Details
महिना अखेरीस डेहराडूनमध्ये ड्रोनाथॉन..
01-Jul-2019
”
विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
आताच्या माहिती तंत्रज्ञान युगात ड्रोन माहिती नाही असा तंत्रप्रेमी माणूस सापडणे मुश्किलच! अशा ड्रोनच्या क्षमतेविषयी बरेच काही सांगितले, बोलले जाते. त्याविषयीची उत्सुकता लक्षात घेऊन उत्तराखंड सरकारने ड्रोनाथॉन प्रदर्शनचं आयोजन त्यांच्या ड्रोन नगरीत भरवण्याचं ठरवलं आहे. या प्रदर्शनात वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन पाहण्यास मिळतील. सध्याच्या काळात सुरक्षेपासून मॅपिंगपर्यंत अनेक कामात ड्रोनचा वापर होतोय. विविध सरकारी उपक्रम नि खाजगी क्षेत्रातील कंपन्यांना एकत्रित आणण्याचे प्रायत्न झाले नव्हते, ते इथे होत आहेत. उत्तराखंड सरकारच्या सूचना आणि प्रौद्योगिकी विभागाने हे अखिल भारतीय ड्रोन फेस्टिवल भरवले आहे. राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेन्द्रसिंह रावत याचे उद्घाटन करणार आहेत. मंगळवारी उदघाटन सत्र नि नंतर मार्गदर्शन, बुधवारी सकाळी मार्गदर्शन असून दुपारच्या जेवणानंतर दोनपासून संध्याकाळपर्यंत ड्रॉनोड्डाणाचा कार्यक्रम असेल.
या मेळाव्यात इतरही विशेष कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. प्रदर्शनसोबतच कार्यशाळाही आयोजित केलीय. २६ नि २७ फेब्रुवारी या दोन दिवशी याच आयोजन तसेच ड्रोन स्पर्धाही होईल. यात ड्रोनची अडथळा शर्यत, ड्रोन पेलोड ड्रॉपिंग, इमेज अनलिसिस आदीचा अंतर्भाव आहे. देशात बनवलेल्या ड्रोनच्या नाना करामती पाहून प्रेक्षक आश्चर्याने तोंडात बोटं घातल्याशिवाय राहणार नाहीत असा आयोजकांचा दावा आहे.
देशभरातील तमाम विभागांना याचं निमंत्रण गेलंय, जे ड्रोनचा उपयोग करतात. यात खाजगी क्षेत्रातील कंपन्याहही मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. राज्याचे संचालक अमित सिन्हा यांच्या म्हणण्यानुसार आजपर्यंत देशात संशोधन, सरकार आणि उद्योग जगत यात ड्रोनच्या वापराबाबत नि विकासासंदर्भात मोठी पोकळी राहून गेलीय. याद्वारे ती भरून काढण्याचा प्रयत्न आहे. या तंत्रज्ञानाचा अवलंब करून जास्तीतजास्त विकासासाठी प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे. मोदी सरकारचा भरवसा डिजिटल इंडियावर असल्याने निवडणूक काळापूर्वी याचं आयोजन उपयुक्त ठरेल.
सीमेवर नजर ठेवण्यासाठी मानवविरहित ड्रोनची उपयुक्तता अधिक आहे, हे आता सर्वश्रृत आहे. त्यादृष्टीने काही देशातून त्याचा वापरही होतो. चीनच्या सीमेवर मोठया प्रमाणात ड्रोन असल्याचे सांगितले जाते. भारतीय सीमेवरही त्यासाठी तयारी झालीय. देशाचा रशियानंतरचा दुसरा लष्करी मित्र इस्त्रायल पुढे सरसावला आहे. अर्थातच रक्कम चुकती करूनच! संरक्षण मंत्रालयाने नुकतीच वायुसेनेसाठी ५४ “हरोप किलर” ड्रोन खरेदीस मंजुरी दिली आहे. याचा उपयोग चीन, पाकिस्तान सीमेसाठी होणार असून याच्या तैनातीने सुरक्षा नि शांततेची स्थिती सुधारण्यास मदत होणे अपेक्षित आहे.
सद्यस्थितीत भारतीय वायू सेनेकडे जवळपास ११० ड्रोन आहेत. हे ड्रोन हेरगिरी करणाऱ्या ठिकाणांसह रडार स्थानं ओळखून त्यांचा यशस्वीपणे अचूक वेध घेण्यास सक्षम आहेत असे सूत्रांचे म्हणणे आहे. युद्धनिपुण ड्रोन विमानांच्या योजनेवर भारत काम करीत असून ती पूर्ण झाल्यावर शत्रू सीमेवर त्याची देखरेखीसाठी तैनाती होईल असे संरक्षण तज्ज्ञांना वाटते. मोदी सरकारकडून इस्रायलशी होणाऱ्या संरक्षण करारांमुळे आशिया विभागातील शस्त्रस्पर्धा वाढल्याचं काहींना वाटतं.
जमिनीवरून रिमोट कंट्रोलच्या मदतीने चालणाऱ्या या विमानांचा वापर कुठेही करता येतो. लग्न, इतर समारंभ यात फोटोग्राफीसाठी सर्रास ड्रोन वापरले जातात. मुंबईत अलिकडे पिझ्झा, टपाल ने-आण करण्यासाठी याचा वापर केला गेला. मात्र, सुरक्षा कारणाकरिता त्यावर बंदी घालण्यात आली. टेहळणी आणि हवाई हल्ल्यासाठी, उंचावरून चित्रे काढण्यासाठी तसेच नकाशा आरेखन याकरिता याचा छान वापर होतो. पुढील काळात पोलीस, शेती, आरोग्य, वन्यजीव संरक्षण, पार्सलसेवा, दुर्गम भागात मदतसेवा, आपत्ती व्यवस्थापन, तीर्थक्षेत्र, कुंभमेळा, गणेश विसर्जन, यातही हे तंत्रज्ञान उपयोगी असणार आहे. वेळेची गणितं पाहता होम डिलिव्हरीसाठी मोठया प्रमाणात वापर होऊ शकतो. अमेरिकेने याचा परिणामकारक वापर तालिबान्यांना ठेचण्यासाठी केला. सौर ऊर्जेवर चालणारे ड्रोन अधिक प्रगत झाल्यास बॅटरी चार्जिंग समस्या दूर होईल. गेल्याच महिन्यात ऊस कीड नियंत्रणासाठी काही भागात ड्रोनच्या मदतीने फवारणीचा प्रयोग केला गेला.
ड्रोन फेस्टची अधिक माहिती हवी असल्यास ती dronefest.in या वेबसाइटवर मिळू शकते. त्याचप्रमाणे दूरध्वनी ०६३९७६९७३४५, [email protected] येथेही ती मिळू शकेल. ड्रोनप्रेमी असाल तर विचारणा करा नि व्हा सहभागी!”
“विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार