Friday, October 18, 2024
HomeArchiveभारतीय लष्कर प्रशिक्षित...

भारतीय लष्कर प्रशिक्षित कुत्र्यांना मारते ठार!

Details
भारतीय लष्कर प्रशिक्षित कुत्र्यांना मारते ठार!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
कुत्रा म्हंटलं की सर्वात आधी आठवते ती त्याची इमानदारी! हा गुण सामान्यांसाठी महत्त्वाचा असला तरी लष्कर, पोलीस आदी विभागात त्याची मदत घेतली जाते ती त्याच्या हुंगेगिरीसाठी! आश्चर्य वाटतंय ना.. हो, पण तस्संच आहे. त्याची श्वसनक्षमता, हुंगण्याची म्हणजे वास घेण्याची क्षमता अफाट असल्याने संशयित अतिरेकी, स्फोटकं किंवा चोर-खुन्याचा माग काढण्यासाठी याचा वापर होतो. पोलीस खात्यातील नि लष्करातील कुत्र्याचं प्रशिक्षण यात बरीच तफावत असते. यासाठी वापरल्या जाणाऱ्या जातीही वेगवेगळ्या असतात. दिसायला सर्वसारखे असले तरी गुण निरनिराळे असतात.

लष्करातील कुत्रे वफादारीने काम करीत असले तरी त्यांची क्षमता संपल्यावर त्यांच्या नशिबी ‘गोळ्या’ येतात, ज्या काहीवेळा त्यांनीच शोधल्या असतात. विशेष प्रकारचं ट्रेनिंग मिळाल्यानं त्यांच्या क्षमतेत वाढच झालेली असते. भारतीय सेनेत सध्या लॅब्रेडोर, जर्मन शेफर्ड, बेल्जियम शेफर्ड या प्रजातीचे कुत्रे आहेत. हे सर्व त्यांच्या रँकवरून ओळखले जात नाहीत तर नाव नि क्रमांकावरून ओळखले जातात. सैन्यातील माऊंटन रेजिमेंट, घोडेस्वार दलही चर्चेत आहे. कारण उंचीवरील क्षेत्रात माल वाहून नेण्यासाठी घोडे, खेचर-गाढवं यांचा उपयोग केला जातो. या कुत्र्यांची बुद्धिमत्ता जसशी असेल तसा वापर होतो, ते त्यांच्या वाणावर अवलंबून असतं. बुद्धीनुसार काम हा प्रकार माणसांसाठी फार कमी प्रमाणात असला तरी या प्राण्यांसाठी मात्र, त्याचा कसोशीने वापर होतो. काही ठिकाणी कुत्रे सहज तपासणी करतात जिथे जाऊन माणूस, सैनिकाद्वारे तपासणी करणे कठीण असते.

वास्तविक पाहता कुत्र्यांना मारण्याची पद्धत आपण ब्रिटिश सैन्याकडूनच घेतली आहे. देशाची सुरक्षितता विचारात घेता असं करणं आवश्यक असते हे सैन्याचं म्हणणं काही अंशी पटतं. सैन्याला भीती असते की हे कुत्रं कोणा उपद्रवी माणसाच्या हाती लागू नयेत. कारण या कुत्र्यांना सैन्याच्या विविध सुरक्षित नि गुप्त जागांची व्यवस्थित माहिती असते.

एनिमल युथेनेशिया

गंभीररीत्या जखमी झालेल्या किंवा गंभीर आजार झालेल्या या प्राण्याला मारूनच मुक्ती दिली जाते. साधारण आजारात सैन्याकडून त्यावर पूर्ण उपचार केले जातात. पण, तो-ती पूर्णतः बरी होणार नसेल अथवा पूर्वीसारखं काम करण्याची क्षमता नसेल, शक्यता नसेल तर गोळी घातली जाते. सेनेच्या वापरात असलेल्या हजारो घोडे-खेचरांनाही हीच वागणूक मिळते. तेही निरूपयोगी ठरले की त्यांच्या नशिबी गोळी ठरलेलीच! या सर्व प्रकाराला ‘एनिमल युथेनेशिया’ असे म्हटले जाते. तथापि उपलब्ध महितीनुसार ज्या कोणी पुरस्कार-सन्मान मिळवले असतील त्यांना या प्रक्रियेतून वगळले जाते. साधारणतः कुत्र्याचं जीवनमान पंधरा वर्षे इतके असते तर सैन्यातील कुत्रे याच्या अर्धे आयुष्य जगतात.

या कुत्र्यांना दत्तक न देण्यामागे सैन्य दलाचा एक तर्क असा की, दहशतवादी कारवायांविरोधात वापरल्या जाणाऱ्या कुत्र्यांना घरात लहान मुलांसोबत ठेवणं योग्य राहणार नाही. सुरक्षेच्या कारणाबरोबर या कुत्र्यांना ज्या विशेष सोयी सुविधा सेवेत असताना दिल्या जातात त्या इतरत्र कुठेही मिळणार नाहीत हे लक्षात घेऊन त्यांना मारणेच योग्य ठरते. वास्तविक पाहता सैन्य दलात वापरल्या जाणाऱ्या कुत्र्यांना मारलं जाणार नाही असं धोरण बनवत असल्याचं २०१५ मध्ये सांगितलं होतं. यासाठी काही वेगळा पर्याय स्वीकारला जाईल, यात त्यांना दत्तक घेणं हाही एक असेल. अनेक देशांमधून असे कुत्रे दत्तक घेण्याचा कायदा आहे. काही वर्षांपूर्वी हा मामला दिल्ली उच्च न्यायालयात गेला होता. त्यावेळी न्यायालयाने कडक शब्दात ताशेरे ओढले होते. सैन्यातील पशूंना मारून टाकण्याचं धोरण प्राणीक्रूरता विरोधी कायदा १९६० च्या तरतुदींचा भंग असल्याचं मत न्यायालयाने नोंदवलं होतं. हे लक्षात घेऊन पुढे २०१७ साली मेरठ येथे कुत्र्यांसाठीं एक ओल्ड एज होम, वॉर डॉग ट्रेनिंग स्कूलची स्थापना करण्यात आली. या कुत्र्याना केवळ अशाच वेळी मारलं जाईल, ज्यावेळी वैद्यकीयदृष्ट्या मरण हाच अंतिम इलाज असेल असं एका लष्करी अधिकाऱ्याने यावेळी स्पष्ट केले. भारतात यापूर्वी कर्नाटक नि प. बंगाल राज्यात या कुत्र्यांना दत्तक घेण्याची सुविधा होती.

इतर देशात आहे कायदा

जगातील काही देशांत निवृत्त लष्करी कुत्र्यांना पाळण्याविषयी कायदे आहेत. अमेरिकेत अशा कुत्र्यांना लोक दत्तक घेतात. ज्यांना घेतलं जात नाही त्यांच्यासाठी एक खास एनजीओ संस्था असून ती त्यांच्या शेवटच्या दिवसात औषधपाण्यापासून सर्व व्यवस्था करते. चीन-रशियासारख्या क्रूरतेचा कळस गाठणाऱ्या देशातही निवृत्तीनंतर गोळ्या घालण्याचा कायदा नाही. जपानसारख्या प्रगत देशात या इमानी सेवकांची वेगळ्या इस्पितळात सोय आहे. इथे आजारी कुत्र्यांनाही त्यांचे मालक आणून सोडू शकतात. त्यांची माणसांप्रमाणे देखभाल केली जाते.

अलिकडेच म्हणजे गेल्या एप्रिल महिन्यात कुत्र्यांचं रक्तदान शिबीर झालं. बॉम्बे व्हेटर्नरी कॉलेजात ते पार पडलं. ऍनिमिया, टिक फिवरमुळे रक्ताची कमतरता निर्माण होते. यासाठी कुत्र्यांना रक्त द्यावे लागते याची फारशी माहिती पाळणाऱ्यांना नव्हती. गेल्या दोन वर्षांत त्यात २५% नी वाढ झाली. वास्तविक कुत्र्यांचं रक्तदान ही संकल्पनाच अनेकांना नवी आहे. यामुळे या रक्तदानाचं प्रमाण अत्यल्प आहे. माणसांच्या गटाप्रमाणेच यातही गट आहेत. प्राण्यांना त्यांच्या प्रजातीशिवाय इतर कोणाचं रक्त चालत नाही. कुत्र्यांच्या रक्तात हिमोग्लोबिनची पातळी १४-१६ gms/dl इतकी असावी लागते. बाई सकराबाई दिनशॉ पेटिट इस्पितळ फॉर एनिमलचे सचिव लेफ्ट. कर्नल डॉ. जे. सी. खन्ना यांनी ही माहिती दिली. याआधी रक्ताचं आयुष्य सहा महिने इतकंच होतं, आता ते साठवणूक पद्धतीमुळे वर्षभर वापरता येतं. प्लाझ्मा, ब्लड सेल यात त्याची साठवण केल्यानं गरजूंना वापरता येते. रक्तगट तपासणी, ईसीजी, रक्त गोठण वेळ याच्या चाचण्या झाल्यावरच रक्तदान परवानगी मिळत असल्याचं खन्ना यांनी सांगितलं. या शिबिराची घोषणा होताच नोंदणी २०-२२ झाली तर प्रत्यक्षात चाचणीपश्चात सातच कुत्र्यांना रक्तदान करता आलं. एकूणच काय पुढील काळात कुत्रं पाळणं, बाळगणं अधिकच सोपं होईल. कारण वेगळी उपचारपद्धती. आर्मी प्रशिक्षित कुत्रं पाळता आलं तर तेही बघा. विशेषतः सैन्यातील लोकांनी हे पाहवं. त्याचं जीवनमान वाढेल नि तुम्हाला पुण्य लाभेल!”
 
“विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

वरूण सरदेसाईंची संभाव्य उमेदवारी ठाकरे सेनेला पडणार भारी?

फक्त आदित्य ठाकरे यांचा मावसभाऊ, या एकमेव लेबलवर उमेदवारी मिळवणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पूर्वमधली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले सैनिक कमालीचे संतप्त झाले असून वरूणची उमेदवारी लादली गेलीच तर मातोश्रीला चांगलाच धडा शिकवायचा अशी चर्चा त्यांच्यात सुरू झाली...

यंदाची विधानसभा निवडणूक बिनचेहऱ्याची!

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि सर्वच राजकीय पक्षांमध्ये लगीनघाई सुरू झाली. राज्यातल्या सत्तारूढ महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद झाली. मंगळवारी होणारी ही पत्रकार परिषद देशाच्या मुख्य निवडणूक...

उत्तर प्रदेशात एन्काऊंटरचे सत्र सुरूच!

उत्तर प्रदेशमध्ये संशयित आरोपीचा एन्काऊंटर (पोलीस चकमक) करण्याचे सत्र अजूनही चालूच आहे. आज बेहराईचमधल्या रामगोपाल मिश्रा यांच्या हत्त्येतल्या दोघा संशयित आरोपींबरोबर पोलिसांची चकमक झाली. त्यात सर्फराज आणि तालीब, हे दोन आरोपी जखमी झाल्याचे समजते. गेल्या ७ वर्षांत उत्तर प्रदेशात...
Skip to content