HomeArchiveमुंबईच्या प्रवेशद्वारावर महिलांसाठी...

मुंबईच्या प्रवेशद्वारावर महिलांसाठी वातानुकूलित स्वछतागृह!

Details
मुंबईच्या प्रवेशद्वारावर महिलांसाठी वातानुकूलित स्वछतागृह!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

उद्या अमृता फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन

केएचएल न्यूज ब्युरो
मुंबईत प्रवेश करणाऱ्या पूर्व व पश्चिम द्रूतगती मार्गावर महिलांसाठी स्वछतागृह नसल्याने लांबचा प्रवास करून येणाऱ्या महिलांची कुचंबणा रोजचीच होऊन बसली आहे. या परिस्थितीचा विचार करून भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या प्रयत्नातून मुंबईतील एकमेव व वातानुकूलित फक्त महिलांसाठी स्वछतागृह साकारले आहे. सामाजिक प्रश्नावर भान जागविणाऱ्या अमृता देवेंद्र फडणवीस यांच्याच हस्ते रविवारी या स्वच्छतागृहाचे उदघाटन होणार आहे.

दहिसर नाका म्हणजे मुंबईचे प्रवेशद्वार. या पश्चिम द्रूतगती मार्गावर वाहने प्रचंड संख्येने मुंबईत येत असतात. मात्र या मार्गावर महिलांसाठीचे स्वच्छतागृह शोधूनही सापडत नाही. त्यामुळे अत्यंत दर्जेदार आणि तेही फक्त महिलांसाठी स्वछतागृह उभारण्यासाठी दहिसर नाक्याची निवड करण्यात आली आहे. या स्वछतागृहात दोन सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनही बसविण्यात आली आहेत. या शौचालयासाठी स्वच्छता आणि सुरक्षेच्या दृष्टीने हाय मास्ट लॅम्प बसविण्यात आला आहे. हे शौचालय मुंबईसाठी एक पॅटर्न म्हणून पुढे यावे अशी रचना करण्यात आली आहे.

पालघर, वसई विरारकडून मोठा प्रवास करून मुंबईत प्रवेश करणाऱ्या महिलांसाठी, प्रवेशद्वारावरच फक्त महिलांसाठी हे स्वछतागृह उपलब्ध झाल्याने महिला वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः येथे महिलांच्या सन्मान आणि सुरक्षेच्या दृष्टीनेसुद्धा पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे स्वछतागृहाच्या परिसरात बसविण्यात आले आहेत.

स्वच्छ व सुरक्षित स्वच्छतागृहाची गरज

यापूर्वी कांदिवली हायवेला आमदार प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातून वातानुकूलित स्वच्छतागृह उभारण्यात आले होते. त्याची पाहणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. या स्वच्छ व नीटनेटक्या स्वच्छतागृहाचे कौतुक करीत, महिलांसाठीही असेच स्वच्छ व सुरक्षित स्वछतागृह असावे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या. त्यानुसार दहिसर चेकनाक्याजवळ महिलांसाठी अद्ययावत स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे.”
 
“उद्या अमृता फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन

Continue reading

नासाची ऐतिहासिक भरारी: चंद्राजवळून घेतले पृथ्वीचे विलोभनीय दर्शन!

नासाच्या 'आर्टेमिस २' मोहिमेने अंतराळ संशोधनाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. या मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्राच्या अतिशय जवळून पृथ्वीचे जे फोटो पाठवले आहेत, ते पाहून संपूर्ण जग थक्क झाले आहे. अथांग काळोखात तरंगणाऱ्या आपल्या निळ्याशार पृथ्वीचे हे फोटो इतके...

भारताचा राष्ट्रीय समुद्री दिवस! समुद्री स्वातंत्र्याची धाडसी कहाणी!!

आज ५ एप्रिल २०२६. ५ एप्रिल १९१९... मुंबई बंदरात रात्रीचा अंधार, वादळी वारे आणि उंच लाटांचा गर्जना! ब्रिटिश साम्राज्य समुद्रावर पूर्णपणे राज करत होतं. भारतीयांना जहाज चालवण्याचीसुद्धा परवानगी नव्हती. एक चूक आणि सगळं संपलं! पण, त्या रात्री एक छोटंसं...

तुमचा कॅमेरा बंद तर नाही ना?

एक एप्रिल २०२६पासून भारतात लागू झालेल्या नव्या सीसीटीव्ही नियमांमुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. “घरातील कॅमेरा बंद पडणार का?” असा प्रश्न अनेकांकडून विचारला. मात्र, केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार, आधीपासून वापरात असलेल्या कॅमेर्‍यांवर कोणताही परिणाम होणार नसून, हा निर्णय मुख्यतः...
Skip to content