HomeArchiveफिर एक बार,...

फिर एक बार, करो मतदान!

Details
“फिर एक बार, करो मतदान!”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
[email protected]
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात मुंबईसह राज्यातील बहुतांश शहरी विभागातील सतरा मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडत आहे. शहरी भागात मतदानाची कमी टक्केवारी ही नेहमीच चिंतेची बाब आहे. देशात सर्वत्र 66 टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात मतदारांनी मतदान केले असताना मागच्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मुंबई व ठाणे शहरात मात्र मतदानाचा टक्का कमी राहिला होता. पंतप्रधान नेरंद्र मोदींनी वाराणसीमध्ये अर्ज दाखल केला तेव्हा आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केले की प्रत्येक मतदान केंद्रात कार्यकर्ता जिंकायला हवा. मतदारांना बाहेर काढण्याची जबाबदारी तुमची आहे. मोदी निवडून आलेच असे गृहित धरून स्वस्थ बसू नका असं सांगायलाही त्यांनी कमी केले नाही!

मतदानाची टक्केवारी वाढते वा कमी होते तेव्हा काय होते हा निवडणूक अनुमानशास्त्रातील एक अभ्यासाचा व गोंधळाचाही विषय आहे. त्यापेक्षा कोणते समाजघटक मतदान करत आहेत व कोणते समाज मतदानापासून दूर राहत आहेत यावर विजयाचे गणित अवलंबून असते असेही मानणारे शास्त्रज्ञ आहेत. देशाने सध्यातरी 2014 च्या टक्केवारीच्या आसपासचे मतदान केले आहे. ही समाधानाचीच बाब आहे. कारण 2009 च्या तुलेनेत 2014 मध्ये काही राज्यात पंधरा टक्के तर काही राज्यात पाच टक्के मतदार अधिक संख्येने बाहेर पडले होते. जिथे 15 टक्के अशी भक्कम वाढ मतदानाच्या प्रमाणात झाली तिथे भाजपाचे उमेदवार विजयी झाले आणि जिथे वाढ कमी झाली वा झालीच नाही तिथे विरोधक विजयी झाले असा सर्वसाधारण ठोकताळा आहे. त्या अनुमानानुसार आतापर्यंतचे मतदान भाजपाच्या बाजूने आहे.

निवडणूक अनुमानशास्त्रातील एक मोठे नाव आहे ते योगेंद्र यादव यांचे. त्यांनी असे मत नोंदवले आहे की, विद्ममान सरकारच्या बाजूने लाट आहे आणि जे मोदींच्या विरोधात मत बाळगून आहेत त्यांच्यात मतदानाची उदासीनता दिसून आली आहे. विरोधी पक्षांच्या दृष्टीने हे अनुमान घातक आहे. मागच्या तिसऱ्या टप्प्यात पुणे शहराने मतदानाचा उत्साह अजिबातच दाखवला नाही. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात निराशा पसरली होती. पुण्यातील जेमतेम 46 टक्के मतदारांनीच मतदानात भाग घेतला. ही टक्केवारी बापट यांना विजयी करण्यासाठी पुरेशी आहे म्हणतात. पण पुण्यासारख्या विद्वान शहरात जिथे तरूण मतदारांची संख्याही लक्षणीय आहे, तंत्र-विज्ञानात प्रगती करू शकणारी तरूणाई इथे काम करते अशा शहरात लोकशाहीचा उत्सव असा मान टाकणारा ठरावा हे योग्य नव्हते व नाहीच.

मुंबई-ठाणे परिसराने यावेळी मागच्या टक्केवारीचा आकडा पार करून पुढे जायला हवे. 2014 च्या निवडणुकीत देशापेक्षा महाराष्ट्राची मतदानाची टक्केवारी जरी कमी होती. तरी 2009 च्या तुलनेत साधारणतः आठ ते दहा टक्के अधिक मतदान झालेच होते. मुंबई शहराची टक्केवारी तेव्हाही राज्याच्या तुलनेत दहा ट्क्कयांनी कमीच भरली होती. 2009 मध्ये मुंबईतील फक्त 39 टक्के जनतेने मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापेक्षा 2014 मध्ये मात्र जवळपास दहा टक्के अधिक मतदार बाहेर पडले. त्यामुळे टक्का 49 पर्यंत पोहोचला. त्याचवेळी कल्याण लोकसभा मतदारसंघात मात्र राज्यातील किमान टक्केवारी नोंदली गेली. फक्त 43 टक्के लोकांनी इथे मतदान केले होते. मात्र तरीही तिथेही 2009 च्या तुलनेत जवळपास दहा टक्क्यांनी मतदान वाढले होते. कल्याणमध्ये शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे यांना अडीच लाखांहून अधिक मतांनी पराभूत केले होते. आता सोमवारी काय होते, कल्याण-डोंबिवलीची सुजाण जनता अधिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडते का हे पाहयला हवे.

सोमवार हा तीन सुट्ट्यांच्या मधला दिवस आल्यामुळे मुंबईकरांचा कल सुटीसाठी परगावी जाण्याचा आहे असे दिसले आहे. तसे झाले असेल तर ते चिंतेचे कारण आहे. मतदान हा आपला अधिकार आहे, आपला हक्काही आहे. तो आपण बजावलाच पाहिजे. निवडणूक आयोगानेही मतादनाचा टक्का वाढावा यासाठी चांगली मेहनत यावेळी केली आहे. विविध एपच्या माध्यमांतून आयोगाने मतदारांशी संपर्क ठेवला आहे. व्हॉटसएपवर बडबड करून आपण निवडणुकीवर, उमेदवारांवर टीका करतो. राजकीय नेत्यांना सल्ले देतो, त्यांची थट्टा-मस्करीही करतो, अशा सर्व समाज माध्यमवीरांनी स्वतः मतदान तर केलेच पाहिजे. पण इतरांनाही मतदानासाठी उद्युक्त करायला हवे. प्रत्येक मतदाराला निर्भय व मुक्त वातावरणामध्ये मतदान करता यावे यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.

सर्वसाधारणपणे, ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातील मतदानाचे प्रमाण कमी असते असा आजवरचा अनुभव आहे. यावेळी ही परिस्थिती बदलली पाहिजे. मुंबईला देशाच्या आर्थिक राजधानीचा लौकीक प्राप्त झाला आहे. ते या महानगरातील आणि परिसरातील नागरिकांच्या प्रयत्नाचे यश आहे. शहरी भागातील मतदानाचे प्रमाण वाढविणे ही सुजाण नागरिक म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे. मतदानाच्या दिवशी सुट्टी आणि त्याला जोडून आलेल्या शनिवार, रविवारच्या सुट्या म्हणून बाहेरगावी जाऊ नका. मतदान करा. महिलांनी व युवकांनीदेखील मोठया संख्येने मतदान करावे. लोकशाहीमध्ये आपला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार हा सर्वस्वी आपला आहे. तेव्हा तो बजावलाच पाहिजे. लोकशाही बळकट करण्यासाठी या राष्ट्रीय महोत्सवामध्ये आपण सर्वांनी कोणत्याही दबावाला किंवा प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणाने सहभागी होऊन मतदान केले पाहिजे.

सतराव्या लोकसभेच्या स्थापनेसाठी सोमवारी होत असलेल्या मतदानात सतरा मतदारसंघांमधील खासदार महाराष्ट्राला निवडायचे आहेत. यात तीन कोटी 11 लाख 92 हजार 823 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. त्यात 1 कोटी 66 लाख 31 हजार पुरूष तर 1 कोटी 45 लाख 59 हजार महिला मतदार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. या लोकसभा मतदारसंघांमध्ये 102 विधानसभा मतदारसंघ असून 33 हजार 314 मतदान केंद्र आहेत. सुमारे 1 लाख 7 हजार 995 ईव्हीएम तर 43 हजार 309 व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात याआधी मतदानाचे एकूण तीन टप्पे पार पडले आहेत. त्यात मध्ये 31 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान शांततेत पार पडले. राज्यातील पहिल्या तीन टप्प्यांमध्ये साधारणतः 2014 इतक्याच प्रमाणात मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात मतदारसंघांमध्ये 61.81 टक्के मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात विदर्भ व मराठवाड्यातील दहा मतदारसंघांनी मतदान केले. त्यातील प्रमाण 62.43 टक्के इतके राहिले. 23 एप्रिल रोजी पार पडलल्या तिसऱ्या टप्प्यात मतदानात 14 मतदारसंघांतील सरासरी 62.37 टक्के मतदारांनी मतदान केले. आता चौथ्या व महाराष्ट्रातील अखेरच्या टप्प्यात मतदारसंघांची संख्याही अधिक आहे आणि मतदारांची संख्याही आधीच्या टप्प्यांच्या मानाने अधिक आहे. आपण सारे मुंबई, ठाणेकर काय करणार यावर राज्यातील मतदानाची सरासरी उंचावणार की खालावणार याचे गणित अवलंबून राहणार आहे.”
 
“अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी

Continue reading

महाराष्ट्रात कोरडे हवामान सुरू!

आयएमडी बुलेटिननुसार, ओदिशा आणि छत्तीसगडच्या काही भागांमधून आणि ईशान्येकडील राज्यांच्या उर्वरित भागातूनही मान्सून माघारला आहे. आतापर्यंत देशाच्या एकूण परतीच्या क्षेत्रापैकी 85 टक्के भागातून मान्सून परतलेला आहे. पुढील 2 दिवसांत देशाच्या उर्वरित भागातून मान्सून परतण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. महाराष्ट्रातून मान्सून...

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...
Skip to content