HomeArchiveनेटबँकिंगद्वारे नवोदित कलाकारांना...

नेटबँकिंगद्वारे नवोदित कलाकारांना गंडा!

Details
नेटबँकिंगद्वारे नवोदित कलाकारांना गंडा!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

जगदीश भोवड, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
मुंबईसारख्या शहरात लोकांना गंडा घालण्याचे, वाममार्गाने पैसे कमावण्याचे धंदे सातत्याने घडताना दिसत आहेत. यापैकी सर्वच गुन्ह्यांना वाचा फुटते असे नाही. आपण फसवले गेलो, आपली नाचक्की झाली, हे जगजाहीर होऊ नये यासाठी अनेक लोक आपल्यावर गुदरलेला प्रसंग पोलिसांना सांगतच नाहीत. त्यामुळे असे असंख्य गुन्हे उघडकीस येतच नाहीत. मात्र काही लोक पोलिसांकडे जाण्याचे धाडस करतात आणि पोलिसांनी मनावर घेतले, तर कोणताही गुन्हा उघड होतोच होतो, असाही अनुभव आहे.

मुंबईमध्ये ‘युनिट नं. ९’ नावाची गुन्हे अन्वेषण विभागाची एक शाखा आहे. याठिकाणी अनेक दिग्गज पोलीस अधिकाऱ्यांनी तपासी अधिकारी म्हणून काम करताना आपली छाप पाडली होती. एन्काऊंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर यांनीही याच शाखेत असताना अनेक महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आणले होते. आता या युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत महेश देसाई. साळसकर यांच्याच तालमीत तयार झालेले महेश देसाई हेही आता आपली छाप पाडताना दिसत आहेत. मुंबईमध्ये विविध प्रकारची आमिषे दाखवून लोकांची फसवणूक करणाऱ्या लोकांसंबंधी त्यांच्या युनिटकडे तक्रार आली होती. या तक्रारीचा सखोल तपास करीत महेश देसाई आणि त्यांच्या पथकाने फसवणूक करणाऱ्या दोन ठकसेनांना जेरबंद करण्यात यश मिळवले. अविनाश शर्मा आणि विनोद भंडारी अशी त्यांची नावे आहेत. गोरेगाव परिसरातून या दोघांना युनिट नं. ९ च्या पथकाने अटक केली. प्रख्यात कंपनी आणि प्रसिद्ध टीव्ही चॅनेलनिर्मित ‘कृष्णा चली लंदन’ या मालिकेमध्ये भूमिका देण्याचे आमिष दाखवत हे ठकसेन नवोदित कलाकारांकडून नेटबँकिंग आणि पेटीएमद्वारे रक्कमा स्वीकारून गंडा घालत असत. या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांची कसून चौकशी केल्यानंतर या आरोपींनी अनेकांची फसवणूक केल्याची कबुलीही दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटसृष्टीत नामांकित असलेल्या आदित्य आणि श्रुती जैन यांच्या नावाचा वापर करीत सिटा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा पदाधिकारी असल्याचे सांगत तसेच एका प्रसिद्ध वाहिनीच्या वतीने निर्मित विविध टीव्ही मालिकांमध्ये भूमिका मिळवून देण्याच्या आमिषाने अविनाश शर्मा आणि विनोद भंडारी हे नवोदित कलाकारांना लुटत असत. नवोदित कलाकारांना त्यांची निवड झाली याची माहिती त्यांना देण्यासाठी बनावट ई-मेल्स पाठवले जात असत. त्यानंतर नेटबँकिंग आणि पेटीएमच्या माध्यमातून त्यांच्याकडून पैसे घेतले जात असत. ‘कृष्णा चली लंदन’ मालिकेत कलाकारांची गरज असल्याची माहिती मुख्य आरोपी अविनाश शर्माने ‘ऑॅडिशन इंडिया’ या वेबसाइटवरून मिळवली होती. या वेबसाइटवर ज्या इच्छुकांनी आपली माहिती दिली होती, त्यांचा संपर्क नंबर आणि ई-मेल आयडी त्याने मिळवले आणि मग स्वत:ला या मालिकेचा निर्माता असल्याचे भासवून त्याने अनेक जणांशी संपर्क साधला. मालिकेत भूमिका देण्याचे सांगून त्याने इच्छुकांकडून ४० ते ५० हजार रूपयांपर्यंत रक्कम वसूल करण्यास सुरूवात केली. अशाप्रकारे या दोघा आरोपींनी थोड्या-थोडक्या नव्हे तर जवळपास ७० ते ७५ नवोदित कलाकारांना गंडा घातल्याचे युनिट नं. ९ च्या पथकाने केलेल्या तपासात निष्पन्न झाले. आरोपी अविनाश शर्मा आणि विनोद भंडारी यांनी स्टार इंडिया टीव्हीच्या लोगोचा वापर या गुन्ह्यात केला आहे. आरोपी हे वेब डिझायनर होते. या संबंधित कंपनीत काही काळ त्यांनी कामही केल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर ही फसवणुकीची कल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि त्यांनी नवा धंदा सुरू केला.

याबाबतची तक्रार गुन्हे शाखा ९ यांच्याकडे दाखल होताच शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर जाधव यांनी सखोल तपास करून एका संशियातला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्यानंतर हे सारे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणावरून हेच दिसून येते की, तरूणांनी कुठलीही खातरजमा केल्याशिवाय एखाद्या आमिषाला बळी पडू नये आणि कोणालाही पैसे देऊ नयेत. सोशल मीडियावर आलेल्या कुठल्याही माहितीची खात्री करून घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

उद्योजकाला तब्बल १.८६ कोटीचा गंडा

आपल्याला दिवसभरात अनेकदा ‘मिस कॉल’ येत असतात. बहुतांश वेळेला अज्ञात क्रमांकावरून ‘मिस कॉल’ पडल्यानंतर आपण संबंधित क्रमांकावर पुन्हा फोन करतो. तो फोन कुणाचा होता, तो कशासाठी केला होता, वगैरेची उत्सुकता प्रत्येकाला असते. पण कधी कधी एखादा ‘मिस कॉल’ धोकादायकही ठरू शकतो. होय, असेच एक प्रकरण मुंबईमध्ये घडले आहे. मुंबईमधील एका उद्योजकला अर्ध्या रात्री सहा ‘मिस कॉल’ आल्यानंतर त्याच्या विविध खात्यांतून तब्बल १.८६ कोटी रुपये गायब झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १.८६ कोटींचा फटका बसलेल्या मुंबईमधील उद्योगपतीचे नाव व्ही. शाह असे आहे. शाह यांच्या मोबाईलवर २७-२८ डिसेंबरच्या रात्री २ वाजताच्या सुमारास +४४ कोडने सुरू होणाऱ्या क्रमांकावरून ६ ‘मिस कॉल’ पडले होते. हा कोड ब्रिटनचा आहे. झोपेत असल्यामुळे त्यांनी फोन उचलला नव्हता. पण सकाळी उठून शाह यांनी आलेल्या क्रमांकावर फोन केल्यानंतर त्यांना आपलाच क्रमांक बंद झाल्याचे समजले. यानंतर करण्यात आलेल्या तपासात शाह यांच्या तक्रारीवरून क्रमांक ब्लॉक करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली. परस्पर हा सर्व प्रकार झाल्यामुळे गोंधळलेल्या शाह यांना काहीच समजत नव्हते. इतकेच नाही तर बँकेत गेल्यानंतर त्यांना आणखी एक मोठा धक्का बसला. त्यांच्या खात्यांमधून तब्बल १.८६ कोटी रूपये पळविण्यात आल्याचे समोर आले. शाह यांच्या १४ वेगवेगळ्या खात्यांमध्ये एकूण २८ ट्रांझेक्शन करत पैसे पाठविण्यात आले होते. बँकेने प्रयत्न करून फक्त २० लाख रूपये परत आणले. यानंतर करण्यात आलेल्या तपासामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.

२७ डिसेंबरच्या रात्री ११ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास शाह यांच्या क्रमांकावरून नवीन सीम कार्डसाठी अर्ज करण्यात आला होता. तर रात्री २ वाजताच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर सलग सहा मिस कॉल पडले. पूर्ण प्रकरण सीम कार्ड स्वॅपिंगचे आहे. एकंदर हॅकर्सनी शाह यांना पद्धतशीरपणे गंडा घातला होता. हॅकर्सला शाह यांच्या बँक खात्यांबाबत एखाद्या सॉफ्टवेअरद्वारे माहिती मिळाली असावी. त्याद्वारे त्यांच्या खात्यातून पैसे पळविण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण ‘मिस कॉल’वर परत फोन करण्याशी संबंधित नाही. कारण शाह हे फोन सायलेंटवर ठेवून झोपी गेले होते. त्यांनी मिस कॉल आला म्हणून परत फोन केलेला नव्हता. मात्र तरीही अज्ञात क्रमांकावरून येणाऱ्या फोनबाबत सतर्कता बाळगण्याची गरज आहे. आपण सर्वांनीच ही दक्षता घेतली पाहिजे. अर्थात आपण सर्वसामान्य आहोत, आपणास काय धोका आहे, असाही विचार कुणी करू शकतो. मात्र एखादा हॅकर काय करामती करेल आणि कशा प्रकारे आपल्याला गंडा घातला जाईल, हे सांगता येत नाही. तेव्हा प्रत्येकाने सावध हे राहायलाच हवे.

त्या महिलेला सलाम

फसवणूक झाल्यानंतर अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकते. आपण सर्वात आधी काय करतो, तर संबंधित बँकेशी संपर्क साधतो आणि झाल्या प्रकाराची माहिती देतो. पोलिसांनाही कळवतो. मात्र पोलीस अशा प्रकरणांत नेमकी काय भूमिका घेतील हे सांगता येत नाही. कधी कधी पोलीस खूप इंटरेस्ट घेऊन प्रकरणाच्या मुळाशी जातात. मात्र, कधी कधी पोलीस वेगवेगळी कारणे सांगून आपला हात झटकून टाकतात. मात्र फसवणूक झालेल्या एका महिलेने जे केले ते खरेच कौतुकास्पद आहे. मुंबईतील एका महिलेने तब्बल १७ दिवस एटीएम केंद्रांवर पाळत ठेवून एका भामट्याला पकडण्यात मोलाची भूमिका बजावली. भूपेंद्र मिश्रा असे या भामट्याचे नाव असून महिलेच्या एटीएम कार्डाच्या आधारे भामट्याने १० हजार रूपये काढले होते.

मुंबईतील वडाळा येथे राहणाऱ्या रेहाना शेख या ३५ वर्षीय महिलेच्या बाबतीत ही घटना घडली होती. रेहाना शेख या पाली हिल येथील कार्यालयात कामाला आहेत. गेल्या १८ डिसेंबर रोजी त्या वांद्रे स्टेशनजवळील एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. कार्ड स्वाइप केल्यानंतर पासवर्ड टाकूनही एटीएममधून पैसे येत नव्हते. त्या बराच वेळ एटीएममध्येच होत्या. यादरम्यान एटीएमबाहेर थांबलेला भूपेंद्र मिश्रा हा भामटा मदतीच्या बहाण्याने आतमध्ये गेला. तांत्रिक कारणामुळे पैसे येत नव्हते. यादरम्यान भूपेंद्रने रेहाना शेख यांच्या डेबिट कार्डाचा तपशील घेऊन ठेवला. पैसे काढता न आल्याने रेहाना शेख एटीएममधून निघून गेल्या. मात्र कार्यालयात गेल्यावर त्यांना मोबाईलवर एटीएममधून १० हजार रूपये काढल्याचा मेसेज आला. यानंतर रेहाना पुन्हा एटीएम केंद्रात गेल्या आणि त्या भामट्याचा शोध घेतला. मात्र तोवर भूपेंद्र तिथून निघून गेला होता. यानंतर रेहाना शेख या तब्बल १७ दिवस दररोज त्या एटीएम केंद्रावर पाळत ठेवून होत्या. अखेर ४ जानेवारीला रेहाना यांना भूपेंद्र एटीएम केंद्राबाहेर घुटमळताना दिसला. त्यांनी भूपेंद्रला पकडले आणि तिथूनच पोलिसांना फोन केला. पोलिसांनी ताबडतोब त्याठिकाणी येऊन भूपेंद्रला ताब्यात घेतले. त्याची पोलिसांनी कसून चौकशी केली. त्याच्याविरोधात यापूर्वीही ७ गुन्हे दाखल होते. एटीएम केंद्रात येणाऱ्या लोकांना गंडा घालण्याचे काम तो करीत असल्याचे स्पष्ट झाले.”
 
“जगदीश भोवड, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

महाराष्ट्राला मिळणार ४८ऐवजी ७२ खासदार?

भारतीय लोकशाहीत एक ऐतिहासिक बदल घडण्याच्या उंबरठ्यावर आहे. केंद्र सरकार "नारी शक्ती वंदन अधिनियम"मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित संशोधन विधेयकाद्वारे लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या ५४३वरून ८१६पर्यंत वाढवण्यात येईल. या ८१६ जागांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल २७३...

इराणसोबतचे युद्ध हा अमेरिकेने खेळलेला जुगार!

आज जागतिक भू-राजकारण अशा वळणावर उभे आहे जिथे लष्करी संघर्षाचा धूर थेट सामान्य माणसाच्या किचन आणि उद्योगांच्या ताळेबंदापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध केवळ लष्करी वर्चस्वाची लढाई राहिलेली नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरत आहे....

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...
Skip to content