शेजारच्या या देशाकडेच होता. कोण कुठले भडभुंजे हे आतंकवादी? कुठून येतात? त्यांना कशी इतकी स्फोटके मिळतात? त्यांना घातक शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण कुठे मिळते? त्यांना ही माहिती तरी कशी मिळते की किती वाजता नेमक्या सीआरपीएफच्या गाड्या पोहोचणार आहेत? या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर पाकिस्तानकडून असेच आहे. पाकच्या जीवावर उडणारे ते गद्दार दहशतवादी आधीच पहाटेपासून तिथे दबा धरून बसलेले होते. त्यांनी गोळीबारही केला आणि स्वतः बसलेल्या जीपचा स्फोटही घडवला. या सर्वाच्या मागे पाकिस्तानचा हात आहेच. काश्मीर खोऱ्यात घडणाऱ्या गोळीबाराच्या, स्फोटांच्या, घातपाती कारवायांच्या अगदी सैन्यावर केल्या जणाऱ्या दगडफेकीचे प्रकार.. प्रत्येक घटनेमागे पाकिस्तानी कारवाया, पाक प्रशिक्षित दहशतवादी, पाकची शस्त्रास्त्रे, पाकने पुरवलेला पैसा हेच असते हेही वारंवार सिद्ध झालेले आहे. ऊरी सर्जिकल स्ट्राईक हा सिनेमा सध्या गाजतो आहे. त्यातील एक जयघोष आहे, प्रश्नोत्तर आहे. ते असे: “हाऊ इज द जोष?” या त्वेषाने उच्चारलेल्या प्रश्नाला तितक्याच जोशात दिलेले उत्तर आहे, “हाय सर!” या हाय जोषचे प्रदर्शन पुन्हा एकदा दाखवण्याची वेळ आली आहे.

पाकिस्तनात सुरक्षित बसून मसूद अझर हा हरामखोर भारताच्या विरोधात कारवाया करत आहे. त्याच्याच एका चेल्याचपाट्याने सीआरपीएफ जवानांच्या बसवर ती स्फोटके भरलेली जीप आदळवली. मसूद व त्याची संघटना जैश ए मुहंमद यांच्या पाठीमागे पाकिस्तानी सरकारचा भरपूर पैसा आणि आयएसआय या पाक लष्कराच्या हेरगिरी यंत्रणेची मदत व मेंदू सारेकाही आहे. मसूद अझरने आधी दहा वर्षे लष्कर ए तोयबा या नावाने भारताविरोधात कारवाया केल्या. त्या संघटनेवर २०१४-१५ मध्ये आंतरराष्ट्रीय दबावानंतर पाकने बंदी घातली तेव्हा याने जैश ए मुहंमद या नावाने हा मसूद सध्या दहशतवाद्यांना भारताविरोधात संघटित करत असतो. गेली दोन वर्षे या जैशच्या नावानेच काश्मीरमधील अतिरेकी हल्ले सुरू आहेत. मसूद अझरच्या मुसक्या आवळण्यासाठी भारताने पुष्कळ खटपटी केल्या. विशेषतः मुंबईवरील 2008 च्या दहशतवादी हल्ल्यात कसाब करणीमागे याच मसूदचा सडका मेंदू होता. पण त्याला संयुक्त राष्ट्रसंघाने दहशतवादी म्हणून जाहीर करावे या आपल्या मागणीला चीनने कडवा विरोध केला. एकीकडे पाकिस्तानाला मदत करणे आणि भारताला देशांतर्गत दहशतवाद्यांशी लढण्यातच जखडून ठेवणे हाच चीनचा उद्देश्य आहे. त्यालाच अनुसरून त्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये सातत्याने पाकच्या मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करण्याला विरोध केला.

चीन हा त्या सुरक्षा परिषदेमध्ये कायम सदस्य आहे. अमेरिका, रशिया, इंग्लंड आणि फ्रान्स या चार देशांनी दुसऱ्या महायुद्दाच्या समाप्तीनंतर संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना केली होती. त्यामुळे हे चार देश सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्य बनले व त्यांनी सुरक्षा परिषदेमधील कोणत्याही ठरावाला नकाराधिकार वापरण्याचा हक्क स्वतःकडे ठेवला. म्हणजे कायमस्वरूपी सदस्याच्या मर्जीविरूद्ध सुरक्षा परिषदेत कोणताही ठराव करू शकत नाही. चीनेचे आर्थिक साम्राज्य वाढले तेव्हा सुरूवातीच्या चार राष्ट्रांमध्ये काही वर्षांपूर्वी चीनचाही समावेश कायमस्वरूपी सदस्य म्हणून झाला आहे. त्यामुळे त्यांनाही तो नकाराधिकार प्राप्त झाला आहे. त्याचा जास्तीतजास्त वापर चीन भारताच्या हिताच्या विरूद्धच करत असतो. आता पुलवामाच्या कालच्या घटनेनंतर चीनच्या या आडमुठेपणाच्या विरोधातही भारताला जागतिक समुदायापुढे जाऊन पुन्हा पाक विरोधात मोहीम उघडावी लागेल. महाभारताच्या अखेरच्या पर्वामध्ये इंद्राच्या मागे लपलेल्या भयावह सापाला, तक्षकाला बाहेर काढण्यासाठी, जन्मेजयाला यज्ञात इंद्राचीच आहुती द्यावी लागते. तसे, चीनच्या मागे पाकिस्तान व पाकिस्तानच्या मागे लपलेल्या या मसूद नावाच्या सापाला बाहेर काढण्यासाठी आधी चीनचे नाक दाबण्याचाही प्रयोग भारताने करायला हवा.

जम्मू आणि काश्मीरमधील स्थिती सतत तणावाची राहवी, तिथे शातंता नांदूच नये हा पाकचा प्रयत्न सतत राहिलेला आहे. त्यांनी या ना त्या दहशतवादी काश्मीरी गटांना मदतच केलेली आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत क्रमशः वाढत्या संख्येने काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया घडलेल्या आहेत. पण त्याचबरोबर दहशवाद्यांचा थेट खात्मा करण्याचे धोरण भारतीय लष्कराने व सुरक्षा यंत्रणांनी घेतलेच आहे. त्यामुळे दरवर्षी शेकडो दहशतवादी तिथे मारले गेले आहेत. 2014 मध्ये काश्मीरमध्ये 90 दहशतवादी हल्ले झाले. त्यात 28 निरपराध नागरिक मारले गेले, सुरक्षादलांच्या 46 जवानांनी प्राण गमावले आणि 114 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. 2015 मध्ये ८८ दहशतवादी घटना घडल्या. त्यात 19 नागरिक, 43 जवान शहीद झाले तर 116 दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. 2016 मध्येच उरीचा हल्ला झला होता. त्यानंतर सर्जिकल स्ट्राईकही करण्यात आला होता. दहशतवादी हल्ले 112 झाले होते तर त्यात 14 नागरिक 88 जवान शहीद झाले आणि 165 दहशतवादी ठार मारले गेले. 2017 मध्ये 164 घटना घडल्या, त्यात 53 नागरिक मारले गेले, 83 जवान शहीद झाले तर 218 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. गेल्या वर्षी 2018 मध्ये अलिकडीच्या काळातील सर्वाधिक म्हणजे, 354 हल्ले झाले. त्यात 86 काश्मिरी नागरिक दगावले, 83 जवानही कामी आले पण 218 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. म्हणजे दरवर्षी शेकडो दहशतवादी मारले जात आहेत. तरीही तितकेच नवे पुन्हा तयारही होत आहेत. दहशतवादाच्या विरोधातली ही लढाई 2019 मध्येही आणखी तीव्र स्वरूपात चालूच राहिलेली दिसते आहे. पण जोवर याच्या मुळाशी भारताला पोहोचता येणार नाही, पाकपुरस्कृत दहशतवादी यंत्रणा उद्ध्वस्त करता येणार नाही तोवर काश्मीर शांत होऊ शकणार नाही.

एक धक्का और दो पाकिस्तान गिरा दो! पण असे केल्याने तरी दहशतवाद संपेल का या प्रश्नाचेही उत्तर भारताला शोधावे लागेल. पाकिस्तानशी संबंध सुधारावेत यासाठी भारताने एकतर्फी अनेक पावले उचलली आहेत. पण त्यालाही पाकने सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. अटल बहारी वाजपेयींनी पाकिस्तानला जाणारी बससेवा सुरू केली तेव्हा पाक लष्कराने कारगील घडवले. मनमोहन सिंह यांनी आंतरराष्टरीय स्तरावरून प्रय्तन केले तेव्हा पाक लष्कराच्या आयएसआयने थेट मुंबईवर भीषण हल्ला करणारे दहा दहशतवादी पाठवले. त्याआधी ९०च्या दशकामध्ये मुंबईत बाँबस्फोट मालिका घडवण्यासाठी दाऊदला आरडीएक्स पाकनेच पुरवले आणि पुन्हा दाऊदला कराचीत मोठ्या बंदोबस्तात ऐषारामात ठेवला. मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी शेजारच्या देशांशी चांगले संबंध व्हावेत याला प्राधान्य दिले. पण वारंवार भारतीय लष्करी तळांवर हल्ले, उरी, पठाणकोट आणि आता पुलवामासारख्या भीषण हल्ल्यांना पाक लष्कराने पाक सरकारने पाकच्या आयएसआयने उत्तेजनच दिले. शांतता व्यापार समृद्धी यालाच पाकचा विरोध आहे असे दिसते!

अलिकडेच भारताने व्यापारात पाकला झुकते माप देण्यासाठी सर्वाधिक प्रिय देश – मोस्ट फेवर्ड नेशन, हा दर्जा पाकिस्तानाला देऊन टाकला होता. तो दर्जा पुलवामा घटनेनंतर भारताने परत घेतला आहे. पण पाकला त्याने काही फरक पडणार आहे का? कारण त्यांनी भारताला तो दर्जा दिलेलाच नव्हता! त्यांच्यादृष्टीने मोस्ट फेवर्ड नेशन एकच आहे, चीन! चीनला पाकने तसा दर्जा दिलेला आहे. पाकला योग्य धडा शिकवण्याचे कोणते मार्ग सध्या भारताकडे आहेत. लष्कराला सरकारने कारवाईची जी मोकळीक दिलेली आहे ती सर्जिकल स्ट्राईकसारखी कारवाई असू शकते. त्यापुढचे पाऊल, मर्यादित प्रमाणात युद्ध हे असू शकते. ते उचलणे भारताला शक्य आहे का? मर्यादित म्हणून सुरू झालेले युद्ध कधीही व्यापक होऊ शकते, अण्वस्त्रे पाककडे आहेत हे विसरून चालणार नाही. मर्यादित युद्धाचा वापर करून भारताने पाकव्याप्त काश्मीर परत मिळवावा असा एक विचार सध्या मांडला जात आहे. पण तिथली जनता जर भारतात परत येण्यासाठी उत्सुक नसेल तर ते दुःसाहसच ठरेल. त्याने प्रश्न सुटेल की अधिक गुंतागुंतीचा बनेल? कारण त्या पलिकडच्या भागात केवळ काश्मिरी अतिरेकी राहतात असे नाही, तर अफगाण, तालिबान असेही अतिरेकी तिथेच आहेत. ते सारे आपल्याकडे घेऊन आणखी ताप तयार होऊ शकतो. तसे करता येईल का मुळात? पाकव्याप्त काश्मीर भारताला जोडणे हे युद्धाचेच पाऊल ठरेल. एक होऊ शकेल. पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय सैन्याने सर्व प्रशिक्षण केंद्रे उद्ध्वस्त केली तर तो एक भारताचा उद्देश्य सफल ठरू शकेल. या पाकव्याप्त काश्मीरमध्ये इस्लामाबादेतील पाक सरकारचे नाही तर लाहोरमध्ये बसलेल्या आयएसआयचे राज्य आहे. ते उद्ध्वस्त करणे हे भारतीय सुरक्षायंत्रणांचे एक उद्दिष्ट असू शकते. पण अशा कोणत्याही साहसी कृत्याआधी आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करावा लागेल. अमेरिका व रशियाकडून ते कारवाईचे समर्थनच करतील व पाकच्या बाजूने उभे राहणार नाहीत याची खातरजमा करावी लागेल. पण ते तितके सोपे नाही. चीनचा कसा बंदोबस्त करणार? हा त्यातला एक महत्त्वाचा उपप्रश्न आहे. कारण भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्य घुसवणे हे सरळसरळ चीनलाही आव्हान ठरणार आहे.”
 
“अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी

Continue reading

दिवाळीत प्रियजनांना भेट द्या वर्षभराच्या ‘फ्री’ फास्टॅगची!

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत...

फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी सीबीआयचे ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’!

आंतरराष्ट्रीय पातळीवर फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी तसेच जगभरातील पोलीस दलांसोबत रिअल-टाइममध्ये समन्वय साधण्याकरीता सीबीआयने नुकतेच ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’ स्थापन केले आहे. फरारी गुन्हेगारांचा मुद्दा केवळ देशाचे सार्वभौमत्व, आर्थिक स्थैर्य आणि कायदा आणि सुव्यवस्थेशीच नव्हे तर देशाच्या सुरक्षेशीदेखील संबंधित आहे. परदेशात...

धनत्रयोदशीच्या दिवशी ‘अशुभ’ दक्षिणेलाच का लावतात दिवा?

आपल्या भारतीय संस्कृतीत दिवाळीची सुरुवात दिवे प्रज्वलित करूनच केली जाते. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-परदेशात जिथे-जिथे दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो, तिथे-तिथे दीप पेटवूनच त्याची सुरुवात केली जाते. एरव्ही दक्षिण दिशेला दिवा पेटवणे अशुभ मानले जाते, परंतु धनत्रयोदशीला तो...
Skip to content