HomeArchiveप्रा. प्रल्हाद अनंत...

प्रा. प्रल्हाद अनंत धोंड यांच्या चित्र प्रदर्शनाची शानदार सांगता

Details
प्रा. प्रल्हाद अनंत धोंड यांच्या चित्र प्रदर्शनाची शानदार सांगता

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
भारतीय ज्येष्ठ निसर्ग चित्रकार प्रा. प्रल्हाद अनंत धोंड यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या १११ जलरंग चित्रांचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे मोठ्या दिमाखात ११ जून २०१९ ते 17 जूनपर्यन्त आयोजित करण्यात आले होते. या सात दिवसीय चित्र प्रदर्शनास लोकांचा खूप चांगला प्रतिसाद लाभला. या प्रदर्शनास अंदाजे वीस हजारांपेक्षा जास्त जलरंग चित्रप्रेमींनी भेट दिली. या प्रदर्शनात धोंड यांनी १९३१ मध्ये काढलेले पहिले चित्र व २००० मध्ये काढलेले शेवटचे चित्रही मांडण्यात आले होते. यामध्ये मुंबईतील फोर्ट, चर्चगेट आदी दृश्ये, मावळता सूर्य, समुद्रकिनारी मार्ग शोधत चालणारा अवलिया, कोकणाचा नयनरम्य निसर्ग, फेसाळणाऱ्या लाटा, मासेमारी करणारे कोळी, आदी चित्रांचा समावेश होता.

या जलरंग चित्र प्रदर्शनास प्रख्यात व्यंग-चित्रकार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, मुंबई भाजपा अध्यक्ष आ. अॅणड. आशिष शेलार, नाटक-चित्रपट-मालिका कलाकार अरूण नलावडे आदी मान्यवरांनी हजेरी लावली होती तसेच जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे माजी अधिष्ठाता, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी, इतर आर्ट्स कॉलेजेसचे विद्यार्थ्यांनी भेट दिली. मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील कलाप्रेमींनी या प्रदर्शनाला भेट दिली. त्यात मालवण, कोकण, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर इत्यादी ठिकाणाहूनही दाखल झालेल्या प्रेमींचा समावेश होता.

हया प्रदर्शनातील जलरंग चित्रे पाहावयास आलेल्या लोकांनी आपल्या प्रतिक्रियेत असे म्हटले की, धोंड सरांनी निसर्गाच्या सानिध्यात राहून समुद्राच्या वेगवेगळ्या छटा, रंग, रूप प्रत्यक्षात सर्वच चित्रांतून प्रदर्शित केल्या आहेत. प्रा. प्रल्हाद अनंत धोंड यांनी वयाच्या नव्वदव्या वर्षीही आपल्या प्रकृतीवर मात करत आपली कला जोपासली हे आजच्या पिढीला प्रेरणा देणारे ठरते. प्रत्येक चित्र हे जीवनातील वास्तव सांगून जाते आणि प्रत्येक परिस्थितीत आपण आपल्या जीवनात कसा मार्ग काढायचा हे शिकवून जाते. कला ही चर्चा करण्याचा विषय नसून जाणिवेचा व भावनात्मक अनुभवाचा विषय आहे. प्रा. प्रल्हाद अनंत धोंड यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त, त्यांच्या जलरंग चित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करून आजच्या पिढीला त्यांच्या चित्रांचा अनुभव घेण्याची जी संधी देण्यात आली त्यासाठी लोकांनी धोंड सरांचे नातू केदार कामत यांचे मनःपूर्वक आभार मानले.

११ नोव्हेंबर १९०८ रोजी प्रा. प्रल्हाद अनंत धोंड यांचा जन्म रत्नागिरी येथे झाला. त्यांनी १९३४ साली कला पदविका प्राप्त केली व १९३७ साली झालेल्या आर्ट मास्टर परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर त्यांनी मुंबईतील सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टसचे डीन व महाराष्ट्र राज्य सरकारचे कला संचालक म्हणून काम पाहिले. १९५८ ते १९६८ या काळात सर जे. जे. कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि १९६८ ते १९६९ या काळात महाराष्ट्र राज्याच्या कला संचालनालयाचे कला संचालक ही दोन प्रमुख पदे त्यांनी भूषविली. त्यांच्या ”रापण” या आत्मचरित्रात्मक पुस्तकाला राज्य पुरस्कार तर मिळालाच शिवाय वृत्तपत्रे आणि रसिक वाचकांनी स्तुतीदेखील केली. जलरंग लेपनाच्या ठसठशीत शैलीमुळे आणि निसर्ग चित्रणांच्या वैशिष्ट्यपूर्ण हाताळणीमुळे त्यांचे नाव अग्रगण्य चित्रकारांत घेतले जाते. त्यांच्या या अनोख्या शैलीतील चित्रे भारतातील अनेक कला दालनांतून, संग्रहालयांतून, विद्यापीठांतून संग्रहीत करण्यात आलेली आहेत. पश्चिम जर्मनी, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, पूर्व आफ्रिका, रशिया आदि देशांतील नामवंत संस्था, विविध क्षेत्रांतील मान्यवर उच्चपदस्थ आणि कलारसिकांच्या संग्रहांत त्यांची चित्रे आहेत. युब्यूबवरही रसिक या चित्रांचा आनंद घेतला. https://www.youtube.com/watch?v=i-2aOKfMuwI&feature=youtu.be”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content