HomeArchiveमोदींची सफल बिश्बेक...

मोदींची सफल बिश्बेक वारी!

Details
मोदींची सफल बिश्बेक वारी!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
[email protected]
आंतरराष्ट्रीय स्थिती अधिकाधिक तणावाची होत असताना आणि भारताच्या तेल सुरक्षेचे नवे प्रश्न तयार होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी एकेकाळी सोविएत रशियाच्या पंखाखाली असणाऱ्या किर्झिगिस्तानमध्ये जाऊन आले. त्यांनी बिश्बेक या किर्झिगीज रिपब्लिक राष्ट्राच्या राजधानीपर्यंत पोहोचण्यासाठी जो मार्ग निवडला तोच या तणावाचा सूचक आहे. सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रक्रियेदरम्यान जो बालाकोट हवाई हल्ला गाजला. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाकिस्तानी भूमीत घुसून बालाकोट या गावाजवळील दहशतवाद्यांच्या तळावर जो प्रखर हल्ला भारतीय वायुसेनेने केला, तो अतिशय योग्य होता असेच मत भारताच्या सुजाण मतदाराने मतपोटीद्वारे व्यक्त केले आणि ते आधीचे सारेच वाद फोल ठरले. त्या फटक्यानंतर भारत व पाकिस्तान यांचे संबंध इतिहासातील अतिशय धोकायदायक अशा वळणावर पोहोचले होते, यात कुणालाही शंका नाही. त्या घटनेची मुळे अर्थातच पाक फुसकावणीने शिरजोर झालेल्या दहशवाद्यांनी भारतीय सुरक्षा यंत्रणांवर जो भ्याड हल्ला केला त्यात दडलेली होती. त्या संघर्षाची परिणती म्हणजे पाकिसतानने भारताकडे जाणारी अथवा भारताकडून येणारी कोणतीही विमाने पाकभूमीवरून उडू देणार नाही असा पवित्रा घेतला. हवाई सीमांच्या या बंदीमुळे भारतीय विमान कंपन्यांचे मोठे नुकसान झाले. दुबईकडे तसेच युरोप, अमेरिकेकडे भारतामधून उड्डाण करणाऱ्या अथवा भारताकडे येणाऱ्या विमानांची तिकिटे कडाडली. पाकिस्तानने ईदनिमित्ताने काही नागरी विमानांना पाक प्रदेशावरून उड्डाण करण्याची परवानगी देण्यास सुरूवात केली. शांघाय सहकार्य परिषदेची जी बैठक बिश्केक इथे भरली, तिथे जाण्यासाठी पंतप्रधान मोदींचे विमान पाक हद्दीवरून गेले तर चालेल असे पाकने आडूनआडून सुचवले होते. मात्र भारतीय परराष्ट्र खात्याने तशी विनंती करावी अशी पाकची इच्छा होती. त्या विनंतीवजा सांगाव्याकडे मोदींनी साफ दुर्लक्ष केले. आधी दक्षिणेकडे, नंतर पश्चिमेकडे व नंतर उत्तरेकडून पूर्वेकडे असे त्यांचे विमान गेले.

दिल्ली, दुबई, इराण, इराक, अफगाणिस्तान असा फेरा घेऊन मोदी किर्झिगिस्तानची राजधानी बिश्बेकला गेले, पण त्यांनी पाकभूमीवरून उड्डाण केले नाही. हे एक राजनैतिक संदेश देणारे पाऊल होते. पाकिस्तानच्या बाबतीत भारत कोणत्याही प्रकारची नरमाईची भूमिका घेणार नाही हेच पंतप्रधानांनी दाखवून दिले. जगाचा नकाशा पाहिला तर हे लक्षात येते की किर्झगिस्तान हा देश कझाकिस्तान, उझबेकिस्तान, रशिया आणि चीन यांच्या बेचक्यात आपल्या देशाच्या डोक्याकडील भागात, उत्तर दिशेने वर वसलेला आहे. पण मोदींनी हवाई प्रवासासाठी जो मार्ग निवडला तोही काही शांतीक्षेत्रातील नव्हताच. पंतप्रधान तिकडे पोहोचले आणि नंतर काही तासांतच पर्शियन खाडीच्या जवळील होर्मूसचे आखात नावाने ओळखल्या जाणाऱ्या सागरी प्रदेशात एक तेलवाहू आणि एक मालवाहू अशा दोन जहाजांवर हल्ले झाले. तोफांच्या भडिमारात ही जहाजे नष्ट करण्यात आली. अमेरिका इराण तणावाचे ते दृष्य स्वरूपच आहे. तेलासंदर्भात इराणची कोंडी करायची आणि अणु संशोधनातील त्यांची पावले रोखायची असा अमेरिकेचा डाव आहे. तो इराणला मान्य नाही. त्याचाही थेट परिणाम जसा जागतिक तेल बाजारावर होतो तसाच तो भारताच्या अर्थस्थितीवरही होतो आहे.

बिश्केक या किर्झिगिस्तानच्या राजधानीत मोदी पोहोचले आणि तिथे दोन दिवस चालणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत ते सहभागी झाले. जगात अनेक प्रदेशांमध्ये आसपासच्या देशांमध्ये अशा प्रकारच्या सहकार्य संघटना सुरू झालेल्या आहेत. भारतही अनेक अशा संघटनांचा सदस्य राष्ट्र आहे. त्या सर्वात जगातील सर्वाधिक भूभाग समाविष्ट असणारी आणि जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणारी अशी संघटना म्हणजेच शांघाय सहकार्य संघटना होय. चीनच्या पुढाकाराने मुख्यतः चीनच्या पश्चिम-उत्तर सीमेशी निगडित अशा पाच देशांची एक परिषद शांघायमध्ये 1996 मध्ये भरली ती एससीओ म्हणजेच शांघाय सहकार्य संघटनेची सुरूवात होती. सुरूवातीला त्यात चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्झिगिस्तान आणि ताजकिस्तान या रशिया व चीनच्या शेजारी राष्ट्रांचा समावेश होता. त्याला शांघाय पाच असे नाव होते. 2001 मध्ये त्यात उझबेकिस्तानचा समावेश झाला व एससीओ म्हणजेच शांघाय सहकार्य संघटनेची रीतसर स्थापना झाली.

भारत हा सुरूवातील त्यात निरीक्षक राष्ट्र म्हणून सहभागी होता. भारताचा तसेच पाकिस्तानाच व बेलारूसचा समावेश या संघटनेत त्यामानाने अगदी अलिकडे झालेला आहे. या सर्व राष्ट्रांनी एकमेकांशी व्यापारी व आर्थिक सहकार्य करावे लष्करी सहकार्यही आवश्यक तिथे व्हावे अशी संकल्पना एससीओ मागे आहे. एससीओची शिखर बैठक दरवर्षी एका सदस्य राष्ट्रांच्या राजधानीत होत असते. तशी ती परिषद गेले दोन दिवस बिश्केक इथे पार पडली. भारत पाकिस्तान संबंधातील तणावाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या परिषदेत मोदी व पाकचे पंतप्रधान इम्रान खान हे एकमेकांशी कसे बोलतात, वागतात व भेटतात याची उत्सुकता जगातील माध्यमांना होती. इम्रान खान यांनी तर तिथे जाण्याच्या आधीच रशियन वृत्तसंस्थेला मुलाखत दिली व त्यात म्हटले की भारताच्या नेत्यांबरोबर आमची बिश्केक इथे चर्चा भेट होईल. त्यात इम्रान खान यांनी खोडसाळपणा केलाच. ते म्हणाले की काश्मीरचा प्रश्न सार्वमताने सोडवला जाऊ शकतो. तिथे शांतता राहण्यावरच भारत पाक संबंध अवलंबून आहेत. त्यासाठी हवे तर जागतिक समुदायानेही मध्यस्थी करावी ती पाकिस्तानला मान्य असेल. भारताचे पंतप्रधान हे पुन्हा मोठ्या जनाधाराने सत्तेवर आले आहेत. ते काश्मीरचा प्रश्न जनतेच्या सहकार्याने सोडवतील अशी मला आशा आहे, इत्यादी बडबड खानसाहेबांनी केली. भारताने काश्मीरी लोकांच्या विरोधात बळाचा वापर बंद करावा असाही आगाऊपणाचा सल्ला इम्रान यांनी दिला आहे.

चीन व पाकची दोस्ती जगजाहीरच आहे. चिनी राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग व मोदींची पूर्वनियोजित भेट बिश्केकमध्ये पहिल्याच दिवशी झाली. त्यात उभय देशातंली सीमावाद लवकरात लवकर संपवण्यासाठी ज्या उच्चस्तरीय वाटाघाटी सुरू आहेत त्याला वेग यावा असे निर्देश उभय नेत्यांनी आपापल्या प्रतिनिधींना दिले. तिथे पाकिस्तानच्या संबंधांचा उल्लेख क्षी जिनपिंग यांनी केला तेव्हा भारताच्या पंतप्रधानांनी स्पष्ट व ठामपणाने सांगितले की हा मुद्दा उभयपक्षी चर्चेनेच सुटू शकतो. पण चर्चा होण्याची मुख्य अट पाकने पाळलेली नाही. त्यांनी दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवल्याचे आम्हाला दिसून आले पाहिजे हीच एकमेव अट आहे. त्याबाबतीत पाक जोवर पावले उचलत नाही, तोवर त्यांच्याशी कोणतीच चर्चा होऊ शकत नाही. मोदी व इम्रान खान हे राष्ट्रप्रमुखांच्या मेजवानीसाठी अन्य नेत्यांसमवेत बसले तेव्हा मोदींनी खान यांच्या दिशेने पाहिलेही नाही. बोलणे, हसणे, चर्चा हे तर दूरच. मोदींनी कठोर वागण्यातून भारताचा दहशतवादाशी लढण्याचा निर्धारच प्रकट केला.”
 
“अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी

Continue reading

दिवाळीत प्रियजनांना भेट द्या वर्षभराच्या ‘फ्री’ फास्टॅगची!

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत...

फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी सीबीआयचे ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’!

आंतरराष्ट्रीय पातळीवर फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी तसेच जगभरातील पोलीस दलांसोबत रिअल-टाइममध्ये समन्वय साधण्याकरीता सीबीआयने नुकतेच ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’ स्थापन केले आहे. फरारी गुन्हेगारांचा मुद्दा केवळ देशाचे सार्वभौमत्व, आर्थिक स्थैर्य आणि कायदा आणि सुव्यवस्थेशीच नव्हे तर देशाच्या सुरक्षेशीदेखील संबंधित आहे. परदेशात...

धनत्रयोदशीच्या दिवशी ‘अशुभ’ दक्षिणेलाच का लावतात दिवा?

आपल्या भारतीय संस्कृतीत दिवाळीची सुरुवात दिवे प्रज्वलित करूनच केली जाते. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-परदेशात जिथे-जिथे दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो, तिथे-तिथे दीप पेटवूनच त्याची सुरुवात केली जाते. एरव्ही दक्षिण दिशेला दिवा पेटवणे अशुभ मानले जाते, परंतु धनत्रयोदशीला तो...
Skip to content