Details
भगव्याशी गद्दारी करणाऱ्यांना शिवसेनेचे दरवाजे बंद! – उद्धव ठाकरे
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनानंतर जनतेचे दर्शन घेण्यासाठी मी इथे आलो आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर सभा घेत असताना लक्षात आले की, युतीच्या सभेला अथांग जनसागर येतो आहे. शिर्डीत पाण्याचा प्रश्न मोठा आहे. सत्ता आल्यानंतर पाणी देणे हे आपले कर्तव्य राहील. आपला आवाज बंद करणारा अजून जन्माला यायचा आहे. याचं कारण आपल्यामध्ये प्रामाणिकपणा आहे. गद्दार माणसांना लाज नाही, लोकांची दार ठोठावत फिरत आहेत. जो शिवरायांच्या भगव्याशी गद्दारी करतो आणि मतदारांशी गद्दारी करतो त्याला शिवसेनेचे दरवाजे बंद आहेत, असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी शिर्डीच्या एका जाहीर सभेत केले.
विरोधकांचे 56 पक्ष एकत्र आलेले आहेत. दिल्लीच्या तख्तावर फडकणारा शिवरायांचा भगवा पाहून विरोधकांना पोटदुखी झाली आहे. शिवरायांचा भगवा शिवसेनेने हाती घेतला आणि आता याच्यापुढे युवकांनी भगवा खांद्यावर घेतलेला आहे. शिवसेना-भाजपामध्ये मतभेद होते. परंतु आम्ही भगव्याशी गद्दारी केलेली नाही. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे हे नेते असतानादेखील शिवसेनाप्रमुखांसोबतदेखील त्यांचे मतभेद व्हायचे. पण आम्ही भगवा सोडला नाही, असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न आहे. हमीभावाचा प्रश्न आहे. शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव उभी आहे. शरद पवार मुख्यमंत्री असताना मोर्चा गेला होता. शेतकऱ्यांना चिरडले गेले. शिवसेनेच्या प्रयत्नांनी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होत आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये ज्या जाचक अटी होत्या त्या शिवसेनेने काढून टाकल्या आहेत. तळागाळातल्या शेतकऱ्यांना योजना मिळण्यासाठी शिवसेनेकडून पाठपुरावा केला. निवडणूक आयोगाने आम्हाला मतदान झाल्यानंतर कायद्याचा बडगा दाखवू नये. माणुसकीसमोर आम्ही कायदा पाहणार नाही, असेही ठाकरे यांनी बजावले.
शरद पवार, राहुल गांधी आणि जमलेले 56 पक्ष यांना मी आव्हान देतो की तुम्ही तुमच्या पंतप्रधानांचे नाव सांगा. मायावती, अखिलेश यादव, राहुल गांधी, शरद पवार, प्रकाश आंबेडकर, ओवेसी यातील एकही नाव पंतप्रधान म्हणून जनतेला पसंत पडत नाही. देव, देश आणि धर्मासाठी शिवसेना-भाजपची युती झाली आहे. विरोधी पक्ष पंतप्रधानांच्या खुर्चीचा संगीत खुर्ची म्हणून वापर करणार. युतीच्या जाहीरनाम्यात काश्मीरमधील 370 कलम काढून टाकणारा प्रमुख मुद्दा आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात 370 कलम काढून न देणारा मुद्दा आहे. देशद्रोहावरचे कलम काँग्रेस काढून टाकणार. हे जनतेला चालणार नाही. मेहबूबा मुफ्ती तुम्ही पाकिस्तानात राहता की हिंदुस्थानात? पाकिस्तानमध्ये शिरून आपण दहशतवाद्यांचा खात्मा करत आहोत. सर्जिकल स्ट्राइकवर, हवाई हल्ल्यावर तुम्ही संशय घेत आहात. नक्की तुम्ही आहात तरी कोण? ज्यांचा देशाच्या सैन्यावर विश्वास नाही अशा लोकांना पंतप्रधानपदाची स्वप्न पडत आहेत, असेही ते म्हणाले.
स्वाती महाडिक यांचे पती शहीद झाले. वीरपत्नी स्वाती महाडिक यांचे विधान आहे- माझे पती सैन्यात असताना शहीद झाले. माझी मुलंदेखील सैन्यात जातील. संपूर्ण कुटूंब देशसेवा करत आहे आणि विरोधक देशद्रोही कलम काढून टाकण्यासाठी निघाले आहेत. कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल. आम्ही काही शरद पवार नाही, माढा सोडून पळून जायला. सेनापती पळून जाणारे.. या मातीची आणि साधूसंतांची शिकवण ही देशसेवा करण्यासाठीची आहे. धनुष्यबाण हीच एक दिशा आहे. विरोधकांचे डिपॉझिट जप्त करून युतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे वचन मला तुमच्याकडून हवे आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.”
“केएचएल न्यूज ब्युरो