HomeArchiveबारवी धरणाची उंची...

बारवी धरणाची उंची वाढल्याने पाण्याची टंचाई नाही : सुभाष देसाई

Details
बारवी धरणाची उंची वाढल्याने पाण्याची टंचाई नाही : सुभाष देसाई

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला बारवी धरणाची उंची वाढवण्याचा प्रकल्प आज पूर्ण झाला असल्याने भविष्यात पाण्याची टंचाई भासणार नाही असा विश्वास राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारे बारवी धरण पूर्ण क्षमतेनुसार भरले आहे ही अतिशय आनंदाची बाब असल्याचेही ते म्हणाले.

उंची वाढल्यावर पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले म्हणून बारवी धरणाचे जलपूजन गुरूवारी भरपावसात आनंदी वातावरणात उद्योग मंत्री देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार किसन कथोरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकरी डॉ. पी. अन्बलगन, सह मुख्यकार्यकारी अधिकारी सुभेदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिकनेर, प्रादेशिक अधिकारी चिकुर्ते, मुख्य अभियंता राजेंद्र सोनजे, अधीक्षक अभियंता कालीदास भांडेकर, कार्यकारी अभियंता प्रकाश चव्हाण, संतोष कळसकर, अरूण कटाळे, भाजप तालुका अध्यक्ष राजेश पाटील, तहसीलदार जयराज देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल वायले आदी मान्यवर उपस्थित होते.

या धरणाची उंची वाढवण्याचे काम अनेक वर्षे रखडले होते. दोन वर्षांपूर्वी आपण स्थानिक आमदार कथोरे यांच्यासह प्रकल्पग्रस्तांना बरोबर घेऊन बैठक घेतली, प्रत्यक्ष गावात जाऊन पाहणी केली, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यावर तोडगा काढून निर्णय घेतला असे देसाई यांनी सांगितले.
गेल्या दोन वर्षांतील मेहनत आज यशस्वी झाली आहे. बारवी धारण पूर्ण क्षमतेने भरून वाहताना पाहून खरोखरच आनंद होत आहे, आता जिल्ह्याला पाण्याची टंचाई भासणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पाण्याची पातळी वाढल्याने कोळेवडखळ गावात पाणी शिरलं आहे. त्या गावातील नागरिकांचे तात्पुरते पुनर्वसन केले आहे. त्यांचेही कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार आहे, कोणावरही अन्याय होऊ देणार नाही असे शासनाचे धोरण असल्याचे उद्योग मंत्र्यांनी सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

महाराष्ट्र भाजपाने फुंकला 2029च्या निवडणुकीचा शंख!

देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या विचारधारेविषयी विश्वासाचे, सकारात्मक वातावरण आहे. या वातावरणाचा योग्य वापर करून घेण्यासाठी कालबद्ध रीतीने कार्यक्रम आखून 2029चा संपूर्ण यशाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी काम करावे, आणि देशभक्ती, राष्ट्रीयत्व आणि...

इराणच्या गुप्तचर प्रमुखाचा मृत्यू! तात्पुरत्या युद्धविरामाला नकार!!

इराणच्या सुरक्षायंत्रणेला सोमवारी मोठा हादरा बसला आहे. रिव्होल्युशनरी गार्ड्सचे (आयआरजीसी) गुप्तचर प्रमुख मजीद खादेमी यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले असून, यामुळे इराणच्या लष्करी नेतृत्त्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. खादेमी यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात असले तरी,...

सुनेत्रा पवारांनी केला प्रचाराचा शंखनाद

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या राजकीय रणधुमाळीत सोमवारी एक महत्त्वाचा टप्पा पार पडला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे सुपूर्द केला. या अर्जाद्वारे त्यांनी बारामतीच्या राजकीय रिंगणात आपली दावेदारी निश्चित केली असून, यावेळी समर्थकांमध्ये मोठा उत्साह...
Skip to content