HomeArchiveमंगळस्वारी: एक मैलाचा...

मंगळस्वारी: एक मैलाचा टप्पा (भाग-3)

Details
मंगळस्वारी: एक मैलाचा टप्पा (भाग-3)

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

प्रसाद केरकर, मुख्य संपादक, दै. कृषिवल

[email protected]

स्वातंत्र्यानंतर भारताने देखील इस्त्रो ही अंतराळ संशोधन संस्था स्थापन करून या क्षेत्रात उडी घेतली. पंडित नेहरूंची दूरदृष्टी त्याला कारणीभूत होती. ज्येष्ठ संशोधक विक्रम साराभाई व डॉ. होमी भाभा यांच्या नेतृत्त्वाखाली यासंशोधनाला सुरूवात झाली. तामीळनाडूतील थुंबा हे ठिकाण त्यासाठी निवडले गेले. आपण देशात बनविलेला आर्यभट्ट हा उपग्रह रशियातून सोडण्यात आला. त्यावेळी आपल्याकडे उपग्रह सोडण्याचे तंत्रज्ञान विकसीत झाले नव्हते. त्यामुळे तो रशियातून सोडण्यात आला. त्यानंतर भारतीय अवकाश शास्त्रज्ञांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. आपण सोव्हिएत युनियनच्या सहकार्याने 80 च्या दशकात भारतीय अवकाशविराला अंतराळात पाठविले होते. मात्र आता इस्त्रो स्वत:च्या बळावर अवकाशात माणूस नेऊ शकतो. भविष्यात ते सहज शक्य आहे.

चांद्रयान, मंगळयान अशा प्रकारच्या आपल्या स्वाऱ्या आजवर यशस्वी झाल्या आहेत. त्याचबरोबर आपण उपग्रह सोडण्याच्या संदर्भातील अनेक विक्रम केले आहेत. अगदी शंभराहून जास्त उपग्रह एकाचवेळी सोडण्याचा आपण जागतिक विक्रमही केला आहे. यातून आपली ही संस्था स्वबळावर उभी राहाणार आहे. कारण उपग्रहांचे प्रक्षेपण हा एक मोठा व्यवसाय आहे. अनेक देशांकडे ते तंत्रज्ञान उपलब्ध नाही. सर्वच देशांना त्यांच्या दळणवणासाठी उपग्रह हा लागतोच. ती सेवा आता इस्त्रो अनेक देशांना पुरवित आहे. गेल्या 60 वर्षांत स्पुटनिकच्या प्रक्षेपणानंतर जगात अनेक तांत्रिक बदल झाले. उपग्रहांमुळे दळणवळण सुलभ झाले. शेतकर्‍यांना हवामानाचा अंदाज आगाऊ देता येऊ लागला. शत्रू पक्षावर नजर ठेवून त्यांच्या हालचाली टिपता येऊ लागल्या. मानवाच्या विकासात हा मोलाचा टप्पा आहे. त्यामुळेच 60 वर्षांपूर्वी स्पुटनिकचे अवकाशातील प्रक्षेपण ही संशोधनातील क्रांतिकारी घटना आहे. त्यानंतर आता मंगळावरची स्वारी हाएक मैलाचा दगड ठरला आहे.

आता पुढील टप्पा म्हणजे, सूर्याच्या वातावरणाचा जवळून अभ्यास करण्यासाठी पार्कर सोलर प्रोब हे अंतराळ यान पुढील वर्षी 31 जुलै नासा अंतराळात सोडणार आहे. अशाप्रकारे थेट सूर्याच्या जवळ जाणारे हे पहिलेच यान असेल. ही मोहीम एकूण सात वर्षांची असून, ती 2025 मध्ये संपेल.हे यान सूर्याच्या पृष्ठभागापासून 40 लाख मैल एवढे जवळ जाईल. 2,550 फॅरेनहीट एवढ्या प्रचंड उष्णतेमध्ये हे यान ताशी 4.30 लाख किमी वेगाने सूर्याच्या 24 प्रदक्षिणा करत आपल्या सूर्यमालेतील या ताऱ्यांच्या वातावरणाचा अभ्यास करेल. मानवाची आपल्या ग्रहमालिकेचा शोध घेण्याची इच्छा अतिशय तीव्र आहे. आता तर या मालिकेचा पीतग्रहावर त्याचे चाल केली आहे. माणसाचा हा प्रयत्न म्हणजे नवनवीन शोधांचा ध्यास घेऊन काम करण्याचा प्रकार आहे.यात त्यांच्या संशोधनाला यश लाभो हीच सदिच्छा!”
 
“प्रसाद केरकर, मुख्य संपादक, दै. कृषिवल

Continue reading

दिवाळीत प्रियजनांना भेट द्या वर्षभराच्या ‘फ्री’ फास्टॅगची!

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत...

फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी सीबीआयचे ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’!

आंतरराष्ट्रीय पातळीवर फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी तसेच जगभरातील पोलीस दलांसोबत रिअल-टाइममध्ये समन्वय साधण्याकरीता सीबीआयने नुकतेच ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’ स्थापन केले आहे. फरारी गुन्हेगारांचा मुद्दा केवळ देशाचे सार्वभौमत्व, आर्थिक स्थैर्य आणि कायदा आणि सुव्यवस्थेशीच नव्हे तर देशाच्या सुरक्षेशीदेखील संबंधित आहे. परदेशात...

धनत्रयोदशीच्या दिवशी ‘अशुभ’ दक्षिणेलाच का लावतात दिवा?

आपल्या भारतीय संस्कृतीत दिवाळीची सुरुवात दिवे प्रज्वलित करूनच केली जाते. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-परदेशात जिथे-जिथे दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो, तिथे-तिथे दीप पेटवूनच त्याची सुरुवात केली जाते. एरव्ही दक्षिण दिशेला दिवा पेटवणे अशुभ मानले जाते, परंतु धनत्रयोदशीला तो...
Skip to content