HomeArchiveमुंबईच्या विकास आराखडयाच्या...

मुंबईच्या विकास आराखडयाच्या अंमलबजावणीसाठी केंद्राचे विशेष पॅकेज आणणार

Details

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांचे आश्वासन
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईच्या विकास आराखडयाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारकडून 14 लाख 600 कोटींचे विशेष पॅकेज आणण्यासाठी पुढील पाच वर्षांत प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन, शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी दिले.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापात शेवाळे बोलत होते. पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या या वार्तालापापूर्वी अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी शेवाळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी कोषाध्यक्ष मंगेश वरवडेकर, कार्यकारिणी सदस्या स्वाती घोसाळकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून गेल्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले राहुल शेवाळे पुन्हा एकदा याच मतदारसंघातून महायुतीच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून आल्यावर आपण कोणत्या कामाला प्राधान्य द्याल, असा प्रश्न पत्रकारांनी राहुल शेवाळे यांना विचारला. त्यावर उत्तर देताना शेवाळे म्हणाले, मुंबईचा खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी कोणतीही मोठी गोष्ट न करता केवळ मुंबई विकास आराखड्याची 100% अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. गेल्या वेळेस जो विकास आराखडा मंजूर झाला होता, त्यातील केवळ 7 टक्के आराखड्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात झाली. जगातील कोणत्याही देशात विकास आराखड्याची इतकी अल्प अंमलबजावणी होत नसावी. यंदाचा विकास आराखडा तयार झाला असून त्याच्या अंमलबजावणीसाठी 14 लाख 600 कोटींच्या निधीची गरज आहे. मात्र, मुंबई महानगरपालिकेला इतका अवाढव्य खर्च शक्य नसल्याने पालिकेने यासाठी केवळ 3400 कोटींची तरतूद केली आहे. या वेगाने आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी तब्बल 100 वर्षांचा अवधी लागेल. म्हणून या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने विशेष पॅकेज द्यायला हवे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.

केंद्र सरकारने मुंबईच्या विकास आराखड्याला निधी दिला तर ती त्यांची गुंतवणूक असेल. कारण मुंबईचा विकास झाला तर केंद्र सरकारलाही मोठ्या प्रमाणात टॅक्स मिळू शकेल. यासाठीच 14 लाख 600 कोटींचे विशेष पॅकेज देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही शेवाळे यांनी स्पष्ट केले. विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका या तीनही आस्थापनांनी समन्वय साधणे गरजेचे असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली.”
 
“महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांचे आश्वासन

Continue reading

मुंबईच्या शहरी भागात आज पाणीपुरवठा विस्कळीत

मुंबई महापालिकेतर्फे शिवडी येथील टनल भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवर १५०० मिलीमीटर व्यासाचे दोन बटरफ्लाय व्हॉल्व बसविण्याचे काम हाती घेतले जात आहे. हे काम भंडारवाडा टेकडी जलाशय, फॉसबेरी टेकडी जलाशय आणि गोलंजी टेकडी जलाशय यांचा पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्यासाठी केले जाणार...

इराणकडून बाब-अल-मंदबची केली जाणार कोंडी?

अमेरिकेबरोबर कोणत्याही स्वरूपाची चर्चा करण्याची पाकिस्तानमार्फत करण्यात आलेली विनंती धुडकावून लावल्यानंतरही सध्याच्या युद्धविरामाला इराणबरोबरच्या पुढच्या चर्चेपर्यंत अनिश्चित काळासाठी वाढवण्यात येत असल्याची घोषणा आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ तसेच लष्करप्रमुख आसीफ मुनीर यांच्या आवाहनाला...

इराणने धुडकावली अमेरिकेबरोबरची चर्चा!

अमेरिका आणि इराणमध्ये झालेला दोन आठवड्यांचा युद्धविराम उद्या संपत असतानाच अमेरिकेबरोबर पाकिस्तानात होऊ घातलेल्या चर्चेला इराणने नकार दिला आहे. आम्ही सरशीत असताना आमच्या अटीशर्तींवरच अमेरिकेबरोबर चर्चा होईल, असे इराणच्या लष्करी गोटातून स्पष्ट करण्यात आले आहे. इराणच्या होर्मूझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण...
Skip to content