HomeArchiveमुलुंड-गोरेगाव लिंक रोड...

मुलुंड-गोरेगाव लिंक रोड नियोजित वेळेतच पूर्ण होणार – मनोज कोटक

Details
मुलुंड-गोरेगाव लिंक रोड नियोजित वेळेतच पूर्ण होणार – मनोज कोटक

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा आणि ईशान्य मुंबई मतदारसंघासाठी महत्त्वाचाअसलेला मुलुंड-गोरेगाव लिंक रोड नियोजित वेळेत सुरू होऊन वेळेत पूर्ण होणारच, असा विश्वास महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी व्यक्त केला आहे. गोरेगाव फिल्मसिटी ते अमर नगर नाहूर, हा १४ किमी.चा सहापदरी नियोजित मार्ग ईशान्य मुंबईत राहणाऱ्या मुंबईकरांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा ठरणार असून त्यामुळे घाटकोपर, विक्रोळी व मुलुंड परिसरातील वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे.

मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या या प्रकल्पाची संकल्पना सर्वप्रथम १९६० साली मांडण्यात आली होती. मात्र इतकी वर्षे कागदावर असलेला हा प्रकल्प केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर झटपट मार्गी लागला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून हा मार्ग जाणार असला तराही या नियोजित मार्गामुळे राष्ट्रीय उद्यानातील जैवविविधतेला कोणताही धोका पोहोचणार नसल्याने नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफनेही या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. मुंबई महापालिकेने तयार केलेला हा प्रस्ताव राज्यशासनाच्या वन विभागाने मंजूर करून अंतिम मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवला आहे. तीन हजार कोटींचा अंदाजित खर्च असलेल्या या प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेत तसेच राज्यशासनाच्या पातळीवर भाजपने जोरदार प्रयत्न केले आहेत.

या प्रकल्पाबाबत बोलताना कोटक म्हणाले की, मुलुंड-गोरेगाव लिंक रोड या माझ्या मतदारसंघातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आम्ही महापालिकेत जोरदार पाठपुरावा केला होता. याशिवाय केंद्र आणि राज्यसरकारच्या पातळीवर ज्या अडचणी आल्या, त्यातूनही कायदेशीर चौकटीत राहून आम्ही मार्ग काढला. आता केंद्राच्या औपचारिक मंजुरीनंतर येत्या ऑक्टोबर महिन्यात हा प्रकल्प सुरू होणार असून नियोजित वेळेत तो पूर्ण होईल, असा आपणास विश्वास आहे. त्यासाठी आपण खासदार म्हणून आवश्यक तो सर्वपाठपुरावा करणार आहोत.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...

आयुष्मान खुरानाला ‘द अकादमी’चे आमंत्रण!

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना, ज्यांनी भारतामध्ये आपल्या विघटनात्मक आणि प्रगतीशील सिनेमाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यांना यंदा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणाऱ्या ‘द अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’कडून सदस्यत्वासाठी आमंत्रित करण्यात आले आहे! या प्रतिष्ठित...

आता ‘एटीएम’मध्ये जाऊन झटपट मिळवा ‘हेल्थ रिपोर्ट’!

"हेल्थ रिपोर्ट्स" मिळविण्यासाठी वाट पाहायचा जमाना आता जुना झालाय. "एटीएम"मध्ये जाऊन आपण पैसे काढतो, तितक्याच सहजतेने आणि झटपट आता "हेल्थ रिपोर्ट" मिळू लागले आहेत. राज्य सरकारच्या योजनेमुळे हे शक्य झाले आहे. सध्या नंदुरबार आणि चंद्रपूर जिल्ह्यात "हेल्थ एटीएम" मशीन...
Skip to content