HomeArchiveपोकळ डरकाळी! वाघाचे...

पोकळ डरकाळी! वाघाचे पायही मातीचेच!

Details
पोकळ डरकाळी! वाघाचे पायही मातीचेच!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विलास मुकादम, ज्येष्ठ पत्रकार
शिवसेनेची असलेली राजकीय ताकद भारतीय जनता पक्षाचे नेते आणि चाणक्य ओळखून आहेत. त्यामुळेच नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी बसवायचे भाजपचे स्वप्न शिवसेनेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आधीच मोदी आणि भाजप सरकारच्या विरोधातील जनमतात सेनेची भर पडू नये असेच मोदी आणि अमित शाह यांना वाटले तर नवल नाही. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा युतीची अगतिकता बोलून दाखविली आहेच. “युतीची चिंता करू नका, तुम्ही कामाला लागा” असा संदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहेच. तरीही शिवसेना “नाही मी बोलत”च्या थाटात वावरत आहे. गेले वर्षभर भाजपच्या विरोधात आग ओकणारे उद्धव ठाकरे काहीसे मवाळ झाल्याचे चित्र दिसत आहे. त्याचा अर्थ काय समजायचा? अर्थ इतकाच की लोकसभा निवडणुकीसाठी आता शिवसेना राजी झाली आहे. मात्र लोकसभा निवडणूक जिंकल्यावर राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी भाजप प्रामाणिक राहील याबद्दल उद्धव ठाकरेंना संशय आहे. तरीही युती गेली खड्ड्यात असे जाहीर वक्तव्य केल्याने शिवसेनेपुढे पेच निर्माण झाला आहे.

कार्यकर्त्यांना सज्ज ठेवण्यासाठी युतीकडून परस्परांवर टीका केली जाते. शिवसेना, भाजपमध्ये नेमकं हेच चाललं आहे. तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो, असाच खेळ युतीत चालला आहे अशी जनभावना निर्माण झाली आहे. मात्र युती झाली, तर भाजपचा लाभ होईल कारण विरोधक अद्याप टक्कर देण्याइतके समर्थ नाहीत. कमजोर विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांच्याच पथ्यावर आहे. गेली चार वर्षे झोपून राहिलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते निवडणुकीच्या तोंडावर जागे झाले आहेत. आक्रमक झाले आहेत. दुसरीकडे विरोधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाच शिवसेना भाजप युती व्हावी असे वाटत असेल. त्याचे कारण हे दोन पक्ष परस्परात लढले तर विरोधकांचा आवाजच दबला जाईल. युतीची माती होऊन सेना-भाजप एकमेकांवर तुटून पडतील. त्या सत्तासंघर्षात विरोधकांची आघाडी पिछाडीवर पडेल, असे राजकीय चित्र निर्माण होण्याची भीती दोन्ही काँग्रेसना वाटते आहे. त्यात तथ्य आहेच.

भारतीय जनता पक्षाचे राजकारण म्हणजे जणू एक कॉर्पोरेट कंपनीचा उद्योग असेच असते. प्रत्येक घटनेचा तेथे एक इव्हेन्ट असतो. निवडणूक म्हणजे तर सत्ता ताब्यात घेणे किंवा असलेली टिकविणे, राखणे. महाराष्ट्रात भाजपने केवळ सत्ताकाळात केलेली घोडदौड काय सांगते? लोकसभा असो की गावातील सरपंचाची निवडणूक असो, भाजपने कधी रणनीती आखली नाही, असे झाले नाही. त्याउलट शिवसेनेचे धोरण असते. गेली अनेक वर्षे मुंबई-ठाण्याच्या बाहेर शिवसेनेने केलेले राजकारण किंवा लढलेल्या निवडणुकांत गांभीर्य नव्हते. मुंबईत मराठीचा मुद्दा आणि मुंबईबाहेर हिंदुत्वाचा नारा आणि तोरा मिरवला आहे. त्यालाच भावनिक राजकारण म्हटले जाते. भावनिक राजकारण फार काळ चालत नाही. शेवटी वास्तव दडविता येत नाही. वास्तवाला भिडणारेच जिकंतात. काळ आणि वेळ बदलत असतो. त्याला परिवर्तन असे म्हटले जाते.

काळ सूड उगवत असतोच. मागील लोकसभेची निवडणूक जिंकल्यानेच भाजपने २०१४च्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला ऐनवेळी एकटे पाडले. २५/३० वर्षांची युती भाजपने एका रात्रीत तोडली. त्याचा फटकाही भाजपला बसलाच होता. अल्पमतातील फडणवीस सरकार पवारांमुळे सत्तेवर आले. पवारांचा तो अदृश्य हात कायम राहिला. शिवसेना खाली मान घालून सत्तेत बसली. तरीही फडणवीसांच्या मागे राष्ट्रवादीची बी टीम होतीच. शिवसेना सत्तेत राहून सत्तेत नसल्यासारखीच. उठसूठ अवमान आणि दुय्यम दर्जा शिवसेनेच्या वाटयाला आला. त्यामुळे बाहेर सरकारविरोधी गर्जना करण्याचा खेळ शिवसेनेला खेळावा लागला. जे विरोधकांनी करायला हवे होते, ते उद्धव ठाकरे बोलू लागले. त्यामुळे भाजपच्या संतापात भरच पडली. सेनेच्या वाघाचे पाणी भाजपने जोखले. स्वबळाची भाषा करून पुढे तशी तयारी करुनही आता स्वबळाबद्दल कोणतीही खात्री नाहीच. वर्षापूर्वीची भाषा आता शिवसेनेने बदलली आहे. मात्र हेच कचखाऊ धोरण शिवसेनेला मतांचे दान करणाऱ्या मराठी माणसांना मान्य नाही. साहेबांची शिवसेना हतबल झालेली कार्यकर्तांना पाहवी लागत आहे. जनतेला सत्ता नव्हे, तर सत्तेवर अंकुश ठेवणारा आवडत असतो. कोणतीही सत्ता नसताना बाळासाहेब सत्ता गाजवित होते. जनतेच्या पाठीशी राहणारा नेता किंवा राजकीय पक्षच जनतेच्या मनात घर करत असतो. जनता प्रामाणिक असते तर नेते सत्तातूर असतात. नेत्याने शब्द फिरवलेला लोकांना आवडत नाही. लोक तत्त्वाने जगतात आणि राजकीय पक्ष स्वार्थ साधताना दिसतात. मात्र विविध राजकीय पक्ष आणि शिवसेना यांच्यात वेगळेपण आहे. शिवसेना समाजकारणावर भर देणारी आहे. तशी ती आहे. असायला हवी. पण सध्या ती काय करते, याकडे मराठी माणसांचे लक्ष आहे. ते योग्यच म्हटले पाहिजे. तरीही वेगळेच काही घडत असते. घडत आहे.

आता मुद्दा उरतो तो कळीचा आहे. शिवसेना आणि भाजप यांची युती होणार की नाही? ही ज्वलंत बाब आहे. भाजपमधून सर्वचजण हमी देतात की शिवसेनेशी युती होणारच. मात्र त्यावर कोणतेही खंडन करणारे भाष्य किंवा वक्तव्य शिवसेनेतून होत नाही. शिवसेनेला भाजपने गृहित धरलेले दिसते. असाच याचा सरळ-सोपा अर्थ आहे. त्याला महत्त्वाची कारणंही आहेतच की, मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची दोस्ती आहे. हा दोस्ताना लपून राहिलेला नाही. मैत्री-युतीचा राजकीय लाभ होत असतोच ना? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकास महापौर बंगला मिळाला. स्मारकासाठी शंभर कोटी रुपयांचा निधीही सरकारने मंजूर केला. आमदार-खासदारांच्या किरकोळ मागण्याही मार्गी लागल्या. सत्तेचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लाभ होत असतोच. मुंबई महापालिकेत शिवसेनेला काठावरचे बहुमत असतानाही भाजपने मोकळीक दिली आहे. राज्य ताब्यात घेणारे मुख्यमंत्री फडणवीस मुंबई महानगरपालिका ताब्यात घेऊ शकतात. मात्र तसे का घडत नाही? किरीट सोमय्या, आशिष शेलार यांचे मुख्यमंत्री फडणवीस का बरे ऐकत नाही? याला उत्तर एकच आहे. शिवसेना-भाजप युती होणार हे सांगायला आता ज्योतिषाची गरज नाही. युती झाल्यात जमा आहे. मग उद्धव ठाकरेंनी केलल्या गर्जनांचे काय? मराठी माणसांच्या स्वाभिमानाचे काय? परखड बाण्याचे काय? आणि महाराष्ट्राच्या ढाण्या वाघाचे काय? डरकाळीचे काय आणि इशाऱ्यांचे काय? वाघाचे पायही मातीचेच निघावेत?”
 
“विलास मुकादम, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

आयडियल मोफत कबड्डी स्पर्धात्मक शिबिरात ४० खेळाडू

मुंबईच्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे यंग स्पोर्ट्स क्लब-घाटकोपर यांच्या सहकार्याने शालेय मुलांसाठी मोफत कबड्डी स्पर्धात्मक मार्गदर्शन शिबीर येत्या २७ एप्रिलपासून माणिकलाल मैदान, घाटकोपर येथे सुरु होत असून त्यात शालेय ४० खेळाडू सहभागी झाले आहेत. नवोदित खेळाडूंना तंत्रशुद्ध कबड्डी खेळाची प्राथमिक...

उत्तर प्रदेशातले शेखा झील पक्षी अभयारण्य झाले ‘रामसर स्थळ’!

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे. उत्तर प्रदेशात ही संख्या 12पर्यंत पोहोचली आहे. “उत्तर प्रदेशने हा...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...
Skip to content