HomeArchiveमोदींच्या जीवनावर आधारित...

मोदींच्या जीवनावर आधारित भाजपाचे प्रदर्शन

Details
मोदींच्या जीवनावर आधारित भाजपाचे प्रदर्शन

    17-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 

केएचएल न्यूज ब्युरो
 
भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आयोजित प्रदर्शनाचे सोमवारी उद्घाटन केले. दादर येथील वसंत स्मृती भाजपा कार्यालयात आयोजित या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी भाजपाचे सरचिटणीस भूपेंद्र यादव, संयुक्त सरचिटणीस व्ही. सतीश, रेल्वेमंत्री पियुष गोयल, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा उपस्थित होते.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या प्रदर्शनात मोदींच्या बालपणीची, शालेय जीवनाची आणि देशसेवेसाठी समर्पित त्यांच्या जीवनाची कथा चित्ररूपात मांडण्यात आली आहे. याव्यतिरिक्त स्त्री शक्तीसमवेत देशाच्या विकासातील मोदींच्या कार्यकर्तृत्त्वाचे आणि सर्व निर्णयांचे चित्रण या प्रदर्शनामध्ये पाहयला मिळते.
 
 
उद्घाटनाच्या प्रसंगी नड्डा यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी लहानपणापासूनच समर्पित भावनेने काम करणारे व्यक्ती आहेत आणि म्हणूनच त्यांनी आजवर देशाला दृढनिश्चयाने पुढे नेले आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष लोढा यावेळी म्हणाले की, मोदींचे संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित आहे. हे समर्पण देशाच्या समृद्धीला आणखी दृढ करेल. पंतप्रधान मोदींच्या जीवनावर आधारित हे प्रदर्शन नव्या पिढीमध्ये नवीन मूल्ये रूजवण्याचेदेखील काम करेल.
 
 
महाराष्ट्र भाजपा सरचिटणीस विजय पुराणिक आणि मुंबई भाजपचे सरचिटणीस सुनील कर्जतकर, खासदार गोपाळ शेट्टी, पूनम महाजन आणि मनोज कोटक यांच्यासह शिक्षणमंत्री आशिष शेलार, महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर आणि नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर याप्रसंगी उपस्थित होते..
 
 

 

 ”

 

 

केएचएल न्यूज ब्युरो

 
“भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आयोजित प्रदर्शनाचे सोमवारी उद्घाटन केले. दादर येथील वसंत स्मृती भाजपा कार्यालयात आयोजित या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी भाजपाचे सरचिटणीस भूपेंद्र यादव, संयुक्त सरचिटणीस व्ही. सतीश, रेल्वेमंत्री पियुष गोयल, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा उपस्थित होते.”
 

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या प्रदर्शनात मोदींच्या बालपणीची, शालेय जीवनाची आणि देशसेवेसाठी समर्पित त्यांच्या जीवनाची कथा चित्ररूपात मांडण्यात आली आहे. याव्यतिरिक्त स्त्री शक्तीसमवेत देशाच्या विकासातील मोदींच्या कार्यकर्तृत्त्वाचे आणि सर्व निर्णयांचे चित्रण या प्रदर्शनामध्ये पाहयला मिळते.”
 
 
“उद्घाटनाच्या प्रसंगी नड्डा यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी लहानपणापासूनच समर्पित भावनेने काम करणारे व्यक्ती आहेत आणि म्हणूनच त्यांनी आजवर देशाला दृढनिश्चयाने पुढे नेले आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष लोढा यावेळी म्हणाले की, मोदींचे संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित आहे. हे समर्पण देशाच्या समृद्धीला आणखी दृढ करेल. पंतप्रधान मोदींच्या जीवनावर आधारित हे प्रदर्शन नव्या पिढीमध्ये नवीन मूल्ये रूजवण्याचेदेखील काम करेल.”
 
 
“महाराष्ट्र भाजपा सरचिटणीस विजय पुराणिक आणि मुंबई भाजपचे सरचिटणीस सुनील कर्जतकर, खासदार गोपाळ शेट्टी, पूनम महाजन आणि मनोज कोटक यांच्यासह शिक्षणमंत्री आशिष शेलार, महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर आणि नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर याप्रसंगी उपस्थित होते..”
 
 

 

 

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content