Details
महाराष्ट्र पोलीस पाईप बँडमध्ये अव्वल!
01-Jul-2019
”
विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
सी. आर. पी. एफ. बँड सर्वश्रेष्ठ
अखिल भारतीय पोलीस बँड पथकाची १९वी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा नुकतीच जम्मूत पार पडली. त्यात ‘पाईप बँड’ प्रकारात महाराष्ट्र पोलीस अव्वल ठरले आहेत तर सी. आर. पी. एफ. सांघिक गटात विजेते ठरले.
देशभरातील केंद्रीय सशस्त्र दले आणि राज्य पोलिसांच्या २३ पथकांनी यात सहभाग घेतला.
जम्मू काश्मीर राज्याने दुसऱ्यांदा याचं आयोजन केलं होतं.२००२ मध्ये श्रीनगरला ही स्पर्धा झाली होती. यावेळी ३२ महिलांसह १४४८ सदस्यांनी भाग घेतला. जम्मूच्या गुलशान ग्राउंडवर ही स्पर्धा झाली तर झारखंड पोलिसांचा सामील झालेला एकमेव बँड होता, जो सर्व महिलांचा होता. त्यामुळे कौतुक होऊन त्याची बरीच चर्चा झाली.
जम्मू काश्मीर, झारखंड, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू, पंजाब, ओदिशा, कर्नाटक, आसाम रायफल्स, राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, बी.एस.एफ., एस.एस.बी., सी.आर.पी.एफ., सी.आय.एस.एफ.,आदी पथके सामील झाली होती. राज्यपाल सुमित मलिक यांचे सल्लागार विजय कुमार मुख्य अतिथी तर राज्याचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दिलबाग सिंह यांनी बँड विकास नि त्याचे दलातील महत्त्व यावर मनोरंजक माहिती दिली. वेगवेगळ्या रंगभूषेत हे मैदान फारच सुंदर, विलोभनीय दिसत आहे, जे पूर्वी कधीच वाटले नव्हते असे ते म्हणाले.
सेंट्रल पोलीस फोर्स बँड बोर्डची निवड समिती परीक्षक म्हणून हजर होती. यात लष्कराचे दोन निवृत्त अधिकारी सहभागी झाले होते. उदघाटनावेळी आंध्र प्रदेशच्या पथकाने परेड मार्चची सुरूवात केली तर शेवट जम्मू काश्मीर पोलिसांनी केला. ५ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत ही १८ वी पोलीस बँड स्पर्धा पार पडली. त्याआधी या राज्याच्या डेअर डेव्हील पथकाने मोटारसायकल कवायती सादर केल्या.
पोलीस बँड हा किंवा बँड हा प्रत्येक संरक्षण दलाच महत्त्वाचा घटक असतो.आपल्या कार्यकाळात तीन वेळा याचा भाग बनलो होतो. मी यात परीक्षक नाही याचं समाधान असून निवड करणे अवघड झालं असतं अशा शब्दात विजयकुमार यांनी देशातील पथकांच कौतुक केलं. एकमेव महिला पथक झारखंडने पाठवल्याबद्दल त्यांनी विशेष अभिनंदन केले.
जम्मू काश्मीर पोलीस राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धा शिवाय राज्यात शांती ठेवण्यासाठी कार्यरत असते. अशा तर्हेच्या आयोजनाने एकमेकांशी भेटीगाठी होतात, सामंजस्याची नि स्पर्धा करण्याची भावना तयार होते, असं समारोपप्रसंगी राज्यपाल सल्लागार के. के. शर्मा म्हणाले. स्पर्धेमुळे विविध भागांतील स्पर्धकांच्या प्रतिभेचं प्रदर्शन दिसून कलात्मक प्रतिभा संपन्न होण्यास वाव मिळतो असं सांगत या स्पर्धेत केंद्रीय सशस्त्र दलाच्या ७ तर राज्य पोलिसांच्या १६ चमूने भाग घेऊन यजमानपद भूषावण्याची संधी दिल्याबद्दल अ. भा. पोलीस खेळ नियंत्रण बोर्डाचे आभार मानले. सी.आर.पी.एफ.ला बुगले कॉल श्रेणीतील तर जम्मू काश्मीर पोलिसांना ब्रास बँड विजेते घोषित करण्यात आले.”
“विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार