Details
मागठाणेत विजय संकल्प मेळावा संपन्न!
30-Sep-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
मुंबईतल्या मागठाणे विधानसभेतील सौराष्ट्र पटेल हॉल, अशोकवन, दहिसर (पूर्व) येथे शिवसेना विभाग क्रमांक १च्या विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांनी नुकतेच केले. सदर मेळाव्यात प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून महाराष्ट्राचे उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई, प्रसिद्ध अभिनेते दिगंबर नाईक, म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर, विभागप्रमुख व आमदार विलास पोतनीस, विभागसंघटक सुजाता शिंगाडे व मागठाणे विधानसभेतील सर्व नगरसेवक उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थितांना संबोधताना सुभाष देसाई यांनी मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी शिवसेनेची स्थापना बाळासाहेबांनी केली व आजही मराठी माणसाच्या व महाराष्ट्राच्या विकासासाठी शिवसेना किती महत्त्वाची आहे हे सांगितले. मागठाणेत सर्व बूथप्रमुख, चाळ व इमारत प्रतिनिधी यांची उपस्थिती पाहून निवडणुकीची जय्यत तयारी मागठाणेची झाली असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले व येणाऱ्या निवडणुकीत महायुती होणारच, असा विश्वास सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.
आमदार प्रकाश सुर्वे यांनी आपल्या भाषणातून मागठाणेमध्ये केलेल्या विकासकामांची यादीच सादर केली. मागाठाणेतील २३२ रूग्णांवर ५ कोटी २८ लाख रूपयांचे मोफत इलाज केले गेले. ४६८ रूग्णांवर मोतीबिंदूची मोफत शस्त्रक्रिया केली. ५० रूपयात डायलिसीस करणारे सेंटर दहिसरमध्ये उभे केले. २३८० ज्येष्ठ नागरिकांना काशी विश्वनाथाचे मोफत दर्शन घडवून आणल्याचे सुर्वे यांनी सांगितले.
सदर मेळाव्यात शिवसेनेचे पुरूष व महिला सर्व शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, चाळ व इमारत प्रतिनिधी व हजारो शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेचे स्टार प्रचारक अभिनेते दिगंबर नाईक यांनी मालवणी भाषेतून संवाद साधला व शिवसेनेच्या विजयाचे मालवणी भाषेतून गाऱ्हाणे घातले. त्याला होय महाराजा म्हणत उपस्थित शिवसैनिकांनीदेखील प्रतिसाद दिला.”
केएचएल न्यूज ब्युरो
“मुंबईतल्या मागठाणे विधानसभेतील सौराष्ट्र पटेल हॉल, अशोकवन, दहिसर (पूर्व) येथे शिवसेना विभाग क्रमांक १च्या विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांनी नुकतेच केले. सदर मेळाव्यात प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून महाराष्ट्राचे उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई, प्रसिद्ध अभिनेते दिगंबर नाईक, म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर, विभागप्रमुख व आमदार विलास पोतनीस, विभागसंघटक सुजाता शिंगाडे व मागठाणे विधानसभेतील सर्व नगरसेवक उपस्थित होते.”
“याप्रसंगी उपस्थितांना संबोधताना सुभाष देसाई यांनी मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी शिवसेनेची स्थापना बाळासाहेबांनी केली व आजही मराठी माणसाच्या व महाराष्ट्राच्या विकासासाठी शिवसेना किती महत्त्वाची आहे हे सांगितले. मागठाणेत सर्व बूथप्रमुख, चाळ व इमारत प्रतिनिधी यांची उपस्थिती पाहून निवडणुकीची जय्यत तयारी मागठाणेची झाली असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले व येणाऱ्या निवडणुकीत महायुती होणारच, असा विश्वास सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.”
आमदार प्रकाश सुर्वे यांनी आपल्या भाषणातून मागठाणेमध्ये केलेल्या विकासकामांची यादीच सादर केली. मागाठाणेतील २३२ रूग्णांवर ५ कोटी २८ लाख रूपयांचे मोफत इलाज केले गेले. ४६८ रूग्णांवर मोतीबिंदूची मोफत शस्त्रक्रिया केली. ५० रूपयात डायलिसीस करणारे सेंटर दहिसरमध्ये उभे केले. २३८० ज्येष्ठ नागरिकांना काशी विश्वनाथाचे मोफत दर्शन घडवून आणल्याचे सुर्वे यांनी सांगितले.
“सदर मेळाव्यात शिवसेनेचे पुरूष व महिला सर्व शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, चाळ व इमारत प्रतिनिधी व हजारो शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेचे स्टार प्रचारक अभिनेते दिगंबर नाईक यांनी मालवणी भाषेतून संवाद साधला व शिवसेनेच्या विजयाचे मालवणी भाषेतून गाऱ्हाणे घातले. त्याला होय महाराजा म्हणत उपस्थित शिवसैनिकांनीदेखील प्रतिसाद दिला.”
मुंबईमागठाणे विधानसभाविजय संकल्प मेळावासुभाष देसाईप्रकाश सुर्वेअभिनेते दिगंबर नाईककाशी विश्वनाथ