Details
माझे लक्ष वेळेकडे – उद्धव ठाकरे
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
शिवाजीराव यांच्या सभेला आल्याशिवाय निवडणुकीची गंमत येत नाही. चौकार, षटकार मारला पाहिजे. सध्या आय.पी.एल सुरू आहे. बंद पडलेली घड्याळं असतात. माझं लक्ष घड्याळाकडे नाही वेळेकडे आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी शिरूरमध्ये झालेल्या जाहीर सभेत केले.
समोरील जमलेली जनता आपल्याला सन्मानाने दिल्लीत पाठवणार आहे. शरद सोनवणे यांनी मनातला भगवा सोडला नाही याला निष्ठा म्हणतात. आशाताई बुचके नाराज होत्या. पण त्या रणरागिणीनी आहेत. खासदार तुमच्यासोबत राहून काम करणारा पाहिजे की नाटकात काम करणारा खासदार पाहिजे. आमच्या खासदारांनी केलेल्या कामांचे कट-पेस्ट विरोधक करत आहेत. आमचे पंतप्रधानांचे उमेदवार नरेंद्र मोदी आहेत. त्यांच्याकडे एक नाव तरी आहे का? काँग्रेस आघाडीकडे बुडबुडे भरपूर आहेत, पण चेहरा एकही नाही. पन्नास वर्षांमध्ये आम्ही नाही भगवा बदलला, ना नेता बदलला. माझ्या मातेशी आणि मातीशी इमान राखणारा भगवा खांद्यावर घेतला आहे, असेही ते म्हणाले.
शिवसेना-भाजप यातील खट्टा-मीठा वाद होता. शेतकऱ्यांसाठी आणि तुमच्यासाठी युती केलेली आहे. आपल्यासाठी एक-एक खासदार महत्त्वाचा आहे. या शिरूर मतदारसंघाच्या विकासाची जबाबदारी मी घेतो. गिरीश बापट तुम्ही पुण्याचे पालकमंत्री आहात. पण मी शिवसेनेच्या 23 खासदारांचा पालक आहे. मावळा म्हटलं की संकटाला डगमगत नाही. शिवाजीराव या जनतेचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत. शिवाजीरावांचा विजय हा समोरच्याचे डिपॉझिट जप्त करणारा दणदणीत विजय मला हवा आहे, असेही ठाकरे म्हणाले.
ही विजयाची सभा – गिरीश बापट
आढळराव तुम्ही काय केले हे लोकांना सांगायची गरज नाही. लोकांनी ठरवलं आहे. ही विजयाची सभा आहे. ही निवडणूक ही 130 कोटी जनतेचे भविष्य ठरवणारी आहे. ५० वर्षांत जे त्यांच्या बापजाद्याना जमले नाही ते आम्ही पाच वर्षात करून दाखवत असल्याने त्यांची घालमेल होत आहे, असे भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीश बापट म्हणाले.
भगवा फडकवण्याचा जनतेचा निर्णय – आढळराव
लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यावर लक्षात आले की, सर्व जनतेच्या मनात एकच भावना आहे की, शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्णय मतदारांनी घेतलेला आहे. काँग्रेसच्या काळात महामार्ग प्रकल्पांसाठी १० वर्षे पाठपुरावा केला. पण काहीच झाले नाही. युतीच्या काळात महामार्गाचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. युतीच्या काळात रेल्वे महामार्गाचे काम ७,५०० कोटी रूपयांचा प्रकल्प मंजूर झाला. अष्टविनायक जोड प्रकल्प झाला. 850 कोटी रुपयांची कामे मंजूर झाली आहेत. राष्ट्रवादीच्या चार खासदारांची कामे आणि माझी कामे यांची तुलना करा. माझी कामे ही त्यांच्यापेक्षा दुप्पट आहेत, असे शिवाजीराव आढळराव यांनी सांगितले.”
“केएचएल न्यूज ब्युरो