Details
मागाठाणेचे विविध प्रश्न लवकर मार्गी लागणार – प्रकाश सुर्वे
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईतल्या मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्न लवकर मार्गी लागणार असून पालिका उपायुक्त विश्वास शंकरराव आणि संबंधित सहाय्यक पालिका आयुक्तांबरोबर मंगळवारी झालेल्या बैठकीत सकारत्मक चर्चा झाली अशी माहिती येथील शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी दिली.
मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील विविध नागरी समस्या सोडविण्यासाठी म.न.पा. उपायुक्त विश्वास शंकरराव यांच्या दालनात आर/उत्तरचे सहा. आयुक्त संध्या नांदेडकर, आर/मध्यचे सहा. आयुक्त रमाकांत बिराजदार आणि आर/दक्षिणचे सहा. आयुक्त संजय कुराडे यांची संयुक्त बैठक आयोजित करून येथील विविध समस्या सोडवण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असेही त्यांनी सांगितले.
या बैठकीत दहिसर पूर्व गणूबुवा कंपाऊंड, केतकीपाडा येथील हनुमान नगर रोडमध्ये बाधित होणाऱ्या झोपडीधारकांचे नाव परिशिष्टमध्ये आले असून सदर झोपडीधारकांना प्रकल्पबाधित व्यक्ती (पी.ए.पी) अंतर्गत लवकरच घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला. बोरिवली (पूर्व) शनी मंदिर, चोगले नगर ते नॅन्सी वसाहतमधील रस्ता आर/उत्तर आणि आर/मध्य यांच्या अंतर्गत येत असून सादर रस्ता विकासापासून वंचित होता. सदर बैठकीत विकासात अडथळा येणाऱ्या रस्त्यामधील ३ घरे काढून त्यांना प्रकल्पबाधित व्यक्ती (पी.ए.पी.) अंतर्गत लवकरच घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला व सदर रस्ता विकसित करण्याचे आदेश देण्यात आले. बोरिवली पूर्व मित्रत्व सह. गृह. निर्माण संस्था, देवीपाडा, बोरिवली येथील कित्येक महिने पडलेल्या डेब्रीज त्वरित उचलण्याचे आदेश उपायुक्त शंकरराव यांनी दिले.
दहिसर (पूर्व) शिवाई संकुल इमारत, शिव वल्लभ क्रॉस रोड, अशोकवन येथील रूग्णालय ८ ते १० दिवसांमध्ये महानगरपालिकेला हस्तांतरित करण्यात येणार आहे आणि लवकरच सर्व प्रक्रिया पूर्ण करून नागरिकांसाठी सुरू करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. कांदिवली पूर्व लक्ष्मीनगर, दामूनगर येथील शेवटच्या बसस्थानकाजवळचा मुख्य नाला स्थानिक विकासकाने स्वहितासाठी बुजवून त्याचे रूपांतर लहान नाल्यात केल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरते. सदर बैठकीत उपायुक्तांनी कुराडे यांना पाहणी करून विकासकावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देऊन मुख्य नाला पुन:र्स्थितीत आणण्याचे आदेश दिली, असेही त्यांनी सांगितले.
कांदिवली (पूर्व) साळुंखे कंपाउंड, सिंह इस्टेट येथील डेब्रिज आणि कचरा काढा असे वारंवार स्थानिक नगरसेविकेने सांगूनदेखील कोणतीही कारवाई केली जात नव्हती. मात्र, या बैठकीत यावर त्वरित कारवाई म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना डेब्रिज त्वरित उचलण्याचे आदेश दिले. एकंदरीत या बैठकीत मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी लागले असा विश्वास आमदार प्रकाश सुर्वे यांनी व्यक्त केला. बैठकीस नगरसेवक संजय घाडी, माजी नगरसेवक भास्कर खुरसंगे, शाखाप्रमुख प्रकाश पुजारी, विठ्ठल नलावडे, सचिन केळकर आदी उपस्थित होते.”
“केएचएल न्यूज ब्युरो