Details
महात्म्याचे विचार व आचार!
03-Oct-2019
”
अनिकेत जोशी..
संपादक, बित्तंबातमी
aniketsjoshi@hotmail.com
एखाद्या नेत्याच्या मृत्यूच्या सात दशकानंतर आणि त्याच्या जन्मापासून दीडशे वर्षांनंतरही त्याच्या देशातल्या नागरिकांनाच नव्हे तर जगातील नागरिकांनाही त्याच्या विचारांच्या प्रकाशात वाटचाल करता यावी, हेच त्या नेत्याचे मोठेपण आहे. असे मोठेपण मिरवणाऱ्या महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंती निमित्ताने आज आपण त्यांचे स्मरण करत आहोत. देश त्यांना वंदन करत आहे. २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातेतील पोरबंदरला जन्मलेला हा महात्मा वयाच्या ७९व्या वर्षी ३० जानेवारी १९४८ रोजी एका माथेफिरूच्या गोळीला बळी पडला. ज्या स्वातंत्र्यासाठी गांधींनी आयुष्यभर संघर्ष केला आणि ज्यांच्या चळवळीमुळेच स्वातंत्र्य पुष्कळ जवळ आले त्या गांधींनी १५ ऑगस्ट १९४७ च्या स्वातंत्र्यदिनाच्या अधिकृत कोणत्याच कार्यक्रमात सहभाग घेतला नाही. त्यांनी झेंडा फडकवण्यासही नकार दिला. इतकेच नाही तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी जनतेला संदेश द्या ही नेहरूंची विनंती त्यांनी धुडकावून लावली. का, तर स्वतंत्र झाल्यापासूनच किंवा खरेतर त्याच्या थोडे आधीपासूनच भारतात प्रचंड जातीय दंगे उसळले होते. हिंसाचाराचा आगडोंब उसळला होता आणि ती घटना गांधींना प्रचंड अस्वस्थ करून टाकत होती.
त्यांनी आयुष्याची अखेरीची दोन वर्षे तो आगडोंब शांत करण्यासाठी आणि त्यातील जखमांवर मलमपट्टी करण्यासाठी खर्च केली. त्यांनी सरकारने देऊ केलेली सुरक्षा व्यवस्थाही नाकारली आणि एकटेच नौखालीच्या गाव-गल्ल्यांतून दोन्ही समाजांना शांततेचे आवाहन करत फिरले. आयुष्यभर अहिंसेचा आग्रह धरणारा हा नेता हिंसाचाराचाच बळी ठरावा, हे या देशाचे दुर्दैव होते. अनेकांनी याविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. जर नथुराम गोडसेने आततायीपणा केला नसता, तर गांधींची अखेर कशी झाली असती, गांधींच्या विरोधकांच्या मते काँग्रेस पक्ष व काँग्रेस सरकारच्या उपेक्षेनेच गांधींची अखेर ओढवली असती. कारण त्यांची टोकाची मते व हट्टाग्रह नेहरूंच्या सरकारला व्यवहार्य वाटत नव्हते. गांधींच्या मतांच्या व विचारांच्या विरोधात सरकारची वाटचाल होत होती. गांधी हे सरकारला पेलवणारे नव्हते. महात्मा ही मान्यता सर्व समाजाने त्यांना दिली. पण त्या आधीची मोहनदास करमचंद गांधींची सारी वाटचाल ही अतिशय कष्टप्रद आहे.
संघर्ष तर त्यांच्या पाचवीलाच पुजलेला होता. त्यांनी स्वतःच्या लिखाणातूनही त्या संघर्षाच्या अनेक प्रसंगांची साद्यंत वर्णने दिलेली आहेत. महात्मा गांधी बॅरिस्टर बनून दक्षिण आफ्रिकेत पोहोचले हे इतिहासातील वळण जगाचा इतिहास बदलणारेच ठरले. जणू तो नियतीचा गांधींबरोबरचा करारच असावा! कारण तिथेच त्यांच्यातील एक निराळे करारी नेतृत्त्व घडले. पहिल्या वर्गाच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या या तरूण भारतीय वकिलाला टीसीने डब्यातून धक्के मारून उतरवले. त्यांना शिवीगाळ व मारहाण होण्याचे अनेक प्रसंग दक्षिण आफ्रिकेत घडले. तिथे अध्यक्ष क्रुगर यांच्या घरासमोरून चालत जाण्याचे धारिष्ट्य दाखवल्याबद्दल गांधीना पकडून मारहाण तर झालीच पण तुरूंगात टाकले गेले. तुरूंगात भयानक गुन्हेगारांसोबत त्यांना लहान जागेत राहवे लागले. त्यांच्या क्रूर वर्तनाचे ते बळीही ठरले. अनन्वित अत्याचार सहन केल्यानंतर, भोगल्यानंतर त्यांना त्यातून एक निराळा अर्थ सापडला आणि तोच जगाचे भवितव्य बदलणाराही ठरला. त्यांनी विचार केला की, अन्याय, अत्याचार करणारा जितका दोषी आहे, तितकाच ते सहन करणाराही दोषी आहे. अन्याय ज्याच्यावर होतो त्याच्या सहकार्याशिवाय, त्याच्या समहतीशिवाय अन्याय करणाऱ्याला शक्ती प्राप्त होत नसते. जो अन्याय सहन करतो तो जर धैर्याने उभा राहिला आणि त्याने असहकार पुकारला तर अन्याय करणारी व्यवस्था हतबल होते हे, गांधींनी स्वतःच्या प्रयोगांनी व उदाहरणांनी सिद्ध करून दाखवले.
ते भारतात आले तेव्हा ते अहिंसा, सत्य व सत्याग्रह ही तत्त्वे सोबत घेऊनच आले होते. पंडित नेहरूंनी म्हणून ठेवले आहे की, महात्मा गांधींनी भारतातील लाखो, करोडो गरीब आणि पिचलेल्या माणसांना जो मार्ग दाखवला, जे धैर्य दिले त्यातून चळवळ उभी राहिली. गांधीचे वैशिष्ट्य असेही होते की त्यांनी आपल्या झालेल्या चुका लगेच मान्य करण्याचा मोठेपणा सातत्याने दाखवला. जेव्हा असहकार आंदोलन भरकटू लागले, त्यात हिंसाचार शिरला तेव्हा त्यांनी आपल्या हिमलयाएवढ्या चुकांची कबुली दिली. ‘हिमालयीन ब्लंडर’ हा शब्द वापरण्याचेही धैर्य त्याच्याकडेच होते. ते धार्मिक होते. पण त्यांचा धर्म हा बदलत्या नव्या संकल्पनांचा स्वीकार करणाराही होता. जगातील कोणताच धर्म हा सर्वश्रेष्ठ नाही. प्रत्येक धर्माचा आदर केला पाहिजे व त्यातील चांगल्या गोष्टी, चांगली तत्त्वे स्वीकारून आपला धर्म सुधारला पाहिजे अशी त्यांची धारणा होती. धर्माच्या बंदिस्त घरात आपण सुरक्षित राहू शकतो. पण त्या घराच्या खिडक्या नव्या विचारांसाठी सतत खुल्या ठेवल्या पाहिजेत हे त्यांचे सांगणे व शिकवण होती. अहिंसा तत्त्व ते मानत होते. पण त्यांची अहिंसा ही नॉन व्हॉयलन्स या इंग्रजी भाषांतरात न सामावणारी आहे हे त्यांनी स्वतःच नमूद केले आहे.
त्यांच्या मते सर्वांप्रती प्रेम व सद्भावना ही अहिंसेची नेमकी व्याख्या ठरू शकेल. एखादे मुके जनावर घायाळ आहे. त्याची सोबत पुढच्या काही तासांत संपणार आहे. त्यावेळी त्याला वेदनेपासून मुक्ती देणे, त्याचा शांत मृत्यू घडवणारे एखादे इंजेक्शन देणे हीदेखील हिंसा नाही तर तो प्रेमाचा सद्भावनेचा आविष्कार आहे असे ते म्हणत. भारताला जगाच्या नकाशावर राजकीय स्थान देणारा पहिलाच नेता म्हणावा लागेल. त्यांच्या राजकीय चळवळीची सुरूवात देशाबाहेर झाली व मग त्यांनी भारतात ठसा उमटवला असाही हाच पहिला नेता होय. असंख्य लोकांवर एकाच वेळी असीम हुकूमत गाजवणारा असा लोक नेता म्हणजेही म. गांधीच होय. लाखो लोकांच्या आयुष्याला स्पर्श करणारे बदल घडवण्याचे सामर्थ्य असणाराही हाच पहिला भारतीय नेता होता यातही शंका नाही.
गांधीचे आता शंभर वर्षांनंतर जाणवणारे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते पहिले असे भारतीय नेते आहेत की ज्यांचा स्वीकार जगाने केला आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन जगाच्या चारही कोपऱ्यात समाज सुधारणेच्या, स्वातंत्र्याच्या चळवळी जन्मल्या, वाढल्या, फोफावल्याही. त्यांचा विचार घेऊनच आजही जगातील अेनक देशात चळवळी होत आहेत. याठिकाणी हिंदी दिग्दर्शक राजकुमार हिरानींनी आपल्याला आजच्या युगातील गांधींचे महत्त्व दाखवून दिले, असे नमूद करणे गैरलागू ठरू नये. मुन्नाभाई सिनेमामधून नव्या आधुनिक युगातील गांधींचा आविष्कार दाखवण्यात ते यशस्वी झाले, असेही म्हणता येईल. गांधींच्या विचारांवर विचार करा. तुमचे आयुष्य बदलून जाईल, असा एक संदेश ते देतात. या महात्म्याने मार्टिन ल्यूथर किंगपासून ते आंग स्यूपर्यंत अनेकांच्या डोक्यात केमिकल लोचा करून दाखवला आहे. आणि पुढेही गांधींचा विचार दीपस्तंभाप्रमाणे जगाला मार्ग दाखवणारा ठरणारच आहे.”
अनिकेत जोशी..
“संपादक, बित्तंबातमी
aniketsjoshi@hotmail.com
”
“संपादक, बित्तंबातमी”
aniketsjoshi@hotmail.com
“एखाद्या नेत्याच्या मृत्यूच्या सात दशकानंतर आणि त्याच्या जन्मापासून दीडशे वर्षांनंतरही त्याच्या देशातल्या नागरिकांनाच नव्हे तर जगातील नागरिकांनाही त्याच्या विचारांच्या प्रकाशात वाटचाल करता यावी, हेच त्या नेत्याचे मोठेपण आहे. असे मोठेपण मिरवणाऱ्या महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंती निमित्ताने आज आपण त्यांचे स्मरण करत आहोत. देश त्यांना वंदन करत आहे. २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातेतील पोरबंदरला जन्मलेला हा महात्मा वयाच्या ७९व्या वर्षी ३० जानेवारी १९४८ रोजी एका माथेफिरूच्या गोळीला बळी पडला. ज्या स्वातंत्र्यासाठी गांधींनी आयुष्यभर संघर्ष केला आणि ज्यांच्या चळवळीमुळेच स्वातंत्र्य पुष्कळ जवळ आले त्या गांधींनी १५ ऑगस्ट १९४७ च्या स्वातंत्र्यदिनाच्या अधिकृत कोणत्याच कार्यक्रमात सहभाग घेतला नाही. त्यांनी झेंडा फडकवण्यासही नकार दिला. इतकेच नाही तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी जनतेला संदेश द्या ही नेहरूंची विनंती त्यांनी धुडकावून लावली. का, तर स्वतंत्र झाल्यापासूनच किंवा खरेतर त्याच्या थोडे आधीपासूनच भारतात प्रचंड जातीय दंगे उसळले होते. हिंसाचाराचा आगडोंब उसळला होता आणि ती घटना गांधींना प्रचंड अस्वस्थ करून टाकत होती.”
“त्यांनी आयुष्याची अखेरीची दोन वर्षे तो आगडोंब शांत करण्यासाठी आणि त्यातील जखमांवर मलमपट्टी करण्यासाठी खर्च केली. त्यांनी सरकारने देऊ केलेली सुरक्षा व्यवस्थाही नाकारली आणि एकटेच नौखालीच्या गाव-गल्ल्यांतून दोन्ही समाजांना शांततेचे आवाहन करत फिरले. आयुष्यभर अहिंसेचा आग्रह धरणारा हा नेता हिंसाचाराचाच बळी ठरावा, हे या देशाचे दुर्दैव होते. अनेकांनी याविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. जर नथुराम गोडसेने आततायीपणा केला नसता, तर गांधींची अखेर कशी झाली असती, गांधींच्या विरोधकांच्या मते काँग्रेस पक्ष व काँग्रेस सरकारच्या उपेक्षेनेच गांधींची अखेर ओढवली असती. कारण त्यांची टोकाची मते व हट्टाग्रह नेहरूंच्या सरकारला व्यवहार्य वाटत नव्हते. गांधींच्या मतांच्या व विचारांच्या विरोधात सरकारची वाटचाल होत होती. गांधी हे सरकारला पेलवणारे नव्हते. महात्मा ही मान्यता सर्व समाजाने त्यांना दिली. पण त्या आधीची मोहनदास करमचंद गांधींची सारी वाटचाल ही अतिशय कष्टप्रद आहे.”
“संघर्ष तर त्यांच्या पाचवीलाच पुजलेला होता. त्यांनी स्वतःच्या लिखाणातूनही त्या संघर्षाच्या अनेक प्रसंगांची साद्यंत वर्णने दिलेली आहेत. महात्मा गांधी बॅरिस्टर बनून दक्षिण आफ्रिकेत पोहोचले हे इतिहासातील वळण जगाचा इतिहास बदलणारेच ठरले. जणू तो नियतीचा गांधींबरोबरचा करारच असावा! कारण तिथेच त्यांच्यातील एक निराळे करारी नेतृत्त्व घडले. पहिल्या वर्गाच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या या तरूण भारतीय वकिलाला टीसीने डब्यातून धक्के मारून उतरवले. त्यांना शिवीगाळ व मारहाण होण्याचे अनेक प्रसंग दक्षिण आफ्रिकेत घडले. तिथे अध्यक्ष क्रुगर यांच्या घरासमोरून चालत जाण्याचे धारिष्ट्य दाखवल्याबद्दल गांधीना पकडून मारहाण तर झालीच पण तुरूंगात टाकले गेले. तुरूंगात भयानक गुन्हेगारांसोबत त्यांना लहान जागेत राहवे लागले. त्यांच्या क्रूर वर्तनाचे ते बळीही ठरले. अनन्वित अत्याचार सहन केल्यानंतर, भोगल्यानंतर त्यांना त्यातून एक निराळा अर्थ सापडला आणि तोच जगाचे भवितव्य बदलणाराही ठरला. त्यांनी विचार केला की, अन्याय, अत्याचार करणारा जितका दोषी आहे, तितकाच ते सहन करणाराही दोषी आहे. अन्याय ज्याच्यावर होतो त्याच्या सहकार्याशिवाय, त्याच्या समहतीशिवाय अन्याय करणाऱ्याला शक्ती प्राप्त होत नसते. जो अन्याय सहन करतो तो जर धैर्याने उभा राहिला आणि त्याने असहकार पुकारला तर अन्याय करणारी व्यवस्था हतबल होते हे, गांधींनी स्वतःच्या प्रयोगांनी व उदाहरणांनी सिद्ध करून दाखवले.”
“ते भारतात आले तेव्हा ते अहिंसा, सत्य व सत्याग्रह ही तत्त्वे सोबत घेऊनच आले होते. पंडित नेहरूंनी म्हणून ठेवले आहे की, महात्मा गांधींनी भारतातील लाखो, करोडो गरीब आणि पिचलेल्या माणसांना जो मार्ग दाखवला, जे धैर्य दिले त्यातून चळवळ उभी राहिली. गांधीचे वैशिष्ट्य असेही होते की त्यांनी आपल्या झालेल्या चुका लगेच मान्य करण्याचा मोठेपणा सातत्याने दाखवला. जेव्हा असहकार आंदोलन भरकटू लागले, त्यात हिंसाचार शिरला तेव्हा त्यांनी आपल्या हिमलयाएवढ्या चुकांची कबुली दिली. ‘हिमालयीन ब्लंडर’ हा शब्द वापरण्याचेही धैर्य त्याच्याकडेच होते. ते धार्मिक होते. पण त्यांचा धर्म हा बदलत्या नव्या संकल्पनांचा स्वीकार करणाराही होता. जगातील कोणताच धर्म हा सर्वश्रेष्ठ नाही. प्रत्येक धर्माचा आदर केला पाहिजे व त्यातील चांगल्या गोष्टी, चांगली तत्त्वे स्वीकारून आपला धर्म सुधारला पाहिजे अशी त्यांची धारणा होती. धर्माच्या बंदिस्त घरात आपण सुरक्षित राहू शकतो. पण त्या घराच्या खिडक्या नव्या विचारांसाठी सतत खुल्या ठेवल्या पाहिजेत हे त्यांचे सांगणे व शिकवण होती. अहिंसा तत्त्व ते मानत होते. पण त्यांची अहिंसा ही नॉन व्हॉयलन्स या इंग्रजी भाषांतरात न सामावणारी आहे हे त्यांनी स्वतःच नमूद केले आहे.”
“त्यांच्या मते सर्वांप्रती प्रेम व सद्भावना ही अहिंसेची नेमकी व्याख्या ठरू शकेल. एखादे मुके जनावर घायाळ आहे. त्याची सोबत पुढच्या काही तासांत संपणार आहे. त्यावेळी त्याला वेदनेपासून मुक्ती देणे, त्याचा शांत मृत्यू घडवणारे एखादे इंजेक्शन देणे हीदेखील हिंसा नाही तर तो प्रेमाचा सद्भावनेचा आविष्कार आहे असे ते म्हणत. भारताला जगाच्या नकाशावर राजकीय स्थान देणारा पहिलाच नेता म्हणावा लागेल. त्यांच्या राजकीय चळवळीची सुरूवात देशाबाहेर झाली व मग त्यांनी भारतात ठसा उमटवला असाही हाच पहिला नेता होय. असंख्य लोकांवर एकाच वेळी असीम हुकूमत गाजवणारा असा लोक नेता म्हणजेही म. गांधीच होय. लाखो लोकांच्या आयुष्याला स्पर्श करणारे बदल घडवण्याचे सामर्थ्य असणाराही हाच पहिला भारतीय नेता होता यातही शंका नाही.”
“गांधीचे आता शंभर वर्षांनंतर जाणवणारे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते पहिले असे भारतीय नेते आहेत की ज्यांचा स्वीकार जगाने केला आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन जगाच्या चारही कोपऱ्यात समाज सुधारणेच्या, स्वातंत्र्याच्या चळवळी जन्मल्या, वाढल्या, फोफावल्याही. त्यांचा विचार घेऊनच आजही जगातील अेनक देशात चळवळी होत आहेत. याठिकाणी हिंदी दिग्दर्शक राजकुमार हिरानींनी आपल्याला आजच्या युगातील गांधींचे महत्त्व दाखवून दिले, असे नमूद करणे गैरलागू ठरू नये. मुन्नाभाई सिनेमामधून नव्या आधुनिक युगातील गांधींचा आविष्कार दाखवण्यात ते यशस्वी झाले, असेही म्हणता येईल. गांधींच्या विचारांवर विचार करा. तुमचे आयुष्य बदलून जाईल, असा एक संदेश ते देतात. या महात्म्याने मार्टिन ल्यूथर किंगपासून ते आंग स्यूपर्यंत अनेकांच्या डोक्यात केमिकल लोचा करून दाखवला आहे. आणि पुढेही गांधींचा विचार दीपस्तंभाप्रमाणे जगाला मार्ग दाखवणारा ठरणारच आहे.”
महात्मा गांधीस्वातंत्र्यदिनअहिंसेचा आग्रहमोहनदास करमचंद गांधीकाँग्रेस पक्षनथुराम गोडसेपंडित नेहरूहिमालयीन ब्लंडर