HomeArchiveमेघवाडी तसेच मजासवाडी...

मेघवाडी तसेच मजासवाडी पोलीस वसाहतीची होणार दुरूस्ती!

Details
मेघवाडी तसेच मजासवाडी पोलीस वसाहतीची होणार दुरूस्ती!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
जनतेचे रक्षण करणारे पोलीस ज्या पोलीस वसाहतीत राहत आहेत, त्यांना तेथे चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी तब्बल ६ कोटी रुपये खर्चून करण्यात येणार्‍या अंतर्गत व बाह्य दुरुस्तीबरोबरच मजासवाडी येथे नव्याने बसविण्यात येणार्‍या लिफ्टच्या कामांचे भूमिपूजन राज्याचे गृहनिर्माण तसेच उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. एवढेच नव्हे तर या इमारतींना सातत्याने दुरुस्ती करण्याऐवजी त्यांचे सर्वेक्षण करुन पुनर्विकासाचा प्रस्ताव शासनास सादर करावा अशा, सूचनाही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत.

अंधेरी पूर्व म्हाडा पोलीस वसाहत येथे एकूण १३ इमारती आहेत. या सर्व इमारती सहा मजल्यांच्या आहेत. या १३ इमारतीत मिळून घरांची संख्या १०७९ इतकी असून, येथील सर्व निवासस्थाने ही १८० चौ. फुटांची आहे. या इमारतींना पूर्वी लिफ्ट होती. मात्र ती नादुरूस्त झाली होती. या लिफ्ट जुन्या असल्याने त्यात सातत्याने बिघाड होत होता. या इमारतीतील रहिवाशांना याचा बराच त्रास होत होता. त्यामुळे इमारतीमध्ये नव्याने लिफ्ट बसविण्यात याव्यात अशी मागणी येथील रहिवाशांकडून विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्याकडे सातत्याने करण्यात येत होती. त्यानुसार राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या प्रयत्नामुळे गृह विभागाकडून इमारतींमध्ये रुपये ३ कोटी ३४ लाख इतकी रक्कम खर्च करुन नवीन लिफ्ट बसविण्यात येणार आहेत.

जोगेश्‍वरी मेघवाडी येथील इमारत क्रमांक ७, ८ व ९ आणि मेघवाडी पोलीस ठाणे या इमारतींच्या अंतर्गत व बाह्य भागाच्या दुरवस्थेतही वाढ झाली होती. त्यामुळे या इमारतींचीही अंतर्गत व बाह्य दुरुस्ती करून इमारतीतील पोलीस कुटुंबियांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणीही रहिवाशांकडून करण्यात येत होती. त्यानुसार या चार इमारतींच्या दुरुस्तीसाठीही तब्बल ३ कोटी १७ लाख रूपये इतकी रक्कम मंजूर करण्यात आली असून या रकमेतून इमारतीची अंतर्गत व बाह्‌य दुरुस्ती करण्यात येणार आहे. यात इमारतीच्या बाह्य भागामध्ये खराब झालेले कॉलम, बीम, रंगकाम, छतावर ब्रिक बॅट कोबा वापरून गळती प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, सदनिकातील शौचालयात सिरॅमिक्स टाईल्स तसेच पी.व्ही.सी. फ्लश दरवाजे बसविणे, सदनिकेतील फरशी बदलून तेथे वेट्रीफाईड टाईल्स बसविणे, किचन ओटयाचे नूतनीकरण करणे, स्टीलचे सिंक बसविणे, सदनिकेचे अंतर्गत रंगकाम, दरवाजे व खिडक्यांचे नूतनीकरण आदी कामांचा यात समावेश आहे. या सर्व कामांचा भूमिपूजन राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विभाग समन्वयक विश्वनाथ सावंत, नगरसेवक प्रवीण शिंदे, महिला विभाग संघटक रचना सावंत, शालिनी सावंत, उपविभागप्रमुख कैलासनाथ पाठक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पाटील, उप अभियंता घोरपडे, मेघवाडी तसेच मजासवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारीही उपस्थित होते.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

महाराष्ट्राला मिळणार ४८ऐवजी ७२ खासदार?

भारतीय लोकशाहीत एक ऐतिहासिक बदल घडण्याच्या उंबरठ्यावर आहे. केंद्र सरकार "नारी शक्ती वंदन अधिनियम"मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित संशोधन विधेयकाद्वारे लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या ५४३वरून ८१६पर्यंत वाढवण्यात येईल. या ८१६ जागांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल २७३...

इराणसोबतचे युद्ध हा अमेरिकेने खेळलेला जुगार!

आज जागतिक भू-राजकारण अशा वळणावर उभे आहे जिथे लष्करी संघर्षाचा धूर थेट सामान्य माणसाच्या किचन आणि उद्योगांच्या ताळेबंदापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध केवळ लष्करी वर्चस्वाची लढाई राहिलेली नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरत आहे....

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...
Skip to content