HomeArchiveप्रवीण परदेशी व...

प्रवीण परदेशी व गोपाळ शेट्टी यांनी लुटला सायकलचा आनंद

Details
प्रवीण परदेशी व गोपाळ शेट्टी यांनी लुटला सायकलचा आनंद

    05-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
वाढत्या वायू व ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी वळा सायकलकडे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. लहानपणी पत्येकाने सायकल चालवली आहे. आपल्या व्यस्त दैनंदिन कामकाजात चक्क मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी व उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी नुकतेच सायकलवर स्वार होऊन मालाड पश्चिम मार्वे ते आक्सा, असा सुमारे ५ किमीचा प्रवास करून सायकल चालवण्याचा मनमुराद आनंद लुटला.
 
 
प्रवीण परदेशी यांनी मालाडच्या विविध विकासाच्या प्रश्न सोडविण्यासाठी मालाडला भेट दिली. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी व मालाडचे काँग्रेसचे स्थानिक आमदार अस्लम शेख आणि पालिकेचे अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी आयुक्त परदेशी, खासदार शेट्टी व आमदार शेख यांनी विविध ठिकाणी भेट दिली आणि विविध समस्यांकडे आयुक्तांचे लक्ष वेधले.
पर्यटकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अक्सा बीचला त्यांनी भेट दिली आणि मढ जेट्टी ते मार्वे बीचपर्यंत समुद्रकिनारे स्वच्छतेसाठी अतिरिक्त कामगारांच्या नेमणुकीचे आदेश आयुक्तांनी दिले. मार्वे बीचवर गणपती विसर्जनाच्या सुविधांची त्यांनी पाहणी केली आणि येथे शौचालयाची व्यवस्था करण्याचे आदेश आयुक्तांनी यावेळी दिले.
 
 
यावेळी दानापाणी पुलाचे रूंदीकरण करून दोन लेन पूल बनविणे तसेच नवीन सीवरेज ट्रीटमेंट प्लांट सुरू करण्यासाठी लागून रोडवर वॉटर ट्रीटमेंट प्लांटलादेखील या मान्यवरांनी भेट दिली. इनॉर्बिट मॉल व्यतिरिक्त भूमिगत पार्किंग पुरवण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले. मार्वे रोड रूंदीकरणामुळे प्रभावित लोकांच्या पुनर्वसनाबाबत लोकांनी वैकल्पिक अभिप्राय द्यावे, असेही परदेशी म्हणाले.”

 

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
“वाढत्या वायू व ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी वळा सायकलकडे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. लहानपणी पत्येकाने सायकल चालवली आहे. आपल्या व्यस्त दैनंदिन कामकाजात चक्क मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी व उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी नुकतेच सायकलवर स्वार होऊन मालाड पश्चिम मार्वे ते आक्सा, असा सुमारे ५ किमीचा प्रवास करून सायकल चालवण्याचा मनमुराद आनंद लुटला.”
 
 
“प्रवीण परदेशी यांनी मालाडच्या विविध विकासाच्या प्रश्न सोडविण्यासाठी मालाडला भेट दिली. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी व मालाडचे काँग्रेसचे स्थानिक आमदार अस्लम शेख आणि पालिकेचे अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी आयुक्त परदेशी, खासदार शेट्टी व आमदार शेख यांनी विविध ठिकाणी भेट दिली आणि विविध समस्यांकडे आयुक्तांचे लक्ष वेधले.”
पर्यटकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अक्सा बीचला त्यांनी भेट दिली आणि मढ जेट्टी ते मार्वे बीचपर्यंत समुद्रकिनारे स्वच्छतेसाठी अतिरिक्त कामगारांच्या नेमणुकीचे आदेश आयुक्तांनी दिले. मार्वे बीचवर गणपती विसर्जनाच्या सुविधांची त्यांनी पाहणी केली आणि येथे शौचालयाची व्यवस्था करण्याचे आदेश आयुक्तांनी यावेळी दिले.
 
 
“यावेळी दानापाणी पुलाचे रूंदीकरण करून दोन लेन पूल बनविणे तसेच नवीन सीवरेज ट्रीटमेंट प्लांट सुरू करण्यासाठी लागून रोडवर वॉटर ट्रीटमेंट प्लांटलादेखील या मान्यवरांनी भेट दिली. इनॉर्बिट मॉल व्यतिरिक्त भूमिगत पार्किंग पुरवण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले. मार्वे रोड रूंदीकरणामुळे प्रभावित लोकांच्या पुनर्वसनाबाबत लोकांनी वैकल्पिक अभिप्राय द्यावे, असेही परदेशी म्हणाले.”

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content