HomeArchiveमंगळस्वारी: एक मैलाचा...

मंगळस्वारी: एक मैलाचा टप्पा (भाग-1)

Details
मंगळस्वारी: एक मैलाचा टप्पा (भाग-1)

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

प्रसाद केरकर, मुख्य संपादक, दै. कृषिवल

[email protected]

अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाचे इनसाइट (इंटरिअर एक्सप्लोरेशन यूजिंग सिस्मिक इन्व्हेस्टिगेशन) हे यान मंगळ ग्रहावर नुकतेच उतरले. सोमवार आणि मंगळवारच्या दरम्यान भारतीय प्रमाण वेळेनुसाररात्री 1 वाजून 24 मिनिटांनी इनसाइट यान मंगळ ग्रहावर सुखरूपणे उतरले. आपल्याकडे ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ ग्रह हा नकारात्मक समजला जातो. परंतु मनुष्याने याच ग्रहावर आता स्वारी करून या मंगळाचा अभ्यास करण्यास सुरूवात केली आहे. मंगळ ग्रहावरील रहस्य जाणून घेण्यासाठी हे यान नासाकडून बनवण्यात आले आहे.  ग्रहाच्या पृष्ठभागावर यान उतरताना 19800 कि.मी. प्रति तास वेगाने जाणारे हे यान सहा मिनिटांत शून्य वेगावर आले. त्यानंतर यान पॅराशूटमधून बाहेर आले आणि मंगळभूमीवर उतरले. त्यापाठोपाठ इनसाइटने मंगळ ग्रहावरून आपले पहिले छायाचित्रही पाठवले. सहा महिन्यांच्या प्रवासानंतर इनसाइट मंगळावर उतरले. नासाच्या या प्रकल्पासाठी एक अब्ज डॉलर म्हणजेच 70 अब्ज रुपये खर्च आला आहे. सौरऊर्जा आणि बॅटरीने ऊर्जा मिळवणार्‍या लँडरला 26 महिन्यांपर्यंत संचलित केले जाऊ शकते. नासाला यापेक्षा अधिक कालावधी ते सुरू राहू शकेल, अशी अपेक्षा आहे.

इनसाइटयान पृष्ठभागावर 10 ते 16 फूटखोल खड्डा करेल. यापूर्वीच्या मंगळ अभियानांच्या तुलनेत हे 15 टक्के अधिक खोल असेल. 2030 पर्यंत मनुष्याला मंगळावर पाठवण्याच्या प्रयत्नासाठी नासाला मंगळ ग्रहाचे तापमान समजणे महत्त्वाचे आहे. यावर्षी 5 मे रोजी नासाने कॅलिफोर्नियाच्या वंडनबर्ग एअरफोर्स स्टेशनवरूनएटलस व्ही रॉकेटद्वारे या यानाचे प्रक्षेपण केले होते. यापूर्वी 2012 मध्ये मंगळावर क्युरोसिटी हे यान पाठवण्यात आले होते. तेव्हा मंगळावर पाणी असल्याचा शोध लागला होता. इनसाइट यान हे मंगळावरील मानव मिशनपूर्वी त्याच्या पृष्ठभागावर उतरणे आणि येणार्‍या भूकंपाचे मापन करण्यासाठी डिझाइन  करण्यात आले आहे. यानातील सिस्मोमीटरच्या मदतीने मंगळावरील अंतर्गत परिस्थितीचा अभ्यास केला जाईल. मंगळावर भविष्यात मनुष्य पाठविण्यासाठीचे हे पहिले पाऊल मानले जाते. 4 ऑक्टोबर 1957 रोजी सोव्हिएत युनियनने स्पुटनिकहा  पहिला-वहिला मानवनिर्मीत उपग्रह अवकाशात सोडून एका नव्या क्रांतीला सुरूवात केली होती.  त्या घटनेला तब्बल 60 वर्षे लोटली आहेत. या 60 वर्षांच्या काळात जग पूर्णपणे बदलले आहे. ज्या सोव्हिएत युनियनने हा उपग्रह अवकाशात सोडून जागतिक पातळीवर विक्रम केला तो सोव्हिएत युनियन हा देशच जगाच्या नकाशातून आता फुस लागेला. त्यामुळे आता गेल्या 60 वर्षांत जगात केवळ तांत्रिक बदल झाले नाहीत तर जगाचा इतिहास-भूगोलही बदलला आहे. जगातील तंत्रज्ञानाने एक मोठी भरारी घेतली आहे. आज दळणवळाची माध्यमे सहजरित्या उपलब्ध झाली आहेत. ज्याकाळी रेडिओ देखील चमत्कार वाटे. त्याकाळी मानवाने कृत्रिम उपग्रह अवकाशात पाठवून त्यातून लहरी स्वीकारण्यास सुरूवात करणे हे एका जबरदस्त क्रांतीचे एक महत्त्वाचे पाऊल होते. स्पुटनिकचे अवकाशात जाणे व त्याने पृथ्वीभोवती फेर्‍या मारणे ही त्याकाळी शास्त्रज्ञांनी साध्य केलेली मोठी बाब होती. आज संगणक, मोबाईल, इंटरनेटमुळे जग अतिशय जवळ आले हे वास्तव खरे असले तरीही स्पुटनिकची भरारी हा एक संशोधनातील महत्त्वाचा पल्ला होता.

क्रमशः”
 
“प्रसाद केरकर, मुख्य संपादक, दै. कृषिवल

Continue reading

मुंबईच्या शहरी भागात आज पाणीपुरवठा विस्कळीत

मुंबई महापालिकेतर्फे शिवडी येथील टनल भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवर १५०० मिलीमीटर व्यासाचे दोन बटरफ्लाय व्हॉल्व बसविण्याचे काम हाती घेतले जात आहे. हे काम भंडारवाडा टेकडी जलाशय, फॉसबेरी टेकडी जलाशय आणि गोलंजी टेकडी जलाशय यांचा पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्यासाठी केले जाणार...

इराणकडून बाब-अल-मंदबची केली जाणार कोंडी?

अमेरिकेबरोबर कोणत्याही स्वरूपाची चर्चा करण्याची पाकिस्तानमार्फत करण्यात आलेली विनंती धुडकावून लावल्यानंतरही सध्याच्या युद्धविरामाला इराणबरोबरच्या पुढच्या चर्चेपर्यंत अनिश्चित काळासाठी वाढवण्यात येत असल्याची घोषणा आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ तसेच लष्करप्रमुख आसीफ मुनीर यांच्या आवाहनाला...

इराणने धुडकावली अमेरिकेबरोबरची चर्चा!

अमेरिका आणि इराणमध्ये झालेला दोन आठवड्यांचा युद्धविराम उद्या संपत असतानाच अमेरिकेबरोबर पाकिस्तानात होऊ घातलेल्या चर्चेला इराणने नकार दिला आहे. आम्ही सरशीत असताना आमच्या अटीशर्तींवरच अमेरिकेबरोबर चर्चा होईल, असे इराणच्या लष्करी गोटातून स्पष्ट करण्यात आले आहे. इराणच्या होर्मूझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण...
Skip to content