HomeArchiveमराठी अभ्यास केंद्राचे...

मराठी अभ्यास केंद्राचे भाषा पुरस्कार जाहीर!

Details
मराठी अभ्यास केंद्राचे भाषा पुरस्कार जाहीर!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
मराठी अभ्यास केंद्र ही विविध कृतिगटांच्या माध्यमातून मराठी भाषा संवर्धनाचे कार्य करणारी स्वयंसेवी संस्था आहे. ह्या संस्थेने मराठी भाषेसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना प्रोत्साहन म्हणून न्यायालयीन मराठीच्या चळवळीचे अध्वर्यू अधिवक्ता शांताराम दातार आणि अभ्यास केंद्राचे हितचिंतक व भाषाभ्यासक जयवंत चुनेकर यांच्या स्मरणार्थ प्रतिवर्षी दोन पुरस्कार देण्याचे ठरविले होते. यंदाचे वर्ष पुरस्कारांचे पहिलेच वर्ष असून या दोन्ही पुरस्कारांची घोषणा केंद्राने केली आहे.

अधिवक्ता शांताराम दातार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘मराठी भाषा आग्रही पुरस्कार’ सीमाभागातील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ, या संस्थेला जाहीर झाला असून जयवंत चुनेकर ‘प्रयोगशील मराठी शिक्षक पुरस्कारा’साठी नांदेडचे शिवाजी आंबुलगेकर यांची निवड झाली आहे.

विविध व्यवहारक्षेत्रांत मराठीचा जास्तीतजास्त वापर व्हावा यासाठी मराठी अभ्यास केंद्र विविध कृतिगटांच्या मार्फत काम करते. गेल्या काही वर्षांपासून मराठी शाळांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र विविध व्यक्ती आणि संस्था यांच्या सहकार्याने विशेष कार्यरत आहे. कारण मराठी शाळा टिकल्या तरच मराठी भाषा आणि संस्कृती टिकेल अशी केंद्राची धारणा आहे. मात्र हे कार्य एक संस्था एकाकीपणे तडीस नेऊ शकणार नाही. म्हणून मराठीच्या संवर्धनाचे कार्य जिथे कुठे चालू आहे त्याची नोंद घेऊन ते समाजापुढे आणावे असा केंद्राचा प्रयत्न आहे. मराठी भाषेच्या पडझडीच्या काळात मराठीसाठी अभ्यासाच्या व चळवळीच्या अंगाने आयुष्य झिजवणा-या व्यक्तींबद्दल केंद्राला नेहमीच आदर आणि अभिमान वाटतो.

अधिवक्ता शांताराम दातार आणि जयवंत चुनेकर ही अशीच दोन नावे. न्यायालयांमध्ये लोकभाषा व राजभाषा असलेल्या मराठीचा प्रभावी वापर व्हावा म्हणून शांताराम दातार यांनी अथक परिश्रम घेतले. मराठी भाषा संरक्षण व विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष या नात्याने त्यांनी केलेले कार्य सर्वपरिचित आहे. समाज व शासन स्तरावर मराठी भाषेच्या वापराबाबत ते नेहमीच आग्रही राहिले. मराठी अभ्यास केंद्राचे दुसरे एक सुहृद जयवंत चुनेकर हेही मराठीच्या ध्यासाने शैक्षणिक क्षेत्रात आयुष्यभर काम करीत राहिले. कोशनिर्मिती, अमराठी भाषिकांसाठी मराठीचे अध्यापन या क्षेत्रांतील चुनेकर यांचे योगदान मोलाचे आहे. आज ह्या दोन्ही व्यक्ती हयात नसल्या तरी त्यांनी मराठी भाषेसाठी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. त्यांची स्मृती जपण्यासाठी तसेच मराठीसाठी कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून मराठी अभ्यास केंद्राने या पुरस्कारांचे गठन केले आहे.

यंदाच्या मराठी भाषा आग्रही पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या बेळगावी येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ ही संस्था अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गेली अनेक वर्षे सीमा भागात मराठी भाषेच्या जतनाचे कार्य करीत आहे. प्रयोगशील मराठी शिक्षक या पुरस्काराचे मानकरी ठरलेले नांदेड जिल्ह्यातील कमळेवाडीच्या ‘विद्या निकेतन पब्लिक स्कूल’ या शाळेतील शिक्षक शिवाजी आंबुलगेकर हे महाराष्ट्रातल्या विमुक्त जाती आणि भटक्या जमातींच्या मुला-मुलींसाठी भाषाशिक्षणात नवनवीन प्रयोग करून मराठीच्या प्रसाराचे कार्य करीत आहेत. मानपत्र व रोख रक्कम असे या पुरस्कारांचे स्वरूप असून मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून येत्या २७ फेब्रुवारीला ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात येतील, असे मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी जाहीर केले आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content