Details
भाजपने सुरू केली ‘कार्यकर्ता कर्ताधर्ता’ मोहीम!
16-Sep-2019
“डिजिटल प्लॅटफॉर्मवर मिळाला उदंड प्रतिसाद
केएचएल न्यूज ब्युरो
मुंबईत भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरूण पिढीसोबत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आपल्या पक्षासोबत जोडण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मवर ‘कार्यकर्ता कर्ताधर्ता’ या मोहिमेची सुरूवात केली आहे. या मोहिमेला लवकरात लवकर तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सोशल मीडियातील फेसबुक, इंन्स्टाग्राम, ट्विटर, अँड्रॉईड फोनचा आधार घेतला जात आहे. तरूणांना या मोहिमेशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर देशातील तरूण पिढीचा दृढ विश्वास आहे. या विश्वासाला अधिक मजबूत करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मवर ‘कार्यकर्ता कर्ताधर्ता’ ही मोहिम सुरू करण्यात आल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
‘कार्यकर्ता कर्ताधर्ता’ मोहिमेची सुरूवात करताना भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि कार्यकर्त्यांचा सन्मान हा फक्त भाजपमध्ये मोठ्या प्रमाणत होतो. त्यामुळे भाजपने कार्यकर्त्यांना प्राधान्य देत ही डिजिटल मोहिम सुरू केल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी या मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी दिली. ‘कार्यकर्ता कर्ताधर्ता’ या मोहिमेअंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तरूणांची एक नवीन फौज तयार करण्याचे काम केले जाणार आहे. यामध्ये तरूण आणि पहिल्यांदा मतदान करणाऱ्या बहुसंख्य मतदारांचा समावेश असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्त्वावर देशातील तरूण पिढीचा विश्वास आहे. त्याचबरोबर भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष असून, तो देशातील तरूणांना नवी दिशा देण्याचे सातत्याने काम करत आहे. या तरूण पिढीचा भाजपवर दृढ विश्वास आहे. त्यामुळे ‘कार्यकर्ता कर्ताधर्ता’ या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे, त्यांनी सांगितले. राज्यात या मोहिमेत पहिल्याच दिवशी ८ हजार २७९ जणांनी सहभाग नोंदवला आणि भाजपचे सदस्य झाले. येणाऱ्या तीन दिवसात ही संख्या अडीच लाख होण्याची शक्यता आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर भाजप आणि त्यांच्या नेत्यांची उपस्थिती ही इतर पक्षातील नेत्यांपेक्षा अधिक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नव्या भारताचे स्वप्न साकारण्यामध्ये डिजिटल इंडिया आणि तरूण पिढीचा मोठा सहभाग असणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. ‘कार्यकर्ता कर्ताधर्ता’ या मोहिमेअंतर्गत भाजपचे सर्वाधिक लक्ष कॉलेजमधील तरूणांवर असणार आहे. हे तरूण जे मतदार तर झाले आहेत मात्र अद्यापही कोणत्याही पक्षाचे सदस्य झालेले नाहीत. प्रदेशाध्यक्ष पाटील यांचा प्रयत्न आहे की, या तरूणांचे पहिले मत भाजपला मिळावे आणि पंतप्रधान मोदी यांचे हात अधिक बळकट करण्यात सहभागी व्हावे.”
केएचएल न्यूज ब्युरो
“मुंबईत भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरूण पिढीसोबत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आपल्या पक्षासोबत जोडण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मवर ‘कार्यकर्ता कर्ताधर्ता’ या मोहिमेची सुरूवात केली आहे. या मोहिमेला लवकरात लवकर तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सोशल मीडियातील फेसबुक, इंन्स्टाग्राम, ट्विटर, अँड्रॉईड फोनचा आधार घेतला जात आहे. तरूणांना या मोहिमेशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर देशातील तरूण पिढीचा दृढ विश्वास आहे. या विश्वासाला अधिक मजबूत करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मवर ‘कार्यकर्ता कर्ताधर्ता’ ही मोहिम सुरू करण्यात आल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.”
‘कार्यकर्ता कर्ताधर्ता’ मोहिमेची सुरूवात करताना भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि कार्यकर्त्यांचा सन्मान हा फक्त भाजपमध्ये मोठ्या प्रमाणत होतो. त्यामुळे भाजपने कार्यकर्त्यांना प्राधान्य देत ही डिजिटल मोहिम सुरू केल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी या मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी दिली. ‘कार्यकर्ता कर्ताधर्ता’ या मोहिमेअंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तरूणांची एक नवीन फौज तयार करण्याचे काम केले जाणार आहे. यामध्ये तरूण आणि पहिल्यांदा मतदान करणाऱ्या बहुसंख्य मतदारांचा समावेश असणार आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्त्वावर देशातील तरूण पिढीचा विश्वास आहे. त्याचबरोबर भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष असून, तो देशातील तरूणांना नवी दिशा देण्याचे सातत्याने काम करत आहे. या तरूण पिढीचा भाजपवर दृढ विश्वास आहे. त्यामुळे ‘कार्यकर्ता कर्ताधर्ता’ या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे, त्यांनी सांगितले. राज्यात या मोहिमेत पहिल्याच दिवशी ८ हजार २७९ जणांनी सहभाग नोंदवला आणि भाजपचे सदस्य झाले. येणाऱ्या तीन दिवसात ही संख्या अडीच लाख होण्याची शक्यता आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर भाजप आणि त्यांच्या नेत्यांची उपस्थिती ही इतर पक्षातील नेत्यांपेक्षा अधिक आहे.”
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नव्या भारताचे स्वप्न साकारण्यामध्ये डिजिटल इंडिया आणि तरूण पिढीचा मोठा सहभाग असणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. ‘कार्यकर्ता कर्ताधर्ता’ या मोहिमेअंतर्गत भाजपचे सर्वाधिक लक्ष कॉलेजमधील तरूणांवर असणार आहे. हे तरूण जे मतदार तर झाले आहेत मात्र अद्यापही कोणत्याही पक्षाचे सदस्य झालेले नाहीत. प्रदेशाध्यक्ष पाटील यांचा प्रयत्न आहे की, या तरूणांचे पहिले मत भाजपला मिळावे आणि पंतप्रधान मोदी यांचे हात अधिक बळकट करण्यात सहभागी व्हावे.”

