HomeArchiveमुंबईतील वक्फ जमिनीचे...

मुंबईतील वक्फ जमिनीचे भाडे आता अडीच लाख!

Details
  

 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
वक्फ बोर्डाच्या जमिनी किंवा मालमत्ता खाजगी किंवा सार्वजनिक आस्थापनांना कवडीमोल दराने भाड्याने देण्याच्या प्रकारास आळा घालण्याच्या दृष्टीने राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागाने महत्त्वाची पाऊले उचलली आहेत. मुंबईतील एका मालमत्तेचा सुधारित भाडेकरार करताना मासिक भाडे रक्कम २ हजार ५०० रुपयांवरुन वाढवून ती मासिक २ लाख ५५ हजार रुपये करण्यात आली आहे.
 
यामुळे संबंधित ट्रस्टच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार असून या रकमेचा वापर ट्रस्टमार्फत अल्पसंख्याक मुस्लिम समाजातील मुलांच्या शिक्षणासह विविध समाजोपयोगी उपक्रमांसाठी करण्यात येणार असल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. सुधारित भाडेकरारास मान्यता देण्यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
 
“वक्फ प्रॉपर्टीज लीज रुल्स २०१४ साली झाल्यानंतर शासनामार्फत प्रथमच अशाप्रकारे मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असलेल्या सर्व संस्थांनी याच पद्धतीने आपल्या जमिनी आणि मालमत्तांचा सुयोग्य वापर करुन उत्पन्नात वाढ करावी. वाढीव उत्पन्नातून मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांचे शिक्षण, त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती योजना यासारखे समाजोपयोगी उपक्रम राबवावेत. वक्फ नोंदणीकृत संस्थांनी त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी मालमत्ता भाडेकरारावर देण्याबाबत वक्फ बोर्ड किंवा शासनाकडे सादर होणाऱ्या प्रस्तावांना शासनामार्फत मान्यता देण्यात येईल असेही नवाब मलिक यांनी सांगितले.”
 
वक्फ बोर्डांतर्गत नोंदणीकृत असलेल्या मुंबईतील रोगे चॅरिटी ट्रस्ट क्रमांक १ यांची भुलेश्वर डिव्हीजन रुपावाडी ठाकुरद्वार रोड येथील मिळकत ही इंडियन ऑईल कंपनीला भाडेकरारावर देण्यात आली आहे. १९३४पासून इंडियन ऑईल (तत्कालीन बर्मा पेट्रोलिअम कंपनी) सोबत भाडेकरार करण्यात आला आहे. या करारास वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. १९७८ ते १९८३ या काळात ८०० रुपये आणि १९८३ ते १९८८ या काळात १ हजार ७५० रुपये भाडे देण्याचे ठरले होते. नंतरच्या काळात काही कारणास्तव यासंदर्भात न्यायालयीन प्रकरण झाले. आता न्यायालयाचे यासंदर्भातील आदेश आणि विविध वक्फ नियमानुसार इंडियन ऑईल ही सरकारी कंपनी प्रतिमाह २ लाख (वार्षिक २४ लाख रुपये) तसेच ५ टक्के वार्षिक वाढीव दराने १५ वर्षांकरिता (१ जानेवारी २०१५ ते ३१ डिसेंबर २०२९) भाडेकरार देणार आहे. या हिशेबाने २०२०पासून संबंधित ट्रस्टला मासिक २ लाख ५५ हजार रुपये इतके भाडे मिळणार आहे. याशिवाय संबंधित ट्रस्टला मागील काळातील सुमारे १ कोटी रुपयांची थकबाकीही मिळणार आहे. यासंदर्भातील करार करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे असेही त्यांनी सांगितले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content